Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 18 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran डीलमध्ये पुन्हा पेच! अणु करार, शांतता करार की फक्त MoU ; ट्रम्प यांच्या विधानामुळे गोंधळ

US-Iran Deal Upadate : अमेरिका-इराणमध्ये १०७ दिवसांपासून सुरु असलेल्या संघर्ष आता थांबणार आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता कराराच्या MoU वर डिजिटल स्वाक्षरी करण्यात आली आहे. परंतु यावरुनही मोठा पेच निर्माण झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 18, 2026 | 02:02 PM
Trump

Trump

Follow Us
Follow Us:
  • US Iran डीलमध्ये पुन्हा पेच!
  • अणु करार, शांतता करार की फक्त MoU ?
  • ट्रम्प यांच्या विधानामुळे गोंधळ
US-Iran Peace Deal News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका-इराणमधील दीर्घकाळापासून सुरु असलेला संघर्ष आता संपुष्टात येणार आहे. दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी शांतता कराराच्या MoU वर स्वाक्षरी केली आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय राजकाराणात मोठा चर्चा सुरु झाली आहे. ट्रम्प यांनी इराणसोबत डील पूर्ण झाल्याचे जाहीर केले आणि आनंद व्यक्त करत सर्वांचे अभिनंदनही केले. परंतु हा करार नेमका अणु करार आहे, शांतता करार आहे की केवळ सामंजस्य करार आहे याबाबत पेच निर्माण झाला आहे.

‘It’s Signed’ : अखेर युद्ध थांबणार! अमेरिका-इराण शांतता करारावर डिजिटल स्वाक्षरी; ६० दिवसांच्या युद्धबंदीची घोषणा

अमेरिकन माध्यमांमध्ये कराराला विविध नावे

अमेरिकेन माध्यमांनी या कराराला विविध नावांनी संबधोले आहे. काही माध्यमांमध्ये शांततेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल म्हणण्यात आले आहे, तर काहींनी याला अणु कराराची सुरुवात असे म्हटचले आहे. परंतु सध्या अमेरिका-इराणच्या अधिकाऱ्यांकडून याला केवळ सामंजस्य करार असे सांगण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या केवळ डील शब्दाच्या वापरामुळे गोंधळ अधिक वाढला आहे.

इराणवर लष्करी कारवाईचे संकेत

आंतरराष्ट्रीय तज्त्रांच्या मते, राजनैतिक भाषेत डील हा शब्द अधिकृत नाही. तर करार, फ्रेमवर्क किंवा MoU अशा संज्ञा वापरल्या जातात. परंतु ट्रम्प सतत डीलमेकर म्हणून स्वत:ला सादर करत असतात आणि इराणसोबतच्या करारालाही त्यांनी डील म्हटले आहे. तसेच इराणने अटींचे पालन न केल्यास लष्करी कारवाईचे संकेतही त्यांनी दिले आहे. यामुळे खरेच शांतता करार झाला का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अणुकार्यक्रमावर मतभेद कायम

सध्या दोन्ही देशांत इराणच्या युरेनियम साठा, अणुकार्यक्रमावर निर्बंध आणि आंतरराष्ट्रीय तपसणी या महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन मतभेद कायम आहेत. येत्या ६० दिवसांत शस्त्रसंधी दरम्यान यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्या पूर्ण अणुकरार किंवा शांतता करार झाला नसून अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा बाकी आहे. परंतु ट्रम्प यांच्या वक्तव्यांमुळे संभ्रम निर्माण होत आहे.

करारातील अटी

अमेरिका इराणमधील सामंजस्य शांतता करार हा १४ सूत्री आहे. यामध्ये काही प्रमुख अटींची तरदूत आहे.

  • यामध्ये इराणला कच्चे तेल आणि पेट्रोकेमिकल्स विकण्यावर घालण्यात आलेल्या अटी व निर्बंध हटवले जातील.
  • याशिवाय इराणच्या आर्थिक संस्थांवरील निर्बंधही मागे घेण्यात येणार आहे.
  • अमेरिकेने इराणची गोठवलेली संपत्ती देखील निर्बंधमुक्त करण्यात आली आहे.
  • याशिवाय इराणला पुनर्बांधणीसाठी अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांकडून ३०० अब्ज डॉलर्स मिळणार आहे.
  • लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील युद्ध संपुष्टात येईल.
  • इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये अमेरिका हस्तक्षेप करणार नाही.
  • अमेरिकन सैन्य इराणच्या भागातून माघार घेईल.
  • होर्मुझचा मार्ग व्यापारी वाहतूकीसाठी ३० दिवसांच्या आत खुला केला जाईल.
  • इतर अणु काराराच्या आणि युरेनियमच्या अटींवर ६० दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे.
On Truth Social, US President Donald Trump posts, “The Deal with the Islamic Republic of Iran is now complete. Congratulations to all! I hereby fully authorize the toll free opening of the Strait of Hormuz, and, simultaneously herewith, authorize the immediate removal of the… pic.twitter.com/fPLg91aBTy— ANI (@ANI) June 14, 2026


India-Britain FTA : PM मोदींची मोठी घोषणा! भारत-ब्रिटन FTA १५ जुलै पासून लागू होणार, ९९% उत्पादनांना थेट फायदा

Web Title: Us iran deal confusion nuclear deal peace agreement or just mou

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

Four Seas Initiative: इराणच्या सर्वात घातक शस्त्राचा गेम ओव्हर; काय आहे आखाती देशांचा 10 अब्ज डॉलर्सचा ‘फोर सीज’ प्लॅन?
1

Four Seas Initiative: इराणच्या सर्वात घातक शस्त्राचा गेम ओव्हर; काय आहे आखाती देशांचा 10 अब्ज डॉलर्सचा ‘फोर सीज’ प्लॅन?

US-Iran War: ‘It’s signed… ‘मॅक्रॉन यांच्या शेजारी बसून ट्रम्प यांनी चालवले पेन; पाहा युद्धाला पूर्णविराम देणारा ‘तो’ VIRAL VIDEO
2

US-Iran War: ‘It’s signed… ‘मॅक्रॉन यांच्या शेजारी बसून ट्रम्प यांनी चालवले पेन; पाहा युद्धाला पूर्णविराम देणारा ‘तो’ VIRAL VIDEO

Saudi Arabia : सौदीत नोकरी मिळवणे आता होणार कठीण? ‘Qiwa Visa’ प्लॅटफॉर्मने व्हिसा कोट्यात केली मोठी कपात; पाहा नियम
3

Saudi Arabia : सौदीत नोकरी मिळवणे आता होणार कठीण? ‘Qiwa Visa’ प्लॅटफॉर्मने व्हिसा कोट्यात केली मोठी कपात; पाहा नियम

India-Britain FTA : PM मोदींची मोठी घोषणा! भारत-ब्रिटन FTA १५ जुलै पासून लागू होणार, ९९% उत्पादनांना थेट फायदा
4

India-Britain FTA : PM मोदींची मोठी घोषणा! भारत-ब्रिटन FTA १५ जुलै पासून लागू होणार, ९९% उत्पादनांना थेट फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.