America Shutdown : अमेरिकेत शटडाऊनमुळे हवाई सेवेवर मोठा परिणाम ; दोन दिवसांत हजारो उड्डाणे रद्द, 'या' देशांवरही परिणाम (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
America Shutdown News Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये (America) सध्या सरकारी कामकाज ठप्प झाल्याने मोठा गोंधळ सुरु आहे. अमेरिकेचे फंडिग बिल पास न झाल्याने १ ऑक्टोबरपासून अमेरिकेत शटडाऊन सुरु आहे. यामुळे लाखो कर्मचारी विना वेतन सुट्टीवर आहेत. तर काही महत्त्वपूर्ण सेवा सुरु आहेत, परंतु कर्मचाऱ्यांना अद्याप पगार मिळालेला नाही. याचा सर्वात जास्त परिणाम अमेरिकेच्या हवाई सेवेवर झाला आहे.
अमेरिकेच्या हवाई सेवेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून हजारो उड्डाणे रद्द झाले आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याचा अमेरिकेच्या उद्योगावर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तज्ज्ञांच्या मते, १०% पर्यंत आणखी उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे.
शनिवारी दुपारी १३० हून अधिक उड्डाणे शार्लोट विमानतळावरुन रद्द करण्यात आली आहे. अटलांटा, शिकागो, डेन्व्हर, आणि न्यूजर्सीमधील नेवार्क विमानतळावर मोठा गोंधळ उडाला आहे.
सध्या शटडाउनमुळे अमेरिकन कर्मचारी पगाराशिवाय काम करत आहेत. परंतु बरेच कर्मचारी रजेवर असल्याने कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण झाली आहे. यामुळे न्यूयॉर्कसह अनेक विमानतळांवरली उड्डाणे रद्द किंवा विलंबित करण्यात आली आहे. जर शटडाउन असेच सुरु राहिले तर हवाई वाहतूक सेवेवर अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या या शटडाउनचा परिणाम केवळ अमेरिकेपुरता मर्यादित राहिलेला नाही. यामुळे अमेरिकेत लष्करी तळांवर कार्य करणाऱ्या युरोपीयन देशातील कर्मचाऱ्यांवरही होत आहे. इटली, पोर्तुगाल, आणि अनेक ठिकाणी हजारो कर्मचारी पगाराशिवाय काम करत आहेत. शिवाय उड्डाणे रद्द झाल्याने अनेक हवाई प्रवाशांसाठी आणि व्यापारासाठी आव्हानात्मक ठरत आहे.
अमेरिकेच्या शटडाऊनमुळे याचा सामान्य. जनतेवरही मोठा परिणाम होत आहे. यामुळे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने SNAP (Supplemental Nutrition Assistance Program) म्हणजेच अन्नधान्य सहाय्य योजनेच्या निधी वितरणाला तात्पुरती स्थिगती दिली आहे. परंतु यामुळे लोकांना रोजच्या अन्नासाठी धडपड करावी लागत आहे.
का सुरु आहे शटडाऊन?
या शटडाउनमागे मुख्य कारण म्हणजे हेल्थ केअर सबसिडीवरील रिपल्बिकन आणि डेमोक्रॅट्स मधील मतभेद आहे. डेमोक्रॅट पक्षाने या हेल्थ केअर सबसिडीत वाढ करण्याची मागणी केली आहे, मात्र ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने याला नकार दिला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या मते, सबिसिडी वाढवल्यास सरकारचा खर्च वाढेल आणि याचा इतर विभागांवर विपरित परिणाम होईल.
Ans: अमेरिकेतील शटडाऊनमुळे अमेरिकेच्या हवाई वाहतूक सेवेवर मोठा परिणाम होत आहे.
Ans: अमेरिकेत गेल्या दोन दिवसांत हजारो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
Ans: अमेरिकेच्या शटडाउनचा परिणाम इटली, पोर्तुगाल, आणि आसपासच्या देशांवर जिथे अमेरिकन हवाई सेवा कार्यरत आहे अशा ठिकाणी झाला आहे.






