ऑस्ट्रेलियात Federal Election चे मतदान सुरु; पंतप्रधान अल्बानीज आणि पीटर डटन यांच्यात लढत (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कॅनबेरा: ऑस्ट्रेलियामध्ये संघीय निवडणुकांसाठी शनिवारी (03 मे) मदतदान सुरु झाले आहे. या निवडणुकीमध्ये सध्याचे पंतप्रधान ॲंथनी अल्बनीज यांची लेबर पार्टी आणि विरोधी पक्षाचे नेते पीटर डटन यांच्या लिबरल-नॅशनलल कोलिशनमध्ये लढत सुरु आहे. ऑस्ट्रेलियात 28 मार्च 2025 रोजी संसद बरखास्त करण्यात आली होती. नंतार काळजीवाहून सरकार स्थापन करण्यात आले. यानंतर 22 ते 30 एप्रिल दरम्यान पोस्टल मतदान झाले.
भारताप्रमाणेच ऑस्ट्रेलियामध्ये दोन सभागृह आहे. वरिष्ठ सभागृहाला सिनेट आणि कनिष्ठ सभागृहाला प्रनिधीगृह असे म्हटले जाते. कनिष्ठ शभागृहात बहुमत मिळवणाऱ्या पक्षाचा किंवा युतीचा नेत्याची पंतप्रधान म्हणून निवड केली जाते. आज ऑस्ट्रेलियात 150 जागांसाठी मतदान सुरु आहे. या मतदानाचा निकाल 3 मेच्या रात्री किंवा 4 मे 2025 रोजी सकाळी जाहीर करण्यात येईल. कनिष्ठ सभागृहासोबतच, आज वरिष्ठ सभागृहासाठी 76 पैकी 40 जागांसाठी मतदान होत आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये 18 वर्षानंतरच्या सर्व नागरिकांना मतदान करणे अनिवार्य आहे. जर एखाद्या व्यक्तीने कोणत्याही अनावश्यक कारणास्तवर मतदान केले नाही तर त्याला 20 ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंड आकारण्यात येतो.
तसेच ऑस्ट्रेलियामध्ये पंतप्रधान पदासाठी वयाचे कोणतेही बंधन नाही. 18 किंवा त्याहून अधिक वयाचे निवडणूक लढवून शकतात आणि देशाचे पंतप्रधान बनू शकतात.
ॲंथनी अल्बानीज– ऑस्ट्रेलियाचे 31 वे पंचप्रधान आणि कामगार पक्षाचे नेते यावेळी पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार आहेत. 2022 मध्ये त्यांनी स्कॉट मॅरिसन यांचा निवडणुकीत पराभव केला होता आणि सरकार स्थापने केले. ॲंथनी यांची आई आयरिश वंशाची तर त्यांचे वडील इटालियन होते.
ॲंथनी यांनी सिडनी विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतील आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात वयाच्या 16 व्या वर्षी झाली. त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी कामगार पक्षामध्ये समावेश केला. त्यानंतर त्यांनी सिडनी विद्यापीठातून विद्यार्थी राजकारणात कामकाज पाहिजे. 1960 मध्ये सिडनी वेस्ट मतदारसंघात त्यांची खासदार म्हणून निवड झाली होती.
पीटर डटन – यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये लिबर-नॅशनल कोलिशनकडून पीटर डटन पंतप्रधानपदाचे दावेदार आहेत. 2022 पासून पीटर यांनी विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी संभाळली आहे. पीटर यांनी क्विन्सलॅंड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नटलॉजीमधझून बिझनेस स्टडीजमध्ये पदवी प्राप्त केली आहे.
त्यांनी 1989 ते 1999 पर्यंत क्विन्सलॅंडमध्ये पोलिस कर्मचारी म्हणून काम केले आहे. त्यांनी स्क्वॉड आणि सेक्स ऑफेंडर स्क्वॉडमध्ये आपली सेवा दिली आहे. त्यानंतर 2001 मध् क्वीन्सलॅंड मतदारसंघातून पीटर लिबरल पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले आणि येथूनच त्यांचा राजकीय कार्यकाळ सुरु झाला. त्यावेळी त्यांनी आरोग्य आणि क्रीड मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली.