Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

America Shutdown : अमेरिकेतील शटडाऊन लवकरच संपणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले उत्तर

America Shutdown : अमेरिकेत गेल्या ४० दिवसांपासून शटडाऊन सुरु आहे. यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. विशेष करुन अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. ट्रम्प यांनी शटडाऊन कधी संपणार यावर उत्तर दिले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 10, 2025 | 12:48 PM
Donald Trump

Donald Trump

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेचे शटडाऊन संपणार
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले उत्तर, म्हणाले…
  • जाणून घ्या का म्हणाले ट्रम्प

America Shutdown news in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेत (America) गेल्या ४० दिवसांपासून सर्व सरकारी कामकाज ठप्प आहे. परंतु आता हे शटडाऊन लवकरच संपणार असल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी स्वत: दावा केला आहे की, शटडाउन लवकरच संपेल. त्यांच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे. ४० दिवसांचे शटडाउन नेमंक कसे संपणार असा प्रश्न पडला आहे.

America Shutdown : अमेरिकेत शटडाऊनमुळे हवाई सेवेवर मोठा परिणाम ; दोन दिवसांत हजारो उड्डाणे रद्द

शटडाऊनमुळे अमेरिकेतील लाखो नागरिकांना अन्न निधी बंद झाली आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारही अद्याप मिळालेल्या नाही. हवाई सेवेवर, लष्करावर याचा मोठा परिणाम होत आहे. अनेक गंबीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान ट्रम्प यांनी शटडाउन संपवण्याचा दिशेने वरिष्ठ सभागृह सिनेटने पाऊल उचलेल असल्याचे म्हटले आहे.

शटडाऊन लवकरच संपणार…?

अमेरिकेचे फंडिग बिल पास न झाल्याने १ ऑक्टोबरपासून अमेरिकेत शटडाऊन सुरु आहे मुख्य कारण म्हणजे हेल्थ केअर सबसिडीवरील रिपल्बिकन आणि डेमोक्रॅट्स मधील मतभेद आहेत. डेमोक्रॅट पक्षाने या हेल्थ केअर सबसिडीत वाढ करण्याची मागणी केली होती, जी मान्य करण्यास रिपब्लिकन पक्षाने नकार दिला होता. परंतु आता यावर चर्चा होणार आहे. यासाठी डेमोक्रॅट पक्षाच्या नेत्यांच्या एका समूहाने हमीशिवाय आरोग्य सेवा अनुदान वाढविण्याच्या चर्चेवर सहमती दिली आहे. यामुळे ही चर्चा झाली की योग्य तो निर्णय घेऊन शटडाउन संपवले जाईल असे म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटले?

ट्रम्प यांनी शटडाऊनवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, आम्ही शटडाऊन संपवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत आणि त्याच्या अगदी जवळ आहोत. आपल्या देशात येणाऱ्या कैद्यांना आणि बेकायदेशी स्थलांतरितांना पैस देण्यास आम्ही सहमत नाही. मला वाटते की, डेमोक्रॅट्सच्या हे लक्षात आले आहे. यामुळे आता नक्कीच शटडाऊन संपेल.

अमेरिकेच्या सिनेटमध्ये निधी विधेयक मंजूर न झाल्याने शटडाऊन सुरु झाले. आतापर्यंत ११ वेळा मतदान करण्यात आले, पण ट्रम्प सरकारला ६० पैकी केवळ ५५ मते मिळाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून शटडाउन सुरु असल्याने याचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणा झाला आहे. तसेच याचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवरही परिणा झाला आहे.

काय असते शटडाऊन?

प्रत्येक देश आपल्या देशाचा वार्षिक खर्च निश्चित करतो असतो. जर या खर्चावर सरकारमध्ये राजकीय मतभेद किंवा एकमत झाले नाही तर सरकारकडे कायदेशीररित्या निधी नसतो. अशा परिस्थिती सरकारला अनावश्यक सेवा बंद कराव्या लागतात. ज्याला सरकारी शटडाउन म्हणतात. अमेरिकेत रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रॅट्समधील आरोग्य सेवांवरील सबसिढी वाढवण्याचा मतभेदांमुळेच सरकारी कामकाज ठप्प झाले होते. पण ट्रम्प यांनी आता हे शटडाउन लवकरच संपणार असल्याचा दावा केला आहे. यामुळे सध्या सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.

America Shutdown : शटडाऊनमुळे अमेरिकेत बिकट परिस्थिती; SNAP योजनेवर तात्पुरत्या स्थगितीमुळे सामान्यांचे हाल

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेत किती दिवसांपासून सुरु आहे शटडाऊन?

    Ans: अमेरिकेत गेल्या ४० दिवसांपासून सुरु आहे शटडाऊन?

  • Que: अमेरिकेच्या शटडाऊन संपवण्यावर ट्रम्प यांनी काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: ट्रम्प यांनी शटडाऊनवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, आम्ही शटडाऊन संपवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत आणि त्याच्या अगदी जवळ आहोत.

Web Title: Us government shutdown update trump says we are step towrds ending it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 12:46 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Hajj Pilgrim: भारत-सौदी अरेबियात २०२६ च्या हज यात्रेसाठी करार; यात्रेकरुंना मिळणार चांगल्या सुविधा
1

Hajj Pilgrim: भारत-सौदी अरेबियात २०२६ च्या हज यात्रेसाठी करार; यात्रेकरुंना मिळणार चांगल्या सुविधा

Trump’s Tariff Gift: ट्रम्पची मोठी घोषणा! टॅरिफमधून मिळणारा पैसा थेट अमेरिकन नागरिकांच्या खात्यात?
2

Trump’s Tariff Gift: ट्रम्पची मोठी घोषणा! टॅरिफमधून मिळणारा पैसा थेट अमेरिकन नागरिकांच्या खात्यात?

World Science Day 2025 : जाणून घ्या कशी झाली या दिवसाची सुरुवात आणि काय आहे यंदाची थीम?
3

World Science Day 2025 : जाणून घ्या कशी झाली या दिवसाची सुरुवात आणि काय आहे यंदाची थीम?

हरदीप सिंग निज्जर हत्याकांड पुन्हा चर्चेत! ब्रिटिश गुप्तचरांचा भारताशी संबंध असल्याचा धक्कादायक दावा?
4

हरदीप सिंग निज्जर हत्याकांड पुन्हा चर्चेत! ब्रिटिश गुप्तचरांचा भारताशी संबंध असल्याचा धक्कादायक दावा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.