Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा वापरले ‘ट्रम्प कार्ड’! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची पंतप्रधान मोदींशी चर्चा; केली ‘ही’ मोठी मागणी

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्याच्या एक आठवड्यानंतर ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी संवाद साधला. अध्यक्ष ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या प्रारंभानंतर दोन्ही नेत्यांमध्ये झालेला हा पहिला थेट संवाद आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 28, 2025 | 11:36 AM
US President Donald Trump spoke with Prime Minister Narendra Modi A week after being sworn

US President Donald Trump spoke with Prime Minister Narendra Modi A week after being sworn

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्याच्या एक आठवड्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी संवाद साधला. सोमवारी 27 जानेवारी 2025 फोनवरुन बऱ्याच वेळ चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान जागतिक शांततात व सुरेक्षाच्या सहकार्याचे आव्हान करण्यात आले. तसेच दोन्ही देशांतील निपक्ष व्यापारबद्दलही चर्चा करण्यात आली. अध्यक्ष ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या प्रारंभानंतर दोन्ही नेत्यांमध्ये झालेला हा पहिला थेट संवाद होता.

मोदींनी ट्रम्प यांना दिल्या शुभेच्छा

ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर आठवडाभराने झालेल्या या चर्चेत पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांचे अभिनंदन केले आणि भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत करण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. पंतप्रधान मोदी यांनी संवादानंतर, “माझ्या प्रिय मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करताना आनंद झाला. त्यांच्या ऐतिहासिक दुसऱ्या कार्यकाळासाठी त्यांचे अभिनंदन करतो. आम्ही एकमेकांवर विश्वास ठेवून परस्पर फायदेशीर सहकार्यासाठी वचनबद्ध आहोत. आमच्या जनतेच्या कल्याणासाठी आणि जागतिक शांतता, समृद्धी आणि सुरक्षेसाठी आम्ही एकत्रित काम करू.” असे म्हटले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी कारवाई; बेकायदेशीर स्थलांतरितांसाठी गुरुद्वारांमध्ये शोध सुरु

पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष ट्रम्प यांच्यातील संबंध त्यांच्या पहिल्या कार्यकाळापासून दृढ राहिले आहेत. 2019 मध्ये अमेरिकेतील “हाउडी मोदी” कार्यक्रम असो किंवा 2017 मध्ये व्हाईट हाऊस भेट, या महत्त्वाच्या क्षणांनी दोन्ही देशांतील संबंध मजबूत केले आहेत.

या मुद्द्यावर झाली चर्चा

व्हाईट हाऊसच्या निवेदनात ट्रम्प यांनी अमेरिकन संरक्षण साहित्य खरेदीबाबत अधिक भर दिला आणि व्यापार संबंध न्यायपूर्व करण्यावर भर दिला असल्याचे म्हटले. व्यापार विषयावर ट्रम्प यांनी भारताला “टॅरिफ किंग” संबोधले होते आणि भारताकडून अमेरिकन उत्पादनांवर जास्त शुल्क लावल्याचा मुद्दा मांडला होता. ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या उत्पादनांवरील शुल्क कमी करण्याचा इशार आपल्या पहिल्या कार्यकाळातही दिला होता. यामुळे 2019 मध्ये ट्रम्प प्रशासनाने भारताच्या GSP (Generalized System of Preferences) दर्जावर बंदी घातली होती.

इतर मुद्द्यांवरील चर्चा

अलीकडच्या काळात भारताने काही क्षेत्रांमध्ये आयात शुल्क कमी करण्याची तयारी दाखवली आहे. तसेच, अमेरिकेकडून अधिक ऊर्जा खरेदी करून व्यापार तूट कमी करण्याचे संकेतही दिले आहेत. संरक्षण क्षेत्रात, भारताने अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर संरक्षण साहित्य खरेदी वाढवली आहे. परंतु, भारताचा रशियासोबतचा संरक्षण संबंध, फ्रान्स आणि इस्रायलकडून साहित्य खरेदी, आणि “मेक इन इंडिया” धोरणांवर अमेरिकेचा आक्षेप आहे.

चीनच्या क्रियाकलापांवर लक्ष केंद्रीत करून भारत आणि अमेरिकेने क्वाड (Quad) संघटनेच्या संदर्भात सहकार्य वाढवण्यावरही भर दिला. भारताने या वर्षी प्रथमच क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेचे आयोजन केले आहे. या चर्चेत जागतिक शांतता, समृद्धी आणि सुरक्षा वाढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारताने पुन्हा बजावली ‘विश्वबंधुची’ भूमिका; इराकला केली ‘ही’ मोठी मानवतावादी मदत

Web Title: Us president donald trump spoke with prime minister narendra modi a week after being sworn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 11:36 AM

Topics:  

  • Donald Trump
  • india
  • narendra modi
  • US
  • World news

संबंधित बातम्या

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण
1

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
2

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
3

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
4

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.