Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-US War: लाटांवर धुराचे साम्राज्य! अमेरिकेने इराणचं महाकाय ‘ड्रोन कॅरियर’ उडवलं; ‘Shahid Bagheri’ जळून खाक, पाहा VIRAL VIDEO

US-Israel War Against Iran: अमेरिकन सैन्याने इराणच्या ड्रोन कॅरियर आयआरआयएस शाहिद बघेरीवर हल्ला केला आणि जाळून टाकले, हे कंटेनर जहाज ड्रोन लाँचिंग प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतरित झाले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 06, 2026 | 10:45 AM
us military destroys iranian drone carrier iris shahid bagheri video

us military destroys iranian drone carrier iris shahid bagheri video

Follow Us
Close
Follow Us:
  • महाकाय ड्रोन कॅरियर उद्ध्वस्त
  • सेंटकॉमचा सज्जड इशारा
  • इराणच्या ताकदीला खिंडार

US attack on Iranian drone carrier Shahid Bagheri : मध्यपूर्वेतील युद्धाने ( US-Israel Iran War) आता सर्वात भीषण वळण घेतले आहे. अमेरिकन सैन्याने शुक्रवारी सकाळी इराणच्या नौदलाला सर्वात मोठा धक्का दिला आहे. इराणचे सर्वात प्रगत आणि फिरते ड्रोन लाँचिंग स्टेशन मानले जाणारे ‘आयआरआयएस शाहिद बघेरी’ (IRIS Shahid Bagheri) हे जहाज अमेरिकेने उद्ध्वस्त केले आहे. अमेरिकेच्या या कारवाईमुळे इराणच्या ड्रोन हल्ल्यांची क्षमता निम्मी झाल्याचे मानले जात असून, या हल्ल्याचा एक ब्लॅक-अँड-व्हाइट व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये हे अवाढव्य जहाज ज्वाळांमध्ये वेढलेले दिसत आहे.

‘दुसऱ्या महायुद्धातील जहाजाचा आकार’ अन् अमेरिकेचा प्रहार

यूएस सेंट्रल कमांडने (CENTCOM) त्यांच्या अधिकृत ‘X’ पोस्टमध्ये या हल्ल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी या जहाजाचे वर्णन “दुसऱ्या महायुद्धातील विमानवाहू जहाजासारखा आकार” असलेले महाकाय अस्त्र असे केले आहे. सेंटकॉमने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, “अमेरिकन सैन्य संपूर्ण इराणी नौदलाला समुद्राच्या तळाशी नेल्याशिवाय शांत बसणार नाही.” हा हल्ला नेमका कुठे झाला, हे सुरक्षेच्या कारणास्तव गोपनीय ठेवण्यात आले असले, तरी या प्रहाराने मध्यपूर्वेतील समुद्रात इराणचा दबदबा संपुष्टात आणण्याची तयारी अमेरिकेने केल्याचे स्पष्ट दिसते.

U.S. forces aren’t holding back on the mission to sink the entire Iranian Navy. Today, an Iranian drone carrier, roughly the size of a WWII aircraft carrier, was struck and is now on fire. pic.twitter.com/WyA4fniZck — U.S. Central Command (@CENTCOM) March 6, 2026

credit – social media and Twitter

का खास होतं ‘शाहिद बघेरी’?

हे केवळ एक जहाज नव्हते, तर इराणचा एक चालता-फिरता लष्करी तळ होता. फेब्रुवारी २०२५ मध्ये लाँच झालेल्या या जहाजाची लांबी १८० मीटर असून त्यावर विमानांप्रमाणे मोठी धावपट्टी (Runway) होती. हे जहाज कोणत्याही बंदरावर न थांबता सलग २२,००० नॉटिकल मैल प्रवास करू शकत होते. या जहाजावरून एकाच वेळी डझनभर आत्मघाती ड्रोन्स लाँच करण्याची सोय होती, ज्यामुळे इराणला जगातील कोणत्याही कोपऱ्यात शांतपणे ड्रोन हल्ले करणे शक्य झाले होते. इराणच्या लष्करी रणनीतीमध्ये ‘शाहिद बघेरी’ हा एक कणा मानला जात होता, जो आता अमेरिकेने मोडून काढला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : IRIS Dena: अमेरिकेच्या ‘Torpedoचा डेडली अटॅक, Iranची ‘आयरिस डेना’ खाक; भारताचे INS Tarangini ‘असे’ ठरले इराणसाठी वरदान

इराणी नौदलाची ‘कंबर’ मोडली!

तज्ञांच्या मते, अमेरिकेचे मुख्य उद्दिष्ट इराणची नौदल क्षमता पूर्णपणे नष्ट करणे हे आहे. शाहिद बघेरीच्या विनाशामुळे इराणला आता लांब अंतरावरून ड्रोन हल्ले करणे कठीण जाणार आहे. इराणने अद्याप अधिकृतपणे या नुकसानीची कबुली दिली नसली, तरी सेंटकॉमने शेअर केलेला व्हिडिओ आणि सॅटेलाईट फोटोंनी सत्य जगासमोर आणले आहे. या जहाजावर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे आणि स्फोटके असल्यामुळे, अमेरिकन हल्ल्यानंतर त्यात लागलेली आग विझवणे अशक्य झाले आणि काही वेळातच हे जहाज समुद्रात बुडाले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Fuel Prices: ‘रशियाचा फायदा नाही, जगाचं हित!’ ट्रम्प यांनी भारताला रशियन तेलाच्या खरेदीसाठी दिली सूट; सवलतीमागे मोठे राजकारण

प्रादेशिक सुरक्षेवर मोठा परिणाम

या ताज्या हल्ल्यामुळे इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता टोकाला पोहोचला आहे. इराण यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेच्या या सक्रिय पावलांमुळे मध्यपूर्वेतील सागरी व्यापार मार्गांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, अमेरिकेने हे स्पष्ट केले आहे की ते आपल्या सुरक्षेसाठी आणि मित्र राष्ट्रांच्या संरक्षणासाठी इराणच्या लष्करी यंत्रणांना असेच लक्ष्य करत राहतील.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आयआरआयएस शाहिद बघेरी (IRIS Shahid Bagheri) हे जहाज का महत्त्वाचे होते?

    Ans: हे इराणचे फिरते ड्रोन लाँचिंग प्लॅटफॉर्म होते, ज्याची १८० मीटर लांब धावपट्टी होती आणि ते सलग २२,००० नॉटिकल मैल प्रवास करून ड्रोन हल्ले करू शकत होते.

  • Que: अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) या हल्ल्याबाबत काय म्हटले आहे?

    Ans: सेंटकॉमने म्हटले आहे की, जोपर्यंत इराणचे संपूर्ण नौदल बुडत नाही, तोपर्यंत अमेरिकन सैन्य आपली ही मोहीम थांबवणार नाही.

  • Que: या जहाजाच्या विनाशामुळे इराणला काय तोटा होईल?

    Ans: इराणची लांब पल्ल्याच्या समुद्रातून ड्रोन हल्ले करण्याची क्षमता आता पूर्णपणे कमकुवत झाली असून त्यांची सागरी रणनीती धोक्यात आली आहे.

Web Title: Us military destroys iranian drone carrier iris shahid bagheri video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • Israel Iran war
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Kuwait Attack : कुवेत सीमेवर महासंग्राम! इराकी ड्रोनचा उत्तरेकडील चौक्यांवर भीषण हल्ला; फायबर-ऑप्टिक तंत्रज्ञानाने जगाला हादरवले
1

Kuwait Attack : कुवेत सीमेवर महासंग्राम! इराकी ड्रोनचा उत्तरेकडील चौक्यांवर भीषण हल्ला; फायबर-ऑप्टिक तंत्रज्ञानाने जगाला हादरवले

Iran US Talks: इराणचा ट्रम्पना ‘ठेंगा’! इस्लामाबादमध्ये अमेरिकेशी चर्चेला स्पष्ट नकार; अजूनही आखाती देशांवर युद्धाची टांगती तलवार
2

Iran US Talks: इराणचा ट्रम्पना ‘ठेंगा’! इस्लामाबादमध्ये अमेरिकेशी चर्चेला स्पष्ट नकार; अजूनही आखाती देशांवर युद्धाची टांगती तलवार

मेजर गौरव आर्य यांनी निवडला पश्चिम आशियातील संघर्षाचा खरा विजेता; ‘हा’ देश गोळी न झाडता मारतोय बाजी
3

मेजर गौरव आर्य यांनी निवडला पश्चिम आशियातील संघर्षाचा खरा विजेता; ‘हा’ देश गोळी न झाडता मारतोय बाजी

Iran Conflict: ट्रम्प यांचा ‘शूट टू किल’ आदेश! इराणच्या बोटी समुद्रातच उडवणार; US Navy हटवतेय होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भूसुरुंग
4

Iran Conflict: ट्रम्प यांचा ‘शूट टू किल’ आदेश! इराणच्या बोटी समुद्रातच उडवणार; US Navy हटवतेय होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भूसुरुंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.