Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War 2026 : डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका घोषणेने पेटले युद्ध; चाबहार बंदरासह इराणच्या 90 तळांवर अमेरिकेचा भीषण बॉम्बहल्ला

US Iran War 2026 : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर अमेरिकी लष्कराने हल्ले सुरू केले. चाबहार बंदरापासून ते मुसा बेटापर्यंत अनेक प्रमुख ठिकाणांना रात्रभरात लक्ष्य करण्यात आले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 09, 2026 | 11:20 AM
us iran war 2026 air strikes chabahar port donald trump

us iran war 2026 air strikes chabahar port donald trump

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका आणि इरानेमधील युद्धविराम संपल्यानंतर अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार इराणवर भीषण हवाई हल्ले सुरू केले आहेत.
  • अमेरिकन सेंट्रल कमांडने (CENTCOM) चाबहार बंदर, अबू मुसा बेट आणि बंदर अब्बाससह इराणच्या ९० हून अधिक लष्करी तळांना लक्ष्य केले आहे.
  • होर्मुझच्या सामुद्रधुनीतील व्यावसायिक जहाजांवर इराणने केलेल्या हल्ल्यांचा बदला म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

US Iran War 2026 : जगभरात पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला आहे. अमेरिका आणि इराणमधील तात्पुरता शांतता करार पूर्णपणे मोडीत निघाला असून अमेरिकेने इराणवर रात्रीच्या वेळी अत्यंत भीषण हवाई हल्ले सुरू केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपल्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांतच अमेरिकन लष्कराने या कारवाईला सुरुवात केली. इराणच्या चाबहार बंदरापासून ते थेट अबू मुसा बेटापर्यंतचे परिसर रात्रीच्या वेळी झालेल्या शक्तिशाली स्फोटांनी हादरून गेले आहेत.

ट्रम्प यांच्या घोषणेनंतर ‘सेंट्रल कमांड’ची मोठी कारवाई

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) अधिकृत निवेदन जारी करून या कारवाईची पुष्टी केली आहे. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष आणि कमांडर-इन-चीफ डोनाल्ड ट्रम्प यांच्या थेट निर्देशानुसार हे हल्ले करण्यात आले आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील (Strait of Hormuz) आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून प्रवास करणाऱ्या व्यावसायिक जहाजांवर आणि नागरी कर्मचाऱ्यांवर इराणने केलेल्या हल्ल्यांचा बदला म्हणून अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. इराणची नौकानयन क्षेत्रातील आक्रमक क्षमता पूर्णपणे नष्ट करणे हा या कारवाईचा मुख्य उद्देश असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ankara NATO Summit: ‘इराणचे नेते लबाड आहेत…’ ट्रम्प यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे शांतता करार धोक्यात

चाबहार ते अबू मुसा बेटापर्यंत स्फोटांचे सत्र; ९० लष्करी तळ उद्ध्वस्त

इराणी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सिरिक, बुशेहर, कोनारक आणि चाबहार या किनारपट्टीच्या भागात एकापाठोपाठ एक अनेक स्फोट झाले. अमेरिकेने इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणा, क्षेपणास्त्र आणि ड्रोन साठवणूक केंद्रे, आणि किनारपट्टीवरील पाळत ठेवणाऱ्या यंत्रणांसह तब्बल ९० लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले आहे. स्ट्रॅटेजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या चाबहार बंदरावर अमेरिकेने पहिल्यांदाच थेट हल्ला केला असून, यामुळे संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. याशिवाय, बुशेहरमधील इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या एरोस्पेस फॅमिली सेंटरलाही लक्ष्य करण्यात आले, जिथे मोठी आग लागल्याचे वृत्त आहे.

Footage shows a US airstrike on the Iranian port of Chabahar, destroying the main maritime control tower. pic.twitter.com/1p9KRDiziB — The Hormuz Letter (@HormuzLetter) July 8, 2026

credit – social media and Twitter

१७ जूनचा शांतता करार अवघ्या तीन आठवड्यांत कोसळला

अमेरिका आणि इराण यांच्यात १७ जून रोजी एका सामंजस्य करारावर (इस्लामाबाद मेमोरँडम) स्वाक्षरी झाली होती. या करारामुळे दोन्ही देशांमधील युद्ध थांबेल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नियंत्रणावरून दोन्ही देशांमधील चर्चा अपयशी ठरली. इराणने ७ जुलै रोजी या भागात तीन व्यावसायिक जहाजांवर बॉम्बफेक केली, ज्याला ट्रम्प यांनी कराराचे उल्लंघन मानले. ट्रम्प यांनी ‘नाटो’ (NATO) परिषदेत बोलताना स्पष्ट केले की, “इराणसोबतचा करार आता संपला आहे आणि ते ‘स्कम’ (Scum) आहेत. जर त्यांनी पुन्हा जहाजांवर हल्ले केले, तर परिस्थिती आणखी बिघडेल.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : NATO 2026 : एकात्मिक हवाई सुरक्षा ते ‘नाटो इंजिन’; रशिया-चीनच्या वाढत्या ताकदीला वेसण घालण्यासाठी पाश्चात्य देश सज्ज

इराणचा पलटवार आणि मध्यपूर्वेत हाय-अलर्ट

इराणनेही गल्फ देशांमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करत प्रत्युत्तर दिले आहे. इराणच्या या पलटवारामुळे बहरीन आणि कुवेतमध्ये हवाई हल्ल्यांचे सायरन वाजले. कुवेतच्या लष्कराने इराणकडून येणारे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, इराण सध्या त्यांचे दिवंगत सर्वोच्च नेते आयतोल्ला अली खामेनी यांच्या निधनामुळे राष्ट्रीय शोकात आहे. नियोजित वेळापत्रकानुसार आज ९ जुलै रोजी मशहद येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. या संवेदनशील काळातच अमेरिकेने इराणला घेरल्यामुळे मध्यपूर्वेतील (West Asia) तणाव सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे.

Web Title: Us iran war 2026 air strikes chabahar port donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला मोठा दावा; म्हणाले, ‘होर्मुझवर आमचं संपूर्ण नियंत्रण…’
1

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला मोठा दावा; म्हणाले, ‘होर्मुझवर आमचं संपूर्ण नियंत्रण…’

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध
2

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध

Natalie Harp: मेलानिया अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुराव्याचे कारण नॅटली हार्प? व्हाईट हाऊसमधील अंतर्गत वादाचा खळबळजनक खुलासा
3

Natalie Harp: मेलानिया अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुराव्याचे कारण नॅटली हार्प? व्हाईट हाऊसमधील अंतर्गत वादाचा खळबळजनक खुलासा

Sergio Gor: काश्मीरबाबत अमेरिकेची मोठी घोषणा; ‘जम्मू-काश्मीर भारताचाच भाग’ सर्जिओ गोर यांच्या विधानाने पाकिस्तानात खळबळ
4

Sergio Gor: काश्मीरबाबत अमेरिकेची मोठी घोषणा; ‘जम्मू-काश्मीर भारताचाच भाग’ सर्जिओ गोर यांच्या विधानाने पाकिस्तानात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.