Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Guerrilla Warfare: ‘प्राण देऊ, पण झुकणार नाही!’ अमेरिकन CIA प्रमुखांच्या गुप्त भेटीनंतर ‘हा’ देश थेट युद्धभूमीसाठी सज्ज

US Cuba Tension: अमेरिकी अधिकाऱ्यांच्या मते, सीआयए प्रमुख रॅटक्लिफ यांनी क्युबन अधिकाऱ्यांवर रशियन आणि चीनी हेरगिरीचे केंद्र बनल्याचा आणि या प्रदेशातील अमेरिकेच्या हितसंबंधांना हानी पोहोचवल्याचा आरोप केला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 17, 2026 | 12:11 PM
us cuba tension may 2026 cia director visit guerrilla warfare readiness

us cuba tension may 2026 cia director visit guerrilla warfare readiness

Follow Us
Follow Us:
  • क्युबाची गनिमी युद्धाची तयारी
  • सीआयए प्रमुखांचा गुप्त दौरा
  • आर्थिक कोंडी आणि इराणचे सावट

US Cuba Tension May 2026 : जागतिक राजकारणात इराण आणि युक्रेन संकटानंतर आता अमेरिकेच्या अगदी जवळ असलेल्या कॅरिबियन समुद्रात युद्धाचे ढग जमा होऊ लागले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या आक्रमक धोरणांमुळे आणि क्युबावर लादलेल्या अत्यंत कठोर ‘ऊर्जा कोंडी’मुळे (Energy Blockade) अमेरिका आणि क्युबा यांच्यातील संबंध कमालीच्या टोकाला पोहोचले आहेत. क्युबामध्ये सध्या “जेव्हा अमेरिकन येतील…” हा एकच वाक्प्रचार प्रत्येकाच्या तोंडी ऐकायला मिळत आहे. ट्रम्प प्रशासनाकडून कोणत्याही क्षणी लष्करी कारवाई होऊ शकते, या भीतीने क्युबाने आता आपल्या संरक्षणासाठी थेट देशातील सामान्य नागरिकांनाच लष्करी प्रशिक्षणासह शस्त्रे वाटण्यास सुरुवात केली आहे.

सीआयए प्रमुखांचा ‘तो’ विमान दौरा आणि क्युबाचा संताप

गेल्या काही दिवसांत तणाव वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेचे (CIA) प्रमुख जॉन रॅटक्लिफ यांचा झालेला हवाना दौरा. सहसा सीआयए प्रमुखांचे परदेश दौरे हे अत्यंत गुप्त ठेवले जातात. मात्र, रॅटक्लिफ ज्या विमानाने क्युबात उतरले, त्यावर स्पष्टपणे ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’ असे लिहिलेले होते. क्युबासाठी हा एक उघड इशारा होता. सीआयएचे नाव ऐकताच क्युबाच्या अंगाचा तीळपापड होतो, कारण १९६० च्या दशकात याच सीआयएने क्युबाचे महान नेते फिडेल कॅस्ट्रो यांच्या हत्येसाठी स्फोटक सिगारपासून ते विषारी स्कुबा सूटपर्यंत शेकडो कुप्रसिद्ध कट रचले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi : भारताचा सर्वात मोठा सांस्कृतिक विजय! नेदरलँड्सने PM मोदींना परत केला 1000 वर्षांनंतर चोळ साम्राज्याचा ‘हा’ अमूल्य ठेवा

‘गाजर आणि काठी’चे राजकारण: रशिया-चीनच्या हेरगिरीचा आरोप

अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, सीआयए प्रमुखांनी क्युबासमोर ‘करा किंवा मरा’ असा प्रस्ताव ठेवला आहे. अमेरिकेचा आरोप आहे की, क्युबा हा अमेरिकेच्या अगदी जवळ असूनही तो रशिया आणि चीनचे प्रमुख हेरगिरी केंद्र (Spying Hub) बनला आहे. गेल्या काही महिन्यांत अमेरिकेने क्युबाला कधी आर्थिक मदतीचे गाजर दाखवले, तर कधी निर्बंधांची काठी उगारली. मात्र, आता ट्रम्प प्रशासनाने मदतीचा पर्याय पूर्णपणे बाजूला सारून क्युबाची आर्थिक कोंडी करण्याचे धोरण स्वीकारले आहे. यामुळे क्युबात २० ते २२ तासांचे भीषण वीज संकट निर्माण झाले असून अन्न आणि इंधनाचा तीव्र तुटवडा जाणवत आहे.

DETAILS: The Operation was said to be carried out by Two dozen operators from DHQSOF and US Navy SEAL Team 6. They were inserted via Helicopters unto the islands while US MQ9 Reapers and NIG #GreyRaptor Maintained overwatch with strike assets on standby. pic.twitter.com/D51LZ2b8ZL — Toju weston (@TojuWes) May 16, 2026

credit – social media and Twitter

फिडेल कॅस्ट्रो यांचा ‘तो’ जुना प्लॅन अ‍ॅक्टिव्ह!

क्युबाचे अध्यक्ष मिगेल डियाझ-कॅनेल यांनी कामगार दिनी अत्यंत आक्रमक भाषण करत म्हटले, “आम्ही क्रांती आणि देशासाठी प्राण देण्यास तयार आहोत.” क्युबाच्या सरकारी माध्यमांनी नागरिकांच्या लष्करी प्रशिक्षणाची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. क्युबाने आता फिडेल कॅस्ट्रो यांच्या “संपूर्ण लोकसंख्येचे युद्ध” (War of all the People) या जुन्या रणनीतीचा वापर सुरू केला आहे. या अंतर्गत सामान्य नागरिकांच्या घरांचा वापर गनिमी युद्धाच्या तळांसारखा केला जाणार आहे. क्युबाची ही तयारी हुबेहूब अमेरिकेला धूळ चारणाऱ्या ‘व्हिएतनाम युद्धा’च्या धर्तीवर आधारित आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pandemic Alert: कोरोनापेक्षाही भयंकर! हंताव्हायरस नव्हे तर दोन देशांमध्ये ‘या’ व्हायरसने घेतले शेकडो बळी; पाहा भीषण वास्तव

जुनी शस्त्रे पण मजबूत इरादे: इराणप्रमाणे पलटवार होणार?

लष्करी विश्लेषकांच्या मते, क्युबाच्या सैनिकांकडे आणि नागरिकांकडे असलेली शस्त्रे सोव्हिएत युनियनच्या काळातील म्हणजेच अत्यंत जुनी आहेत. अमेरिकेच्या आधुनिक स्टेल्थ फायटर्स आणि ड्रोन तंत्रज्ञानासमोर ही शस्त्रे खूपच कमकुवत आहेत. मात्र, लष्करी इतिहासकार हॅल क्लेपॅक यांनी स्पष्ट केले की, क्युबाचे सैनिक भौगोलिक परिस्थितीचा वापर करून अमेरिकेच्या भू-दलाला (Ground Forces) जशास तसे उत्तर देऊ शकतात. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, इराणच्या आघाडीवर अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर, ट्रम्प खरोखरच क्युबावर थेट लष्करी हल्ल्याची चूक करतील का? की क्युबा स्वतःच इराणप्रमाणे अमेरिकेच्या नाकावर टिच्चून रशिया-चीनच्या मदतीने मोठा पलटवार करेल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिका आणि क्युबा यांच्यात सध्या वाद का वाढला आहे?

    Ans: अमेरिकेने क्युबावर कडक तेल आणि आर्थिक नाकेबंदी लादली असून, क्युबा हा रशिया-चीनचा हेरगिरीचा अड्डा बनल्याचा आरोप सीआयएने केला आहे.

  • Que: क्युबाची 'संपूर्ण लोकसंख्येचे युद्ध' ही रणनीती काय आहे?

    Ans: या रणनीतीअंतर्गत क्युबा सरकार सामान्य नागरिकांना शस्त्रे देऊन अमेरिकेविरुद्ध व्हिएतनाम-शैलीतील गनिमी (Guerrilla) युद्ध लढण्याची तयारी करत आहे.

  • Que: क्युबा इराणप्रमाणे अमेरिकेला प्रत्युत्तर देऊ शकतो का?

    Ans: होय, आधुनिक शस्त्रांचा अभाव असला तरी क्युबा आपल्या भौगोलिक रचनेचा आणि रशिया-चीनच्या गुप्त पाठिंब्याचा वापर करून अमेरिकेला जशास तसे उत्तर देऊ शकतो.

Web Title: Us military strike drug smuggling boat pacific ocean video 2026 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • America
  • America news
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Crisis : ओमानला ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतच्या करारावर अडथळा आणल्यास बॉम्बिंग करू
1

Hormuz Crisis : ओमानला ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतच्या करारावर अडथळा आणल्यास बॉम्बिंग करू

Project-75I Submarine Deal: 90 हजार कोटींचा महाकरार! भारत अन् जर्मनी एकत्र; 6 घातक पाणबुड्यांनी भारतीय नौदल होणार महाशक्ती
2

Project-75I Submarine Deal: 90 हजार कोटींचा महाकरार! भारत अन् जर्मनी एकत्र; 6 घातक पाणबुड्यांनी भारतीय नौदल होणार महाशक्ती

Pakistan Somalia Deal: सागरी व्यापारावर धोक्याचे ढग! पाकिस्तान-सोमालिया लष्करी कराराचा भारतावर काय होणार परिणाम?
3

Pakistan Somalia Deal: सागरी व्यापारावर धोक्याचे ढग! पाकिस्तान-सोमालिया लष्करी कराराचा भारतावर काय होणार परिणाम?

Gaza Peace Deal: हमास शस्त्रे खाली ठेवून सत्ता सोडण्यास तयार; इजिप्तमध्ये जेरेड कुशनर यांच्यासोबत 90 मिनिटे ऐतिहासिक चर्चा
4

Gaza Peace Deal: हमास शस्त्रे खाली ठेवून सत्ता सोडण्यास तयार; इजिप्तमध्ये जेरेड कुशनर यांच्यासोबत 90 मिनिटे ऐतिहासिक चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.