
US operation in Venezuela sea Russian ship seized
ही कारवाई अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा रशियाने टॅंकराला वाचवण्यासाठी पाणबुड्या आणि युद्ध जहाजे टँकरभोवती तैनात केली होती. अमेरिकेच्या या कारवाईने जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. रशियाचे हे जहाज पूर्व बेला -१ या नावाने ओळखले जायचे. पंरुत अमेरिकेच्या कारवाईच्या भितीने रशियाने याचे नाव मरिनेरा केले होते.
अमेरिकेच्या या कारवाईमुळे रशिया संतप्त झाला आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या या कारवाईला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन म्हटले आहे. तसेच रशियाने अमेरिकेला इशारा दिला आहे की, जहाजावरील रशियन नागरिकांच्या जलद आणि सुरक्षितते कोणताही अडथळा निर्माण करु नये.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. तसेच अमेरिकेला संयुक्त राष्ट्रांच्या करारानुसा, कोणत्याही दुसर्या देशांच्या कायदेशीरित्या कार्यरत असलेल्या जहाजाला बळकवण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांच्या सागरी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान अमेरिकेच्या व्हाइट हाऊसने देखील याबाबत निवदेन जारी केले आहे. अमेरिकेने या कारवाईती पुष्टी केली आहे. तसेच अमेरिका व्हेनेझुएलाच्या सरकारशी संपर्कात असल्याचेही अमेरिकेच्या परराष्ट्र मार्को रुबियो यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, व्हेनेझुएलावार अमेरिकेचा मोठा प्रभाव आहे. भविष्यातील निर्णय हे अमेरिकेच्या हितसंबंधाशी सुसंगत असतील असेही त्यांनी म्हटले.
तसेच रशियाच्या जप्त केलेल्या तेल टँकरबाबत स्पष्टीकरण देताना व्हाइट हाऊसने म्हटले आहे की, अमरिका सर्व निर्बंधांची काटेकोरणपणे अंमलबाजवणी करेल. अमेरिकेने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याच्या कारणाने रशियाच्या तेल टँकरला जप्त करण्यात आले आहे. तसेच जहाजावरील रशियन नागरिकांबाबत बोलताना गरज पडल्यास त्यांना अमेरिकेत आणले जाईल.
ट्रम्पचा व्हेनेझुएलावर दबाव वाढला! ‘या’ देशांसोबत आर्थिक संबंध तोडण्याचा दिला अल्टीमेटम
Ans: अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या समुद्रात रशियाच्या ध्वजाखालील तेल टँकर मरिनेराला जप्त केले आहे.
Ans: अमेरिकेच्या मरिनेरा तेल टँकरवरील कारवाईवर रशियाने तीव्र संताप व्यक्त केला असून याला आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यांचे उल्लंघन म्हटले आहे.