
US okays $93M arms package for India including Javelin missiles launch units and Excalibur rounds
1. अमेरिकेने भारतासाठी 93 दशलक्ष डॉलर्सच्या शस्त्रास्त्र पॅकेजला मंजुरी दिली.
2. या पॅकेजमध्ये 100 जेव्हलिन क्षेपणास्त्रे, 25 कमांड लाँच युनिट्स आणि 216 एक्सकॅलिबर राउंड्सचा समावेश.
3. हा करार भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करून भारताची संरक्षण क्षमता वाढवणार.
US-India $93M defence package : भारत( India)आणि अमेरिकेदरम्यान(America) संरक्षण सहकार्याची नवी पायरी ओलांडत अमेरिकेने भारतासाठी तब्बल 93 दशलक्ष डॉलर्स किंमतीच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्र पॅकेजला हिरवा कंदील दिला आहे. या मंजुरीनंतर भारताला FGM-148 जेव्हलिन अँटी-टँक क्षेपणास्त्रे, कमांड लाँच युनिट्स, तसेच एक्सकॅलिबर प्रिसिजन-गाईडेड आर्टिलरी राउंड्स मिळणार आहेत. सध्याच्या जागतिक सुरक्षा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हा करार भारतासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या अत्याधुनिक लष्करी पॅकेजमध्ये खालील प्रमुख उपकरणांचा समावेश आहे,
ही सर्व उपकरणे उच्च तंत्रज्ञानावर आधारित असून त्यांची मारक क्षमता, टार्गेटिंग अचूकता आणि ऑपरेशनल रेंज जगभरात ओळखली जाते. जमिनीवरील युद्धप्रकारात किंवा बख्तरबंद लक्ष्यांवर कारवाई करताना जेव्हलिन क्षेपणास्त्रांचे सामर्थ्य अतुलनीय मानले जाते.
अमेरिकेच्या Defence Security Cooperation Agency (DSCA) ने या प्रस्तावाची अधिकृत माहिती अमेरिकन काँग्रेसकडे पाठवली आहे. एजन्सीने स्पष्ट सांगितले आहे की भारताने या कराराअंतर्गत फक्त शस्त्रेच नव्हे, तर लाइफसायकल सपोर्ट, सुरक्षा तपासणी, ऑपरेटर प्रशिक्षण, लाँचर्सचे नूतनीकरण आणि तांत्रिक सहाय्य यांचीसुद्धा मागणी केली आहे. याचा अर्थ भारत ही शस्त्रे फक्त खरेदीच करणार नाही, तर त्यांचा दीर्घकालीन उपयोग, देखभाल आणि प्रशिक्षण यासाठी आवश्यक संपूर्ण समर्थन अमेरिकेकडून मिळणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : UK Navy : ‘आम्हाला माहिती आहे तुम्ही काय करत आहात’, रशियामुळे ब्रिटनची सुरक्षा यंत्रणा हाई अलर्टवर; Frigate,P-8 Poseidon तैनात
DSCA च्या निवेदनानुसार, हा करार अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करतो. दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याने गेल्या काही वर्षांत नवे उंचाव गाठले आहेत. इंडो-पॅसिफिक परिसरातील वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारताकडे तातडीने आधुनिक शस्त्रे उपलब्ध असणं अत्यंत महत्त्वाचं ठरत आहे. एजन्सीने हेही स्पष्ट केले की या कराराचा प्रादेशिक लष्करी संतुलनावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही, म्हणजेच हा करार केवळ भारताच्या सुरक्षात्मक क्षमतेत वाढ करणारा आहे.
🇺🇸🇮🇳 The US State Department has approved a Foreign Military Sales case to India for the Javelin Missile System with an estimated value of 45.7 million USD. The package includes:
– 100 FGM-148 Javelin rounds; one (1) Javelin FGM-148 missile, fly-to-buy
– 25 Javelin Lightweight… pic.twitter.com/1mzisGg9Pg — Jeff2146🇧🇪 (@Jeff21461) November 19, 2025
credit : social media
अमेरिकेने एक्सकॅलिबर गाईडेड आर्टिलरी राउंड्सच्या 47 दशलक्ष डॉलर्स किंमतीच्या विक्रीलाही मान्यता दिली आहे. हे राऊंड्स प्रिसिजन स्ट्राइकसाठी ओळखले जातात. कोणत्याही युद्धक्षेत्रात अत्यंत अचूक आणि कमी collateral damage सह हल्ला करण्याची क्षमता त्यांच्यात आहे.
RTX आणि Lockheed Martin यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार झालेली जेव्हलिन प्रणाली पायदळांसाठी क्रांतिकारी मानली जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIDEO: एका रात्रीत 476 हल्ले! ड्रोन–मिसाईल महाआक्रमणामुळे टेर्नोपिल हादरले; 25 जण ठार, 19 जण जिवंत जाळले
अमेरिकन सरकारने कळवले आहे की या करारात सध्या कोणताही ऑफसेट करार नाही. भविष्यात भारत आणि संबंधित अमेरिकन कंपन्यांमध्ये ऑफसेट करार अंतिम होऊ शकतो.
या संपूर्ण पॅकेजमुळे भारतीय लष्कराची शस्त्रसामग्री अधिक आधुनिक, अचूक आणि स्मार्ट होण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पुढील दशकात भारताच्या तांत्रिक क्षमतेत सातत्याने वाढ करण्याच्या दिशेने हा करार अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो.
Ans: भारताला 100 जेव्हलिन क्षेपणास्त्रे, 25 कमांड लाँच युनिट्स आणि 216 एक्सकॅलिबर राउंड्स मिळणार आहेत.
Ans: हा करार भारताची संरक्षण क्षमता, प्रिसिजन स्ट्राइक क्षमता आणि प्रादेशिक सुरक्षा बळकट करतो.
Ans: DSCA नुसार, या खरेदीचा कोणताही नकारात्मक प्रादेशिक परिणाम होणार नाही.