
फोटो सौजन्य सोशल मीडिया
तसेच दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका निर्विवादपणे महासत्ता बनली . पण रशिया आणि अमेरिकेचे वाद काही केल्या संपले नाहीत . पण मिळालेल्या माहिती नुसार रशिया आणि युक्रेन मधील युद्ध सुरु असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रशियासोबतच्या कथित डिझेल खरेदी कराराची चर्चा रंगली आहे .
युक्रेनला पाठिंबा देणाऱ्या अमेरिकेने दुसरीकडे रशियाकडून इंधन खरेदी केल्याचा दावा समोर आल्याने अमेरिकेच्या धोरणावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत . मात्र या कराराची नेमकी माहिती आणि त्यातील अटी स्पष्ट नसल्याने या दाव्यांची स्वतंत्रपणे होणे आवश्यक आहे .
रशिया युक्रेन युद्धामुळे रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत . युक्रेनचा कल हा पाश्चिमात्य देशांकडे जाऊ लागल्यामुळे रशियाला हे पचायला जड लावू लागले . त्यामुळे युक्रेनला सहज आपण ताब्यात घेऊन विषय संपवून टाकू असे पुतिनचे मत झाल्यावर युक्रेनवर हल्ला झाला . तेव्हाच अमेरिका आणि युरोपीय देश युक्रेनच्या मदतीला धावून आले . अमेरिकेने युक्रेनला शस्त्रे पुरवली , रशियावर कडक आर्थिक निर्बंध लावले . एवढेच न्हवे तर भारताला सुद्धा रशियासोबत तेल व्यवहार करण्यास मनाई केली .
आणि दुसरीकडे इराण सोबत सुद्धा तेल व्यवहार करायला मनाई केली . पण स्वतः मात्र आता रशियाकडून तेल खरेदी करार करायला सुरवात केल्याच्या चर्चा जागतिक राजकीय विश्लेषकांच्यामध्ये सुरु झाल्या आहेत . तसेच रशियावर लावलेल्या निर्बंधांचा उद्देश रशियाच्या युद्धासाठी उपलब्ध होणाऱ्या आर्थिक स्रोतांवर मर्यादा आणणे हा आहे .
अशा परिस्थितीत अमेरिकेकडून रशियन डिझेल खरेदी केली जात असल्याचा दावा खरा ठरल्यास निर्बंधाच्या परिणामकारकतेबाबत प्रश्न उपस्थित होऊ शकतात . ऊर्जा व्यापारातून मिळणारे उत्पन्न रशियाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचे असल्याने या व्यवहाराकडे विशेष लक्ष दिले जात आहे .
Gaza News : धक्कादायक ;गाझामध्ये इस्रायली गोळीबारात आठ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
युक्रेनला पाठिंबा देणे आणि रशियावर आर्थिक दबाव ठेवणे ,या अमेरिकेच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर रशियासोबत इंधन व्यापार केल्याच्या दावा विरोधाभासी वाटू शकतो . मात्र कोणत्याही कराराचे स्वरूप ,त्यातील कंपन्या , व्यवहाराची तारीख आणि प्रत्यक्ष इंधनाचा स्रोत तपासल्याशिवाय ट्रम्प यांनी रशियासोबत मोठा डिझेल खरेदी करार केला ,असा सध्या तरी निष्कर्ष काढता येत नाही .
जागतिक इंधन बाजारात अनेक देश आणि कंपन्या वेगवेगळ्या पुरवठादारांकडून तेल व इंधन खरेदी करतात . त्यामुळे एखाद्या देशात पोहोचणाऱ्या इंधनाचा मूळ स्रोत आणि व्यवहारातील कंपन्यांची भूमिका महत्वाची ठरते . रशियन इंधनाशी संबंधित जर असा कोणताही व्यवहार असल्यास त्याची निर्बंधांमधील सूट आणि कायदेशीर अटी समजून घेणे आवश्यक आहे . यानंतरच अमेरिकेच्या धोरणावर अंतिम निष्कर्ष काढता येईल .