Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Explainer : इराणशी युद्धात अमेरिकेची Exit रणनीती! विजयाची घोषणा करुन युद्धाचे मैदान सोडणार ट्रम्प?

US Iran War Upate : इराण युद्ध आता अमेरिकेला बोझा वाटू लागले आहे. यामुळे अमेरिका या युद्धातून लवकरात लवकर बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळू लागले आहे. यासाठी एक एक्झिट प्लॅनही तयार करण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 29, 2026 | 05:30 PM
निर्णायक युद्धाच्या तयारीत अमेरिका

निर्णायक युद्धाच्या तयारीत अमेरिका

Follow Us
Follow Us:
  • तडजोड नाही, थेट विजयाची घोषणा
  • इराणसोबतच्या युद्धातून काढता पाय घेत आहेत ट्रम्प
  • काय आहे अमेरिकेची एक्झिट रणनीती
US Iran Policy : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका इराण युद्ध (US Iran War) आता एका आशा वळणावर येऊन पोहोचले आहे जिथे युद्ध आता मैदानावर नसून राजकीय डावपेच खेळले जात आहे. दोन्ही बाजूंनी शांतता चर्चेचे केवळ ढोंग सुरु आहे. यामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावारण निर्माण झाले आहे. युद्धामुळे होर्मुझ हा जागितक व्यापाराचा सर्वात महत्त्वाचा मार्ग बंद झाला आहे. ज्यामुळे इंधन आणि उर्जा संकटाचा जगाला सामना करावा लागत आहे. याच वेळी एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. ट्रम्प यांनी आता इराणशी शांतता चर्चा करण्याऐवजी एक वेगळीच एक्झिट रणनीती आखली आहे.

Trump King Controversy : व्हाईट हाऊसनं ट्रम्प यांना म्हटलं ‘राजा’ ; किंग चार्ल्स सोबतच्या ‘त्या’ पोस्टमुळे सर्वत्र खळबळ

‘आम्हीच जिंकलो’ चा डाव खेळणार ट्रम्प

मिळालेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) इराणसोबत कोणत्याही प्रकारची औपचारिक चर्चा न करता विजयाची घोषणा करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी अमेरिकेच्या गुप्तचर संस्था CIA कडून एक इनपुट मागवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासूनच्या संघर्षात अमेरिकेचे मोठे नुकसान झाले आहे.

शिवाय हे युद्ध एक राजकीय ओझे वाटू लागले आहे. यामुळे यातून अमेरिका लवकरच बाहेर पडण्याचे संकेत व्हाईट हाउसकडून मिळाले आहे.  तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प शांतता चर्चेला कंटाळले असून, या विजयात अमेरिकेचाच विजय झाल्याच्या संभ्रमाच आहेत. अमेरिकेचे उद्दिष्ठ साध्य झाले असे सांगून यातून माघार घेण्याचा ट्रम्प यांचा विचाक सुरु आहे.

काय आहेत यामागची कारणे?

ट्रम्प यांच्या अशा वागण्यामागे प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

  • अमेरिकेच्या निवडणुका : या वर्षाच्या अखेरिस अमेरिकेत मिटटर्म निवडणुका होणार आहे. युद्ध थांबले नाही तर निवडणुकीत ट्रम्प यांची रिपब्लिकन पार्टी बहुमत गमावू शकते. युद्धामुळे सध्या अमेरिकेत प्रचंड महागाई वाढली आहे. यामुळे लोकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्यामुळे लोक निवडणुकीत विरोधी पक्षाला मत देऊ शकतात. अशा परिस्थितीत युद्धाचा विषय लवकरात लवकर संपवण्यासाठी आम्हीच जिंकलो, आमच्यामुळेच शांतता आहे असा दिखावा ट्रम्प करु शकतात.
  • लोकप्रियतेत घट : सध्या युद्धाच्या निर्णयामुळे अमेरिकेत देशांतर्गत महागाई वाढत आहे. तसेच देशांतील अनेक समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. ज्यामुळे ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत घट होत आहे. ही घट निवडणुकीत विरोधी पक्षाला बहुमत मिळवून देऊ शकते. यामुळे कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा दोन्ही सभागृहात रिपब्लिकन पक्षाला मोठा हार स्वीकारावी लागेल.
  • इराणची भूमिका : सध्या इराणने नवीन प्रस्तावासाठी वेळ मागितला आहे. इराण त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमाशी कोणत्याही प्रकारे तडजोड करायला तयार नाही. सुप्रीम लीडरच्या परवानगीशिवाय यावर कोणतीही चर्चा होणार नाही असे इराणकडून सांगण्यात आले आहे. यामुळे युद्ध लांबणीवर पडत चालले आहे. यामुळेच अमेरिका आता चर्चेऐवजी थेट विजयाची घोषणा करुन बाहेर पडण्याची तयारी करत आहे.

अमेरिका यशस्वी होईल का?

सध्या दोन प्रमुख प्रश्न पडत आहेत. सध्या ट्रम्प यांची योजना अपयशी ठरण्याची चिन्हे अधिक आहेत. केवळ विजयाची घोषणा केल्याने युद्ध  थांबणार नाही तर
  • अमेरिकेने एकतर्फी विजयाची घोषणा केली, तर इराणची भूमिका काय असले?
  • दुसरा – इराणने विजय मान्य केला नाही, तर जागतिक स्तरावर अमेरिकेची प्रतिमा ढासळेल का?
यावर भविष्य ठरणार आहे. यामुळे शांतता येण्याऐवजी अस्थिरता निर्माण होण्याची जास्त शक्यता आहे.

Royal Visit: ‘माझ्या आईच किंग चार्ल्सवर प्रेम…’, व्हाईट हाऊसच्या साऊथ लॉनवर आठवणींची मधुर गुंफण; ट्रम्प यांची मिश्किल टोलेबाजी

Web Title: Us iran war donald trump plannig exit plan from war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Mojtaba Khamenei: इराणच्या सर्वोच्च नेत्यांशी बोलणे अत्यंत कठीण; राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी उकलले त्या ‘गुप्त’ भेटीचे गूढ
1

Mojtaba Khamenei: इराणच्या सर्वोच्च नेत्यांशी बोलणे अत्यंत कठीण; राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी उकलले त्या ‘गुप्त’ भेटीचे गूढ

Taiwan War Drills: सायरन वाजले अन् राष्ट्राध्यक्षांनी घातले बुलेटप्रूफ जॅकेट; तैवानच्या ‘हान कुआंग’ सरावाने ड्रॅगॉनचा थरकाप
2

Taiwan War Drills: सायरन वाजले अन् राष्ट्राध्यक्षांनी घातले बुलेटप्रूफ जॅकेट; तैवानच्या ‘हान कुआंग’ सरावाने ड्रॅगॉनचा थरकाप

US-Iran Tension: ट्रम्प यांनी दुसऱ्या महायुद्धासारखा भीषण हल्ला का रोखला? इराणच्या ‘अशा’ एका कॉलमुळे टळले महायुद्ध
3

US-Iran Tension: ट्रम्प यांनी दुसऱ्या महायुद्धासारखा भीषण हल्ला का रोखला? इराणच्या ‘अशा’ एका कॉलमुळे टळले महायुद्ध

Imran Khan Release: 27 सप्टेंबरला इस्लामाबादला घेराव; इम्रान खान यांच्यासाठी PTIचा पाकिस्तानात आरपारच्या संघर्षाचा इशारा
4

Imran Khan Release: 27 सप्टेंबरला इस्लामाबादला घेराव; इम्रान खान यांच्यासाठी PTIचा पाकिस्तानात आरपारच्या संघर्षाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.