America discussed on energy deal with Russia
America Russia Energy Deal : वॉशिंग्टन/मॉस्को : अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात दुहेरी खेळ दिसून येत आहे. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) रशियाकडून तेल खरेदीमुळे भारतावर भारी-भक्कम टॅरिफ लादत आहेत, मात्र दुसरीकडे स्वत: रशियासोबत उर्जा करारांवर चर्चा करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नुकतेच दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तेल आणि गॅस प्रकल्पांशी संबंधित गुंतवणूकीवर चर्चा केली आहे.
यामुळे ट्रम्प यांच्या दुहेरी खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% टॅरिफ लागू केले आहे, जे आजापासून (२७ ऑगस्ट) १२.०१ मिनिटांनी लागू होणार आहे. मात्र भारताने ट्रम्प पुढे न झुकण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीयांसाठी H1-B व्हिसा होणार बंद? जाणून घ्या काय म्हणाले अमेरिकन रिपब्लिकन सिनेटर
Reuters ने दिलेल्या रिपोर्टनुसार, अलास्कामध्ये दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उर्जा करारांवर बैठक झाली. २०२२ पासून रशियावर अनेक आंतरराष्ट्रीय निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे रशियाला आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आणि उर्जा प्रकल्पांमध्ये मोठे नुकसान सहन करावे लागले. पण सध्या युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका रशियाला या उर्जा करारांचे आमिष दाखवत आहे.
१५ ऑगस्ट रोजी झालेल्या चर्चांमध्ये तेल-गॅस प्रक्लांपावर थोडक्यात चर्चा झाली. यावेळी अमेरिकेने रशियासमोर काही अटी ठेवल्या आहेत.
जर अमेरिका आणि रशियामध्ये हे करार यशस्वी झाले तर ट्रम्प यांना राजकीय दृष्ट्या मोठा फायदा होईल. याच वेळी ट्रम्प यांनी भारताला पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित न झाल्यास ते रशियावर आणखी निर्बंध लादतील तसेच भारतावरही कठोर शुल्क लादतील असे त्यांनी म्हटले आहे.
सध्या ट्रम्प यांची ही दुहेरी खेळी भारतासाठी मोठे संकट निर्माण करत आहे. भारत हा रशियन तेलाचा मोठा खरेदीदार आहे. पण ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे मोठा परिणाम होत आहे. सध्या रशियावरील निर्बंध हटवण्याचे दिशेने प्रयत्न करणे अत्यंत महत्वाचे आहे.
तालिबानी मंत्र्यांच्या भारत भेटीत अडथळा; संयुक्त राष्ट्राने प्रवासबंदी उठवण्यास दिला नकार