तालिबानी मंत्र्यांच्या भारत भेटीत अडथळा; संयुक्त राष्ट्राने प्रवासबंदी उठवण्यास दिला नकार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
India Afhganistan Relation : काबूल : भारत आणि अफगाणिस्तानचे संबंधामध्ये राजनैतिकदृष्ट्या सुधारणा होताना दिसून येत आहे. पाकिस्तानविरोधी घडामोडींमुळे तालिबान सरकार आणि भारताचे संबंध चांगले होत आहेत. याच वेळी अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी भारत दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा सुरु होती. दिल्लीत त्यांच्यासाठी भेटीचे आयोजन करण्यात आले होते. पण त्यांचा भारत दौरा रद्द झाला आहे.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने (UNSC) मुत्ताकी यांच्यावरील प्रवासबंदी हटवण्यास नकार दिला आहे. भारताने यासाठी UNSC ला विनंतीपत्र पाठवले होते. परंतु याला नकार देण्यात आला आहे. यापूर्वी मुत्ताकी यांचा पाकिस्तान दौराही रद्द झाला होता. सलग दुसऱ्यांदा त्यांचा परदेश दौऱ्याला UNSC ने नकार दिला आहे. यामुळे भारताने तालिबान सरकारला पाठवलेले आमंत्रण पत्र मागे घेतले आहे.
चीनवर मेहरबान होत आहेत ट्रम्प? भारतावर कराचा बोजा, बीजिंगच्या विद्यार्थ्यांना व्हिसा सवलत
संयुक्त राष्ट्राच्या परिषदेने तालिबानच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या परदेश प्रवासावर बंदी घातली आहे. यामध्ये परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांचाही समावेश आहे. UN च्या निर्बंधांमुळे परदेशी प्रवास करण्यासाठी त्यांना आधी परवानगी घ्यावी लागते. यूएनकडून परवानगी मिळाल्यानंतरच तालिबानी अधिकारी परदेशात प्रवास करु शकतात. परंतु गेल्या काही महिन्यात यूएनने निर्बंध कडक केले असून मुत्ताकी यांना परदेशात प्रवासचे प्रयत्न अपयशी ठरत आहेत.
सध्या मुत्ताकी यांचा भारत दौरा रद्द झाला आहे. पण हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात होता. कारण अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आल्यानंतर हा परराष्ट्र मंत्र्यांचा पहिलाच भारत दौरा होणार होता. शिवाय या भेटीदरम्यान क्षेत्रीय सुरक्षा, व्यापार, संपर्क आणि नागरिकांमध्ये दळण-वळण यावर चर्चा होणार होती. अफगाणिस्तान आणि भारतामधील संबंध मजबूत होण्याची शक्यता होती.
तज्ज्ञांच्या मते हा दौरा पाकिस्तानसाठीही मोठा राजनैतिक धक्का ठरला असता. कारण पाकिस्तानने भारत आणि तालिबानला धमक्या दिल्या आहेत. शिवाय दोन्ही देशांवर दबाव आणण्याचाही पाकिस्तान प्रयत्न करत आहे. अशा परिस्थिती भारत-तालिबानचे संबंध पाकिस्तानसाठी चिंताजनक ठरली असती. पण UN च्या निर्बंधामुळे मुत्ताती यांचा दौरा रद्द झाला आहे. यापूर्वी तालिबानचे एख प्रतिनिधी मंडळ भारतात येऊन गेले आहे. पण यावेळी हा अधिृत दौरा नव्हता. यामुळे यावेळी अमीर खान मुत्ताकी यांच्या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले होते.