अमेरिकेशी थेट युद्धाची तयारी! रशियाने व्हेनेझुएलाकडे पाणबुड्या आणि युद्धनौका केल्या तैनात, जागतिक स्तरावर खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने व्हेनेझुएलाच्या मरीनेरा या वादग्रस्त तेल टॅंकरला सुरक्षा प्रदान केली आहे. या तेल टँकरभोवती रशियाने पाणबुडी आणि युद्धनौका तैनात केली आहे. हा तेल टँकर पूर्व बेला- 1 म्हणून ओळखला जायचा. अमेरिका हा तेल टँकर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होता. यामुळे अमेरिकेला रोखण्यासाठी रशियाने हे मोठे पाऊल उचलले आहे. रशियाने पाणबुड्या आणि युद्धनौका मरीनेरा टँकरच्या मागे तैनात केल्या आहेत. ज्यामुळे अमेरिका कोणत्याही प्रकारची कारवाई करु शकणार नाही. यामुळे रशियाकडून हा थेट युद्धाचा इशारा मानला जात आहे. यामुळे अमेरिका आणि रशियामध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला आहे.
तज्ज्ञांच्या मते, रशियाच्या नियंत्रणाखालील या टँकरवर कोणत्याही प्रकराची कारवाई झाल्यास यामुळे अमेरिका आणि रशियामध्ये तीव्र संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर दबावासाठी शॅडो फ्लीटवर निर्बंध लादले होते. हा ताफा कोणत्या देशाच्या मालकीचा आहे हे अस्पष्ट आहे. परंतु इराण, रशिया आणि व्हेनेझुएला या ताफ्यावरुन गुप्तपण तैलाचा वाहतूक करतात. यामुळे शॅडो फ्लीटवरील नियंत्रण टिकवण्याचा प्रयत्न रशिया करत आहे. यामुळे जागतिक तेल बाजारात मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
मरीनेरा टँकर हा व्हेनेझुएलातून कच्चे तेल वाहून घेऊन जातो. अमेरिकेने या टँकरला थांबवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जहाजावरील कर्मचाऱ्या त्यांना रोखले आणि उत्तरेकडे धाव घेतली. पूर्वी याचे नाव बेला-1 टँकर होते, परंतु अमेरिकेच्या कारवाईमुळे याचे नाव बदलुन मरीनेरा करण्यात आले आहे. यामुळे हे जहाज आता रशियाच्या नावावर नोंदणीकृत झाले असून यावर अमेरिकेने कारवाई थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या घडामोडींदरम्यान अमेरिकेने व्हेनेझुएलाचे पदच्युत अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर मोठी घोषणा केली आहे. त्यांनी व्हेनेझुएलाच्या नव्या अंतरिम सरकारसोबत मोठा करार केला आहे. याअंतर्गत अमेरिकेला व्हेनेझुएलातून 50 दशलक्ष बॅलर तेल मिळणार आहे. तसेच याच्या विक्रिची कमाई देखील अमेरिकेच्या नियंत्रणाखाली असणार आहे. यामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. याचा जागतिक तेल बाजारपेठांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
याच साठी केला होता अट्ट्हास…; डोनाल्ड ट्रम्पचा व्हेनेझुएलाच्या हृदयावर घाला, जगात खळबळ
Ans: रशियाने व्हेनेझुएलाच्या मरीनेरा या वादग्रस्त तेल टॅंकरला सुरक्षा प्रदान केली आहे. या तेल टँकरभोवती रशियाने पाणबुडी आणि युद्धनौका तैनात केली आहे.
Ans: रशियाच्या व्हेनेझुएलात पाणबुड्या आणि युद्धनौका तैनातीुमुळे उत्तर अटलांटिकमध्ये अमेरिकेसोबत तणावा वाढण्याची शक्यता आहे. तसेच याचा जागतिक तेल बाजारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
Ans: रशियाने पाणबुड्या आणि युद्धनौका मरीनेरा टँकरच्या मागे तैनात केल्या आहेत. ज्यामुळे अमेरिका कोणत्याही प्रकारची कारवाई करु शकणार नाही.
Ans: मरीनेरा टँकरला पूर्वी बेला-1 टँकर म्हणून ओळखले जायचे. हा व्हेनेझुएलाचा टँकर होता. परंतु अमेरिकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी या टँकरचे नाव बदलून मरीनेरा करुन रशियाच्या नावाखाली नोंदणीकृत झाला आहे. यामुळे यावर कोणीही कारवाई केल्यास युद्धाचा भडका उडू शकतो.






