Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Ceasefire : होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार! अमेरिकेसोबतच्या युद्धबंदीवर इराणकडून विजयाची घोषणा, पण हात अजूनही ट्रिगरवर?

US Iran Ceasefire : मध्यपूर्वेतील तणाव अखेर दोन आठवड्यांसाठी थांबला आहे. अमेरिका इराणमध्ये युद्धबंदीवर १० एप्रिलपासून चर्चा सुरु होणार आहे. परंतु इराणने त्यांच्यावर पुन्हा हल्ला झाल्यास प्रत्युत्तराचा इशाराही दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 08, 2026 | 09:49 AM
Iran Claims Victory in War with US

Iran Claims Victory in War with US

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका इराणमध्ये दोन आठवड्यांची शस्त्रसंधी लागू
  • इराणची विजयाची घोषणा
  • पण दिला हा गंभीर इशारा
US Iran Ceasefire News in Marathi : वॉशिंग्टन : गेल्या काही काळापासून जागतिक शांततेसाठी धोका ठरलेल्या इराण आणि अमेरिका संघर्षाला अखेर तात्पुरता विराम मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दोन आठवड्यांच्या युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर इराणने याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. परंतु ही केवळ युद्धबंदी आहे युद्धाचा अंत नाही, असाही कडक इशारा दिला आहे. सध्या ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इराणमध्ये युद्धबंदीचा विजय साजरा केला जात आहे.

दिलासादायक ! इराण-अमेरिका युद्ध अखेर थांबले; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाची घोषणा, इंधनाचा पुरवठाही सुरळीत होणार

इराण होर्मुझ खुला करण्यास तयार पण…

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, जर आमच्यावरील हल्ले थांबवले गेले, तर आमच्या सैन्य देखील संरक्षणात्मक हल्ले थांबवले. पुढील दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी इराणच्या सशस्त्र दलांशी समन्वय साधू आणि तांत्रिक मर्यादा घालू, तसेच होर्मुझची सामुद्रधुनी देखील खुली केली जाईल असे त्यांनी म्हटले.

इराणने असाही इशारा दिला की, आम्ही युद्धबंदी स्वीकारत आहोत, पण हात आमचा अजूनही ट्रिगरवर आहे. शत्रूने थोडी जरी चूक केली, त्यांच्यावर भविष्यात हल्ला केला तर त्याला पूर्ण ताकदीने उत्तर दिले जाईल असा कडक आणि स्पष्ट इशारा इराण(Iran)ने दिला आहे.

ट्रम्प यांचा शांतता कराराचा दावा

दुसरीकडे, अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये देखील आनंद साजरा केला जात आहे. इराणविरुद्ध युद्धात अमेरिकेचा विजयाची घोषणा करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी दावा केला आहे की, इराणमध्ये अमेरिकेची सर्वा लष्करी उद्दिष्टे पूर्ण झाली आहेत. त्यांनी इराणसोबत दीर्घकालीन शांतता करार अगदी जवळ असल्याचा दावा केला आहे.

पाकिस्तानची मध्यस्थी अन् १० कलमी प्रस्ताव

अमेरिका इराण तणाव (US Iran Conflict) निवळण्यात पाकिस्तानने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अमेरिका आणि इराण दोन्ही बाजूंनी युद्धविरामाची घोषणा करताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करी प्रमुख असीम मुनीर (Asim Munir) यांच्या प्रयत्नांमुळे तात्पुरती युद्धबंदी लागू झाल्याचे म्हटले आहे. तसेच इराणने अमेरिकेसमोर १० कलमी प्रस्ताव मांडला असून अमेरिकेने तो मान्य केला आहे. यावर १० एप्रिलपासून पाकिस्तान(Pakistan)च्या इस्लामाबाद येथे  चर्चा सुरु होणार आहे.

Statement on behalf of the Supreme National Security Council of the Islamic Republic of Iran: pic.twitter.com/cEtBNCLnWT — Seyed Abbas Araghchi (@araghchi) April 7, 2026


US Iran Ceasefire : होर्मुझपासून ते नुकसानभरपाईपर्यंत… इराणच्या अटींसमोर झुकणार ट्रम्प? शांतता टिकणार का?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराण अमेरिकेत किती दिवसांच्या युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे?

    Ans: इराण अमेरिकेत दोन आठवड्यांच्या (१४ दिवस) शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली आहे.

  • Que: इराणने अमेरिकेला कोणता इशारा दिला आहे?

    Ans: इराणने युद्धबंदी स्वीकारली असून होर्मुझ दोन आठवड्यांसाठी खुला करण्याचा इशारा दिला आहे. तसेच त्यांच्यावरील हल्ले थांबवले तर संरक्षणात्मक कारवाया थांबवल्या जातील असेही इराणने म्हटले आहे. परंतु शत्रूने त्यांच्यावर पुन्हा हल्ला केल्यास त्यांना पूर्ण ताकदीने उत्तर दिले जाईल असे इराणने म्हटले आहे.

Web Title: Us iran ceasefire talks strait of hormuz iran claisms victory warns trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 09:44 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
1

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी
2

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट
3

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी
4

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.