भारताने बांगलादेशवर दाखवली दया; टिक टॉक बनवताना देशाच्या हद्दीत शिरलेल्या दोन जणांना BSF ने पाठवले परत (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: भारत आणि बांगलदेश संबंध गेल्या काही काळापासून बिघडत चालले आहेत. बांगलादेशने भारविरोधी केलेली भाषणबाजी असो किंवा खोटे आरोप असो बांगलादेश सतत भारताच्या प्रतिष्ठा खराब करण्याच्याच प्रयत्नानत असतो. असे असूनही भारताने नेहमीच मोठी उदारता ठेवत बांगलादेशवर दया दाखवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताने देशाच्या हद्दीत शिरलेल्या दोन बांगलादाशींना मायदेशी परत पाठवले आहे.
दोन बांगलादेशी टिक टॉक व्हिडिओ बनवताना भारताच्या हद्दीत शिरले होते. या दोन्ही बांदलादेशींना बीएसएफने परत पाठवले आहे. भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) लालमोनिरहाटच्या पटग्राम सीमेवर दोन बांगलादेशींनां ताब्यात घेतले होते. शनिवारी सकाळी या दोन्ही बांगलादेशींना परत पाठवण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आज पहाटे 3.30 वाजचा बॉर्ड गार्ड बांगलादेश आणि बीएसएफ मध्ये ध्वज बैठक झाली. या बैठकीतदरम्यान दोन्ही बांगलादेशी नागरिकांना परत पाठवण्यात आले, अशी माहिती 61 बीजीबी बटालियनचे कमांडर नाईक सुभेदार यांनी दिली. सुभेदार नाईक यांनी म्हटले की, दोन्ही बांगलादेशींना त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
बीएसएफ लष्कराच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बांगलादेशी तरुण बेकायदेशीरपणे भारतात घुसले. दोन्ही बांदलादेशी तरुणांना चहाच्या बांगांमध्ये टिक टॉक व्हिडिओ बनवताना बीएसएफच्या जवानांनी ताब्यात घेतले होते. यामध्ये एक तरुण 22 वर्षीय, तर दुसरा 16 वर्षांचा होता. शुक्रावारी संध्याकाळी 6 च्या सुमारास या दोन्ही तरुणांना भारताच्या हद्दीत शिरताना बीएसएफच्या जवानांनी पकडले. दोन्ही तरुण टिक टॉक व्हिडिओ रेकॉकर्ड करत होते.
बीएसएफ जवानांनी गस्तीवर असताना तरुणांना ताब्यात घेतले होते. ताब्यात घेताच दोन्ही तरुण भीतीने थरथर कापू लागले आणि रडत सोडण्याची विनती करु लागले. बीजीबी रंगपूर सेक्टरचे रमांडर आणि बीएसएफ जलाईडीचे सेक्टर कमांडर यांनी यावर संवाद साधला. यानंतर बीएसएफने ध्वज बैठकीदरम्यान ताब्यात घेतलेल्या दोन्ही बांगलादेशी तरुणांना सोडले.
दोन्ही बांगलादेशी तरुणांच्या म्हणण्यानुसार, ते दोघे नो-मॅन्स-लॅंडवरील भारतीय चहाच्या मळ्यात चुकीने गेले होते. चहाच्या मळ्यात दोघेजण फोटो काढत होते, तसेच व्हिडिओ रेकॉर्ड करत होते. यावेळीच गस्तीवर असलेल्या बीएसएफच्या जवानांनी दोघांना ताब्यात घेतले.
गेल्या वर्षी ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांच्या सत्तापलटानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतला. त्यानंतर भारत आणि बांगलादेशमधील संबंध बिघडू लागले. दरम्यान बांदलादेशने अनेक वेळा भारताविरुद्ध चीनसोबत मिळून कट रचण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही भारताने उदारता दाखवत बांगलादेशच्या दोन्ही नागरिकांना मायदेशी परत सुरक्षित पाठवले आहे.