भारत-अमेरिका ट्रेड डील कधी होणार फाइनल? जाणून घ्या टॅरिफबाबत काय सांगतात तज्ज्ञ (फोटो सौजन्य: AI जनरेटेड)
‘मोदींशी चांगले संबंध…’ ; ट्रम्प यांचे PM मोदींबाबत मोठे विधान, भारतावरील टॅरिफ कमी होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या अमेरिका आणि भारताच्या व्यापार समकक्षांमध्ये टॅरिफवर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुर आहे. तज्ज्ञांच्या मते भारत आणि अमेरिकेतील ही बहुप्रशिक्षित व्यापार चर्चा 2026 च्या सहा महिन्यांत अंतिम टप्प्यात पोहोचेल. यामुळे भारतावरील टॅरिफही कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
युरेशियाचे प्रमुख आणि जगप्रसिद्ध व्यापार विश्लेषक इयान ब्रेमर सांगतात की, 2026 मध्ये भारतावरील टॅरिफचा धोका कमी होण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते, 2025 मध्ये दोन्ही देशात तणाव निर्माण झाला होता. परंतु 2026 मध्ये याचे महत्त्व अधिक वाढले असून भारतावरील टॅरिफ लक्षणीरित्या कमी होण्याची शक्यता आहे. माध्यमांनी दिलेल्या मुलाखतीत ब्रेमर यांनी हे विधाने केले आहे. मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की, भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार हा 2026 च्या पहिल्या सहा महिन्यांत अंतिम होईल.
जुलै 2025 मध्ये ट्रम्प यांनी भारतावर रशियाकडून तेल खरेदीच्या कारणास्तवर 50% टक्के टॅरिफ लादले होते. तेव्हापासून दोन्ही देशांतील राजकीय आणि व्यापारात तणाव निर्माण झाला. भारताने अमेरिकेशी व्यापारावर चर्चाही सुरु केल्या होत्या. पण अजूनही टॅरिफवर कोणताही निश्चित निर्णय झालेला नाही. शिवाय ट्रम्प यांनी नुकतेच पंतप्रधान मोदींचे कौतुक करत भारताशी चांगले संबंध असल्याचा दावा केला होता. तसेच त्यांनी रशियाकडून तेल खरेदीमुळेच टॅरिफ लावल्याचे म्हटले होते. परंतु टॅरिफ कमी होणार का नाही यावर कोणतेही भाष्य केले नाही.
याच वेळी ट्रम्प यांनी 2025 च्या अखेरीस 11 डिसेंबरला पंतप्रधान मोदींशी फोनवरुन संवाद साधला होता. यावेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या भेटीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. तसेच या फोनकॉलनंतर अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी भारताचे केंद्रिय वाणिज्या मंत्री पियुष्य गोयल यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत अमेरिकेसोबत व्यापार वाटाघाटीवर सविस्तर चर्चा करण्यात आली होती.
तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांच्या विधानाकडे पाहता अमेरिका आणि भारतातील संबंध अजूनही पूर्णपणे बिघडलेले नाही. परंतु दोन्ही देशांमध्ये व्यापार शुल्कावर मतभेद कायम आहेत. ट्रम्प पंतप्रधान मोदींवर रशियाकडून तेल खरेदी कमी केल्यामुळे खुश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र टॅरिफवर प्रश्नचिन्ह कायम आहे.
सध्या टॅरिफचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेलाच बसला आहे. यामुळे चामडे, रसायने, पादत्राणे, रत्ने आणि दागिने, कापड आणि कोळंबीसह अनेक उद्योंवर परिणाम झाला आहे. भारताच्या निर्यातदारांवरही मोठा दबाव वाढत आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते येत्या काळात या क्षेत्रांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांचे टॅरिफ प्रयोग अपयशी? अमेरिकन कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर
Ans: भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार हा 2026 च्या पहिल्या सहा महिन्यांत अंतिम होईल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
Ans: अमेरिकेने भारतावर रशियाकडून तेल खरेदीमुळे ५०% टॅरिफ लावले होते.
Ans: 2026 मध्ये भारतावरील टॅरिफचा धोका कमी होण्याची शक्यता असल्याचे युरेशियाचे प्रमुख आणि जगप्रसिद्ध व्यापार विश्लेषक इयान ब्रेमर यांनी म्हटले आहे.






