US halts tariffs on Canada, Mexico for 30 days
वॉशिंग्टन: राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हातील घेताच देशाच्या सुरक्षेसाठी आणि अमंली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर आयात शुल्क लागू केला होता. त्यांच्या या निर्णयाने तीन्ही देशांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या कराच्या प्रत्युत्तरदाखल कॅनडा आणि मेक्सिकोने कर लादण्याची धमकी दिली होती. त्यानंतर चीननेही अमेरिकेच्या उत्पादनांवर 10 ते 15 टक्के कर लागू केला होता.
कॅनडा आणि मेक्सिकोला 30 दिवसांची सवलत
मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडाच्या पंतप्रधानांशी चर्चा झाल्यानंचर दोन्ही देशांना करातून 30 दिवसांची सूट दिली आहे. सोमवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ट्रम्प यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. त्यानंतर ट्रुडोंनी जाहीर केले की, अमेरिकेने लादलेले टॅरिफ 30 दिवसांसाठी स्थगित केले आहे. मेक्सिकोला देखील 30 दिवसांसाठी ट्रम्प यांनी सवलत दिली होती. ही सवलत त्यानंतर देण्यात आली आहे, जेव्हा दोन्ही देशांनी सीमा सुरक्षा आणि अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले, “मी या सुरुवातीच्या परिणामांवर खूश आहे आणि शनिवारी जाहीर केलेले टॅरिफ 30 दिवसांसाठी स्थगित करत आहे. या काळात कॅनडासोबत अंतिम आर्थिक करार शक्य आहे का, हे पाहिले जाईल. हे सर्वांसाठी योग्य ठरेल.”
कॅनडा यांचा ड्रग तस्करीविरोधी लढा
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी एक्सवर पोस्ट करत सांगितले की, “हे स्थगिती फक्त तेव्हाच राहील, जेव्हा आपण एकत्र काम करू.” त्यांनी पुढे म्हटले की, कॅनडाचे सरकार ड्रग माफियांचे नाव जाहीर करेल आणि मेक्सिकोतील ड्रग कार्टेलना दहशतवादी गट म्हणून घोषित करेल. तसेच, अमली पदार्थांची तस्करी, मनी लाँडरिंग आणि संघटित गुन्हेगारीशी लढा देण्यासाठी कॅनडा-अमेरिका संयुक्त विशेष दल स्थापन करण्यात येईल.
चीनसाठी कोणतीही सवलत नाही
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागण्यांना स्वीकारत मेक्सिकोनेही अमेरिका-मेक्सिको सीमारेषेवर 10 हजार नॅशनल गार्ड्सची तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ट्रम्प प्रशासनाने चीनला कोणतीही सवलत दिलेली नाही. मात्र, येत्या काही दिवसांत ट्रम्प लवकरच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करण्याचा विचार करत आहेत.
व्यापार युद्धाचा धोका कायम
मात्र, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार व्यापार युद्धाचा धोका आत्तापर्यंत टळला असला, तरी ट्रम्प प्रशासन भविष्यात पुन्हा टॅरिफ वाढवू शकतो. कॅनडा आणि मेक्सिकोला सध्या थोडीशी दिलासा मिळाला असला, तरी ट्रम्प सहजपणे नव्या करारांसाठी टॅरिफ पुन्हा लागू करू शकतात. तसेच, ते लवकरच युरोपियन युनियनमधून येणाऱ्या उत्पादनांवर टॅरिफ लावण्याचा विचार करत आहेत.