पंतप्रधानांच्या अमेरिकी दौऱ्याची तारीख ठरली; अखेर पाच वर्षांनी होणार मोदी-ट्रम्प भेट, जाणून घ्या काय असेल खास... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: अखेर पाच वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आमि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार आहे. 13 फेब्रुबवारी रोजी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. सध्या ते फ्रान्समधील AI समिटमध्ये सहभागी होण्यासाठी गेले आहेत. या समिटनंतर 12 फेब्रुवारीला वॉशिंग्टन डीसीला पोहोचतील आणि 14 फेब्रुवारीपर्यंत हा दौरा असणार आहे. या भेटीदरम्यान, व्हाइट हाऊस येथे दोन्ही नेत्यांची अधिकृत बैठक होणार आहे.
ट्रम्प यांच्या वतीने नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ विशेष डिनरचे आयोजन करण्यात येणार आहे, जिथे अनेक प्रसिद्ध अमेरिकी हस्ती उपस्थित राहतील. ही बैठक गेल्या पाच वर्षानंचर होत असून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ही भेट भारत-अमेरिका संबंधांमदील वाढत्या सहाकर्याचे प्रतीक आहे. यापूर्वी 2019 मध्ये ह्यूस्टनमध्ये “हाउडी मोदी” कार्यक्रम झाला होता, तर 2020 मध्ये ट्रम्प यांनी भारत भेटीत “नमस्ते ट्रम्प” कार्यक्रमात भाग घेतला होता.
यावेळी होणाऱ्या चर्चेमध्ये व्यापार, संरक्षण, आणि जागतिक सुरक्षा यांसारख्या विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.
व्यापार संतुलन: राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील नुकत्याच झालेल्या संवादानुसार अमेरिका-भारत व्यापार संबंधांना अधिक समतोल करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली होती. अमेरिकेच्या हितसंबंधांसाठी योग्य व्यापार धोरण ठरवण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात येणार आहे.
संरक्षण क्षेत्रातील सहकार्य: तसेच भारत-अमेरिका संरक्षण संबंध अधिक मजबूत करण्यासाठी अमेरिकन बनावटीच्या संरक्षण उपकरणांच्या खरेदीबाबतही चर्चा अपेक्षित आहे. भारताच्या संरक्षण क्षेत्रात अमेरिकेच्या गुंतवणुकीला चालना देण्यासाठी काही नव्या करारांवर सहमती होण्याची शक्यता आहे.
जागतिक आणि क्षेत्रीय सुरक्षा: याशिवाय दोन्ही नेते इंडो-पॅसिफिक सुरक्षा वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत. विशेषत: चीनच्या वाढत्या प्रभावाला तोंड देण्यासाठी नवी रणनीती आखण्यात येऊ शकते. तसेच, रशिया-युक्रेन संघर्ष, मध्य पूर्वी सुरक्षेचे प्रश्न, आणि युरोपमधील अस्थिरता यासंबंधीही चर्चा होण्याची शक्यता आहे.
क्वाड
अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश असलेल्या “क्वाड” समूहाच्या सहकार्याला चालना देण्याची ट्रम्प यांची योजना आहे. मोदी-ट्रम्प बैठक झाल्यानंतर ट्रम्प लवकरच भारत भेटीवर येणार असून, त्या दौऱ्यात “क्वाड” परिषद होणार आहे.
या भेटीद्वारे भारत आणि अमेरिकेचे संबंध नव्या उंचीवर जाण्याची शक्यता आहे. व्यापार, संरक्षण आणि रणनीतिक सहकार्य अधिक दृढ होईल. तसेच, या सहयोगाचा जागतिक सत्ता संतुलनावर मोठा परिणाम होईल आणि चीनच्या विस्तारवादी धोरणांना प्रत्युत्तर देण्यासाठी नवे आंतरराष्ट्रीय आघाडी उभारली जाईल.