डोनाल्ड ट्रम्पने दिला भारताला धक्का (फोटो सौजन्य - Instagram/iStock)
अमेरिकेने भारताला आणखी एक धक्का दिला आहे. त्यांनी ६ भारतीय पेट्रोलियम कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे की या कंपन्या इराणसोबत व्यवसाय करत होत्या. NDTV च्या वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की इराण आपल्या कमाईचा मोठा भाग प्रादेशिक संघर्षाला चालना देण्यासाठी वापरत आहे. तसेच इराणवर दहशतवादाला पाठिंबा देण्याचा आरोपही त्यांनी केला.
अमेरिकेने जगातील अशा एकूण २० कंपन्यांवर बंदी घातली आहे, त्यांनी असा व्यवसाय करणे हे कार्यकारी आदेश १३८४६ अंतर्गत अमेरिकेच्या निर्बंधांचे उल्लंघन आहे, असे सांगत ही बंदी घालण्यात आली आहे आणि अमेरिकेचा दावा आहे की इराण सरकार या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर मध्य पूर्वेतील संघर्षांना प्रोत्साहन देण्यासाठी, दहशतवादाला निधी देण्यासाठी आणि आपल्या लोकांवर अत्याचार करण्यासाठी करते.
भारताला मोठा धक्का! रशियाशी मैत्री अन् डोनाल्ड ट्रम्प नाराज; घेतला ‘हा’ सर्वात मोठा निर्णय
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने बुधवारी इराणी पेट्रोलियम, पेट्रोलियम उत्पादने किंवा पेट्रोकेमिकल व्यापारात गुंतलेल्या २० जागतिक संस्थांवर निर्बंध जाहीर केले आणि म्हटले की, “इराणी राजवट त्यांच्या अस्थिर कारवायांना वित्तपुरवठा करण्यासाठी मध्य पूर्वेतील संघर्षांना प्रोत्साहन देत आहे. आज, अमेरिका महसूलाचा प्रवाह थांबवण्यासाठी कारवाई करत आहे, ज्याचा वापर राजवट परदेशात दहशतवादाला पाठिंबा देण्यासाठी तसेच स्वतःच्या लोकांवर अत्याचार करण्यासाठी करते.”
परराष्ट्र विभागाने भारत, संयुक्त अरब अमिराती, तुर्की आणि इंडोनेशियातील या २० कंपन्यांवर इराणी मूळच्या पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या मोठ्या प्रमाणात विक्री आणि खरेदीसाठी बंदी घातली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला थेट धमकी! पुन्हा युद्धबंदीचा दावा अन् टॅरिफ लादण्याची सक्ती
या सर्व भारतीय कंपन्यांना कार्यकारी आदेश १३८४६ च्या कलम ३(अ)(iii) अंतर्गत इराणमधून पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या खरेदी, संपादन, विक्री, वाहतूक किंवा विपणनासाठी “जाणूनबुजून महत्त्वपूर्ण व्यवहारात सहभागी” झाल्याबद्दल नियुक्त करण्यात आले आहे.
१. ट्रम्पने किती कंपन्यांवर निर्बंध लावले आहेत
भारतातील एकूण ६ कंपन्यांवर डोनाल्ड ट्रम्पने निर्बंध लावले आहेत
२. अमेरिकचे काय दावा आहे?
इराण या उत्पन्नाचा वापर मध्य पूर्वेतील संघर्ष वाढवण्यासाठी आणि दहशतवादाला पाठिंबा देण्यासाठी करतो, म्हणून निर्बंध लावले