Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मला पोप व्हायला आवडेल’; ट्रम्प यांनी पोप बनण्याची इच्छा व्यक्त करत शेअर केलेल्या AI फोटोने उडाली खळबळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष गेल्या काही काळापासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी अनेक असे निर्णय घेतले, ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली.

  • By स्वराली शहा
Updated On: May 03, 2025 | 03:49 PM
US President Donald Trump Shares His AI Image In Papal Attire

US President Donald Trump Shares His AI Image In Papal Attire

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष गेल्या काही काळापासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी अनेक असे निर्णय घेतले, ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली. ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयावरुन तर जगभरात व्यापार युद्ध सुरु झाले होते. दरम्यान पुन्हा एकदा ट्रम्प वादाच्या भोवऱ्या अडकले आहेत. ट्रम्प यांनी एका मुलाखती दरम्यान पोप बनण्याची इच्छा जाहीर केली होती. यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर त्यांनी एक AI जनरेटेड फोटो शेअर केला असून यामध्ये ट्रम्प पोपच्या वेषात आहेत. यामुळे पुन्हा एकदा ट्रम्प चर्चेचा विषय बनले आहेत.

हा फोटो व्हाईट हाऊच्या अधिकृत सोशल मीडिया हॅंडवरुन देखील शेअर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान ट्रम्प यांना विचारण्यात आले होते की, पोपसाठी त्यांची पहिली पसंती कोण असेल? यावर उत्तर देताना त्यांनी म्हटले होते की, “मला पोप व्हायला आवडेल.” त्यांच्या या व्यक्तव्यानंतर त्यांचे पोपच्या वेशभूषेत अनेक फोटो समोर आले. या फोटोमध्ये त्यांनी गळ्यात क्रॉस आणि पोपचा पोशाख घातलेला दिसत आहे. तथापि, ट्रम्प यांनी न्यू यॉर्कचे कार्डिनल टिमोथी डोलन यांना पुढील पोप होण्यासाठी योग्य असल्याचे म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारताने बांगलादेशवर दाखवली दया; टिक टॉक बनवताना देशाच्या हद्दीत शिरलेल्या दोन जणांना BSF ने पाठवले परत

From Donald Trump Truth Social 05/02/25 10:29 PM pic.twitter.com/6BmCkSY1Q8

— Donald J. Trump Posts From His Truth Social (@TrumpDailyPosts) May 3, 2025

नेटकरी संतप्त

ट्रम्प यांच्या या पोस्टवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी म्हटले आहे की, ट्रम्प असंवेदनशील आहेत, त्यांनी कॅथलिक चर्चची थट्टा केली आहे. एका युजरने, हा पोपचा अपमान आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने ट्रम्प शैतान आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एका युजरने हा पोप धर्मगुरुंचा अनादर आहे. अशा प्रकारच्या विवध संतप्त अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. तर ट्रम्प यांच्या समर्थकांनी याचे कौतुक केले आहे. ट्रम्प विरोधक आणि समर्थकांमध्ये सोशल मीडियावर वाद सुरु आहे.

7 मे रोजी नवीन पोप निवडण्याची प्रक्रिया सुरु होणार

पहिले लॅटिन अमेरिकन पोप पोप फ्रान्सिस यांचे 22 एप्रिल 2025 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. यावेळी 26 एप्रिल रोजी पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराला व्हॅटिकनच्या पीटर्स स्क्वेअरमध्ये उपस्थित राहिले होते. पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारानंतर, कार्डिनल्स 7 मे रोजी पुढचया पोपसाठी उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रिया सुरु करतील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ऑस्ट्रेलियात Federal Election चे मतदान सुरु; पंतप्रधान अल्बानीज आणि पीटर डटन यांच्यात लढत

Web Title: Us president donald trump shares his ai image in papal attire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 03:49 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Pope Francis
  • World news

संबंधित बातम्या

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पुतिनने ट्रम्पसमोर ठेवली ‘ही’ अट; अलास्का भेटीवर मोठा खुलासा
1

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पुतिनने ट्रम्पसमोर ठेवली ‘ही’ अट; अलास्का भेटीवर मोठा खुलासा

२७ ऑगस्टपासून २५ टक्के अतिरिक्त शुल्क लागू होणार? भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा पुढे ढकलली
2

२७ ऑगस्टपासून २५ टक्के अतिरिक्त शुल्क लागू होणार? भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा पुढे ढकलली

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन
3

‘अल्लाहने मला पाकिस्तानचा रक्षक बनवले…’ ; राष्ट्रपती-पंतप्रधानांना हटवण्याच्या आरोपांवर असीम मुनीर सोडले मौन

China Flash Flood : चीनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे कहर; ८ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता
4

China Flash Flood : चीनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे कहर; ८ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.