Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

White House Protest: इराण युद्धाला 15 दिवसांचा ‘विश्राम’! ट्रम्प यांच्या निर्णयाने वॉशिंग्टन पेटलं; व्हाईट हाऊसला आंदोलकांचा वेढा

White House Protest: पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील १५ दिवसांचा हल्ला स्थगित केला आहे. दरम्यान, या निर्णयाविरोधात वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसबाहेर मोठी निदर्शने सुरू झाली आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 08, 2026 | 03:12 PM
us iran ceasefire 15 days trump pakistan mediation white house protests 2026

us iran ceasefire 15 days trump pakistan mediation white house protests 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • १५ दिवसांचा शस्त्रसंधी
  • व्हाईट हाऊसला घेराव
  • होर्मुझची अट

US Iran ceasefire 15 days April 2026 : जागतिक राजकारणात गेल्या काही तासांत अशा घडामोडी घडल्या आहेत, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. इराणवर विनाशकारी हल्ले करण्याची भाषा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अचानक १५ दिवसांचा युद्धविराम (Ceasefire) जाहीर केला आहे. या निर्णयाने जगाला दिलासा मिळाला असला तरी, खुद्द अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये मात्र अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रम्प यांच्या या ‘यू-टर्न’मुळे संतप्त झालेल्या हजारो अमेरिकन नागरिकांनी व्हाईट हाऊसला घेराव घातला असून, तिथे मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आले आहे.

पाकिस्तानची मध्यस्थी आणि ट्रम्प यांचा ‘ट्रुथ सोशल’वर धमाका

या संपूर्ण युद्धविरामाच्या मागे पाकिस्तानची मोठी भूमिका असल्याचे समोर आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवर स्वतः ही माहिती दिली की, त्यांनी इराणवरील बॉम्बहल्ले आणि लष्करी कारवाई दोन आठवड्यांसाठी स्थगित केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करी प्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर ट्रम्प यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. आता अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी इस्लामाबादमध्ये समोरासमोर बसून शांततेसाठी चर्चा करतील. विशेष म्हणजे, इस्रायलनेही सध्यापुरते इराणवरील हल्ले थांबवण्यास संमती दिली आहे.

🔥 We say NO to one-party state! Democracy must stand!
🗣️ Protesters started assembling early this morning many ready to march towards INEC. pic.twitter.com/73ba5EFkC5
— Naija360 (@Naija360_) April 8, 2026

credit – social media and Twitter

होर्मुझची सामुद्रधुनी: ट्रम्प यांची मोठी अट

हा १५ दिवसांचा शस्त्रसंधी केवळ तात्पुरता दिलासा नसून त्यामागे ट्रम्प यांनी एक मोठी अट ठेवली आहे. इराणने तातडीने ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) जागतिक व्यापारासाठी पुन्हा उघडली पाहिजे. जर इराणने या सागरी मार्गावरील नाकेबंदी हटवली नाही, तर १५ दिवसांनंतर अमेरिका पुन्हा आपल्या लष्करी मोहिमेला सुरुवात करेल. या अटीमुळे इराणवर आता जागतिक दबाव वाढला असून, तेलाच्या किमती नियंत्रणात येण्याची आशा निर्माण झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Crisis: इराण संकटात पाकिस्तानची स्क्रिप्ट व्हाईट हाऊसने लिहिली? शहबाज शरीफ यांची ती ‘पोस्ट’ धक्कादायक अन् पुरावे VIRAL

वॉशिंग्टनमध्ये उद्रेक: “हा ट्रम्प यांचा कमकुवतपणा!”

एककीडे शांततेची चर्चा सुरू असताना दुसरीकडे वॉशिंग्टनमध्ये मात्र तणाव वाढला आहे. व्हाईट हाऊसबाहेर जमलेल्या आंदोलकांचा असा आरोप आहे की, ट्रम्प यांनी इराणसमोर गुडघे टेकले आहेत. या आंदोलकांच्या मते, इराणला १५ दिवसांचा वेळ देणे म्हणजे त्यांना पुन्हा लष्करी ताकद गोळा करण्याची संधी देण्यासारखे आहे. आंदोलकांनी “No Deal with Iran” आणि “Strong America” अशा घोषणा देत व्हाईट हाऊसचा परिसर दणाणून सोडला आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, व्हाईट हाऊसच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त लष्करी तुकड्यांना पाचारण करावे लागले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जागतिक वारसस्थळांची जबाबदारी कोणाची? युद्धामध्ये भक्ष्यस्थानी वारसास्थळे अन् इतिहासाचे साक्षीदार

इस्लामाबाद ठरणार शांतीदूत की युद्धाचा नवा तळ?

आता संपूर्ण जगाचे लक्ष पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादकडे लागले आहे. दोन्ही देशांमधील राजनैतिक संवाद पुन्हा सुरू करणे हा या १५ दिवसांच्या ब्रेकचा मुख्य उद्देश आहे. विश्लेषकांच्या मते, हा केवळ तात्पुरता संघर्ष थांबवणे नसून, एका चिरस्थायी शांततेसाठी केलेली धडपड आहे. जर इस्लामाबादमधील चर्चा यशस्वी झाली, तर मध्य-पूर्वेतील युद्धाचे ढग विरळ होऊ शकतात. मात्र, जर ही चर्चा निष्फळ ठरली, तर १५ दिवसांनंतर आखाती देशांत पुन्हा एकदा बॉम्बचा वर्षाव सुरू होण्याची भीती आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिका आणि इराणमध्ये किती दिवसांचा युद्धविराम झाला आहे?

    Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर होणारे हल्ले १५ दिवसांसाठी स्थगित केले असून, हा निर्णय पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर घेण्यात आला आहे.

  • Que: वॉशिंग्टन डीसीमध्ये व्हाईट हाऊसबाहेर आंदोलने का होत आहेत?

    Ans: अनेक अमेरिकन नागरिक या युद्धविरामाला ट्रम्प प्रशासनाचे कमकुवत पाऊल मानत आहेत, त्यामुळे ते या निर्णयाचा निषेध करत आहेत.

  • Que: युद्धविरामासाठी ट्रम्प यांनी कोणती मुख्य अट ठेवली आहे?

    Ans: इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडली पाहिजे, ही ट्रम्प यांची सर्वात प्रमुख आणि अनिवार्य अट आहे.

Web Title: Us iran ceasefire 15 days trump pakistan mediation white house protests 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Protester
  • World news

संबंधित बातम्या

‘I Love Modi…’ : दिल्लीतील कार्यक्रमात Donald Trump यांचा थेट व्हिडिओ कॉल; स्वत:ला केलं PM मोदींचा मोठा फॅन घोषित
1

‘I Love Modi…’ : दिल्लीतील कार्यक्रमात Donald Trump यांचा थेट व्हिडिओ कॉल; स्वत:ला केलं PM मोदींचा मोठा फॅन घोषित

Thailand Visa Rules : थायलंडचा भारतीयांना मोठा दणका! ६० दिवसांची Visa Free Entry बंद; ‘हा’ नवा नियम लागू
2

Thailand Visa Rules : थायलंडचा भारतीयांना मोठा दणका! ६० दिवसांची Visa Free Entry बंद; ‘हा’ नवा नियम लागू

अमेरिकेने इशारा समजावा की दुसरं काय…रशियाकडून तेल घेतच राहणार भारत, परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांचं थेट विधान
3

अमेरिकेने इशारा समजावा की दुसरं काय…रशियाकडून तेल घेतच राहणार भारत, परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांचं थेट विधान

Iran Peace Deal: अमेरिका आणि इराण ६० दिवसांच्या सीझफायरवर सहमत; होर्मुझची सामुद्रधुनी होणार सर्वांसाठी खुली
4

Iran Peace Deal: अमेरिका आणि इराण ६० दिवसांच्या सीझफायरवर सहमत; होर्मुझची सामुद्रधुनी होणार सर्वांसाठी खुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.