US issues travel advisory for Bangladesh amid unrest, ‘Violence, crime, kidnapping
वॉशिंग्टन: बांगलादेशमध्ये पूजा उद्यापन परिषदेच्या बिरल युनिटचे भावेश चंद्र रॉय यांचे अपहरण करुन त्यांना मारहाण करुन त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर बांगलादेशात पुन्हा एकदा हिंदू समुदाय आणि इतर अल्पसंख्यांक समुदायच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या हत्येच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बांगलादेशला प्रवास करण्यासंबंधी एक मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत.
ट्रम्प प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, नागरिकांना अशांतता, गुन्हेगारी आणि दहशतवादामुळे बांगलादेशला प्रवास करण्याचा पुनर्विचार करावा असे म्हटले आहे. अमेरिकेच्या प्रवासी मार्गदर्शक तत्वांमध्ये नागरिकांना. बंगालदेशच्या खगराचरी, रंगमती आणि बंदरबन हिल ट्रॅक्स जिल्ह्यांमध्ये प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या भागामध्ये जातीय हिंसाचार, गुन्हेगारी, दहशतवाद अपहरण आणि इतर सुरक्षा धोक्यामुळे अमेरिकेने हा सल्ला जारी केला आहे.
जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, बांगलादेशात अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये घरगुती, कौटुंबिक वादातून प्रेरित अपहरण आणि धार्मिक अल्पसंख्यांकाना लक्ष्य केले जात आहे. परंतु, या प्रदेशांमध्ये येणार्या पर्यटकांसाठी फुटीरतावादी गट आणि राजकीय हिंसाचारामुळे अतिरिक्त धोके निर्माण होण्याची शक्यता आहे. या भागात स्फोटाच्या आणि गोळीबारांच्या घटनांचा धोका वाढला आहे. यामुळे अमेरिकेने नागरिकांना या भागात जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
याशिवाय, अमेरिकेने म्हटले आहे की, या प्रदेशांमध्ये प्रवासाची योजना आखत असाल कर, बांगलादेश सरकारच्या गृह मंत्रालयाच्या सार्वजनिक सुरक्षा कार्यालयाकडून पूर्व परवानगी घ्यावी लागेल. या जोखींमांमुळे बांगलादेशात काम करणाऱ्या अमेरिकन सरकारी कर्मचाऱ्यांना या प्रदेशात प्रवास करण्यास मनाई अमेरिकेने केली आहे.
याशिवाय, राजनैतिक क्षेत्रांबाहेर प्रवास टाळण्याचाही सल्ला अमेरिकी सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.पायाभूत आणि आपत्कालीन सुविधांच्या अभावामुळे अमेरिकन नागरिकांना मर्यादित आत्पकालीन सुविधा असून शकते असे अमेरिकेने म्हटले आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचेही सांगण्यात आले आहे.
शेख हसीना यांच्या सरकारच्या सत्तापलटानंतर बांगलादेशात कायदा व सुवस्था ढासळली आहे. बांगलादेशत हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन अल्पसंख्यांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, ऑगस्ट ते डिसेंबक 2024 दरम्यान 32 हिंदूची हत्या, 13 महिलांवर अत्याचार आणि 133 मंदिरे उद्धवस्त करण्यात आली आहेत. बांगलादेश सरकारने हिंसाचारात आतापर्यंत 70 जणांना अटक केली असून 88 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या बांगलादेशातील परिस्थिती अल्पसंख्याकांसाठी चिंताजनक बनली आहे.