
US Exit from dozens of Global Organizations
भारत-अमेरिका ट्रेड डील कधी होणार फाइनल? जाणून घ्या टॅरिफबाबत काय सांगतात तज्ज्ञ
ट्रम्प यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात मोठा बदल केला आहे. त्यांनी अमेरिका फर्स्ट धोरणांतर्गत अमेरिकेच्या हितसंबंधांना, अर्थव्यवस्थेला आणि सार्वभौमत्वाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. व्हाइट हाउसने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने एकूण ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांमधून माघार घेण्याचे ठरवले आहे. यामध्ये ३५ संघटना या गैर-संयुक्त संघटना आहेत, तर इतर उरलेल्या ३१ संघटना या संयुक्त राष्ट्राशी संलग्न आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी या सर्व संघटनांचे अमेरिकाविरोधी, निरुपयोगी आणि व्यर्थ म्हणून वर्णन केले आहे. ट्रम्प प्रशासनाने भारत आणि फ्रान्स नेतृत्त्वाखाली इंटरनॅशनल सोलर अलायंस (ISA), इंटरनॅशनल यूनियन फॉर कंझर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) इंटरहव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लाइमेट चेंज (IPCC)या संघटनांमधूनही एक्झिट मारली आहे.
Today, President Trump announced the U.S. is leaving 66 anti-American, useless, or wasteful international organizations. Review of additional international organizations remains ongoing. These withdrawals keep a key promise President Trump made to Americans – we will stop… — Secretary Marco Rubio (@SecRubio) January 8, 2026
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी हा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला आहे. त्यांनी म्हटले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेविरोधी संघटना, अनावश्य खर्च करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल आहे. यामध्ये ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांचा समावेश असून या सर्व संघटनांचे पुनरावलोक सध्या सुरु आहे. रुबियो यांच्या मते, ट्रम्प अमेरिकन जनतेला दिलेल्या वचनांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा दिशेने हे एक सर्वात मोठी पाऊल आहे. अमेरिकविरोधी संघटनांना आता कोणत्याही प्रकारणाचा निधी दिला जाणार नाही असे मार्को रुबियो यांनी म्हटले आहे.
यामध्ये संयुक्त राष्ट्र संघाशी संलग्न असलेल्या संस्थांमधूनही अमेरिका बाहेर पडणार आहे. यामध्ये डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल अफेयर्स, इंटन इंटरनॅशनल लॉ कमीशन, इंटरनॅशनल ट्रेड सेंटर, पीसबिल्डिंग कमीशन, यूएन एनर्जी, यूएन पॉपुलेशन फंड और यूएन वॉटर या संघटनांचाही समावेश आहे.
व्हेनेझुएलाच्या बदल्यात रशियाला मिळणार होता ‘हा’ देश; अमेरिकेशी केला होता गुप्त करार
Ans: अमेरिकने ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांमधून माघार घेण्याचे ठरवले आहे. यामध्ये ३५ संघटना या गैर-संयुक्त संघटना आहेत, तर इतर उरलेल्या ३१ संघटना या संयुक्त राष्ट्राशी संलग्न आहेत.
Ans: अमेरिकेच्या अमेरिका फर्स्ट धोरणाअंतर्गत अमेरिकेच्या हितसंबंधांना, अर्थव्यवस्थेला आणि सार्वभौमत्वाला प्राधान्य देण्याच्या हेतूने अमेरिका आंरराष्ट्रीय संस्थांमधून बाहेर पडली आहे,