JD Vance suddenly canceled an important India visit to after Taj mahal
नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी (22 एप्रिल) पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनी त्यांचा जयपूर दौरा रद्द केला असल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध करत मृताच्या कुटुंबियांद्दल तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत. उपराष्ट्राध्य चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर कुटुंबासह आले होते.
यादरम्यान ते भारताचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा अनुभवत होते. याच दरम्यान त्यांना पहलगाम हल्ल्याची माहिती मिळाली. परंतु त्यांनी आपला पुढचा जयपूर दौरा पुढे ढकलाल आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशावा धक्का बसल्याने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. सध्या देशात हाय अलर्ट मोड असून लोकांमध्ये संताप आणि दु:खाचे वातावरण पसरलेले आहे. यादरम्यान उपाध्यक्ष जेडी वेंस यांनीही भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
जेडी वेंस आपल्या कुटुंबियांसोबत ताजमहाल पाहण्यास गेले होते. ताजमहालवरुन परतल्यावर त्यांना पहलगाम हल्ल्याची माहिती मिळाली आणि मोठा धक्का बसला. त्यांनी या हिंसक हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांबद्दल तीव्र संवदेना व्यक्त केल्या आहेत.
त्यांनी पहलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षेची कारणे आणि संवेदनशील परिस्थिती आणि भावनिक पैलू लक्षात घेत आपला दौरा रद्द केला आहे. सध्या प्रशासनाकडून याबद्दल कोणती अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. उच्चस्तरीय सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
जेडी वेंस यांचा भारत दौरा हा अमेरिका आणि भारतातील राजनैतिक संबंधांच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. जेडी वेंस आपली पत्नी आणि मुलांसह दिल्ली, आग्रा आणि जयपूर सारख्या भारतातील प्रमुख शहरांना भेट देणार होते. परंतु पहलगाम हल्ल्यामुळे पुढील योजना रद्द करण्यात आल्या आहेत.
पहलगाम हल्ल्यावर जागतिक स्तरावर देखील विरोध केला जात आहे. अमेरिका, रशिया, इस्रायल, इराण, श्रीलंका, नेपाळ आणि यूएईने या हल्ल्याचा तीव्र विरोध केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पाठिंबा दिला आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो. या कठीण काळात अमेरिका भारतासोबत ठामपणे उभा आहे.