Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Conflict : युद्धाचा धोका टळला? अमेरिका आणि इराण हल्ले थांबवण्यास तयार; कतारमध्ये ‘होर्मुझ’बाबत होणार महत्त्वाची बैठक

US Iran Conflict Update : अमेरिका आणि इराणने एकमेकांवरील परस्पर हल्ले थांबवण्यास सहमती दिली आहे. दोन्ही देशांमध्ये कतारमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार असून यामध्ये होर्मुझवर कायस्वरुपी तोडगा काढण्यावर चर्चा होईल.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 29, 2026 | 09:21 AM
US-Iran Ceasefire Talks

US-Iran Ceasefire Talks

Follow Us
Follow Us:
  • युद्धाचा धोका टळला?
  • अमेरिका आणि इराण हल्ले थांबवण्यास तयार
  • कतारमध्ये ‘होर्मुझ’बाबत होणार महत्त्वाची बैठक
US Iran Conflict : तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे ढग गडद होत असतानाच एक दिलासादायक वृत्त समोर आले आहे. अमेरिका आणि इराणने परस्पर लष्करी हल्ले थांबवण्याचे मान्य केले आहे. दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला असून एका मोठ्या संघर्षाची भीती निर्माण झाली होती. परंतु सध्या दोन्ही देशांनी मवाळ भूमिका घेत होर्मुझवर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कतारमध्ये आज होर्मुझबाबत महत्त्वपूर्ण चर्चा पार पडेल.

Sheikh Hasina : ‘मला मृत्यूची भीती नाही’ , हसीना यांचा विरोधकांना मोठा इशारा; बांगलादेशच्या Ex PM लवकरच मायदेशी परतणार?

युद्धविरामानंतरच हल्ले सुरुच

दोन्ही देशांमध्ये १८ जून रोजी ६० दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती. यानंतर या ६० दिवसांच्या कालवधीत शांतता चर्चा पार पडणार होती. परंतु युद्धविराम लागू झाल्याच्या एक आठवड्यानंतरच अमेरिकेने इराणवर हल्ला केला. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने देखील आखाती देशांमधील अमेरिकन तळांना लक्ष्य केले. दोन्ही देश एकमेकांवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप करत होतो. यामुळे शांतता करार मोडकळीस येण्याची शक्यता निर्माण झाली होती.

कतारमध्ये होणार निर्णायक बैठक

परंतु आता दोन्ही देश हल्ले आणि आक्रमक कारवाया थांबवण्यास तयार आहेत. अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, यासाठी कतारची राजधानी दोहा येथे निर्णयाक बैठक होणार आहे. मंगळवारी (३० जून) स्ट्रेट ऑफ होर्मुझबाबत सुरु असलेला वादावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात येईल असे अधिकाऱ्याने म्हटले.

ट्रम्प यांचा इशारा

या कराराआधी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी इराणने हल्ले थांबवले नाही, तर त्यांना जगाच्या नकाशावरुन पुसून टाकण्यात येईल. यासाठी कोणतीही कारवाई करायला अमेरिका सज्ज आहे असा इशारा त्यांनी दिला होता. तर अमेरिकेने युद्धविरामाचे उल्लंघन केल्यास सर्व राजनैतिक चर्चा आणि इतर मार्ग बंद करु असे इराणने स्पष्ट केले होते.

होर्मुझमधील परिस्थिती

सध्या दोन्ही देशांमध्ये वाटाघाटीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या काळात होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची ये-जा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरु राहिल असे सांगितले जात आहे. पण तणाव कायम आहे. यामुळे कतारमध्ये होणार बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अद्याप यावर इराणकडून प्रतिक्रिया न आल्याने परिस्थिती अत्यंत नाजूक मानली जात आहे.

France Heatwave : फ्रान्समध्ये विक्रमी तापमानाचा कहर! हीटवेव्हमुळे हजारो नागरिकांचा बळी, जेष्ठ नागरिकांना सर्वाधिक फटका

Web Title: Us iran conflict ceasefire talks qatar hormuz meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 09:16 AM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.