Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Taiwan Security : भारत-पाक युद्धाचा चीनने घेतला फायदा? अमेरिकन काँग्रेसच्या अहवालात ‘मोठा’ स्फोटक दावा

Taiwan Security : अमेरिकन काँग्रेसच्या एका अहवालात असे उघड झाले आहे की चीनने मे 2025 च्या भारत-पाक संघर्षाचा वापर वास्तविक जीवनातील युद्धात आपल्या प्रगत शस्त्रांची चाचणी घेण्यासाठी केला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 19, 2025 | 03:19 PM
us report china used 2025 india pakistan conflict for defense tech showcase to muslim nations

us report china used 2025 india pakistan conflict for defense tech showcase to muslim nations

Follow Us
Close
Follow Us:
  1. अमेरिकन काँग्रेसच्या अहवालानुसार चीनने भारत-पाक संघर्षाचा वापर आपल्या प्रगत शस्त्रांची युद्धभूमीवर चाचणी घेण्यासाठी केला.
  2. या ‘रिअल वॉर टेस्ट’चे निकाल वाढवून दाखवत चीनने मुस्लिम देशांना शस्त्रे विक्रीसाठी मोठा प्रचार केला.
  3. एआय फोटो, व्हिडिओ-गेम ग्राफिक्स आणि बनावट प्रचाराच्या आरोपांनंतर इंडोनेशियासह अनेक देशांच्या खरेदी प्रक्रियेवर परिणाम झाल्याचा दावा.

US Congress report China weapons Pakistan conflict : भारत-पाकिस्तानमधील(India-Pakistan) मे २०२५ चा तणावपूर्ण संघर्ष आता आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिकन काँग्रेसच्या यूएस-चायना (US-China) इकॉनॉमिक अँड सिक्युरिटी रिव्ह्यू कमिशन (USCC) च्या नव्या अहवालात असा धक्कादायक दावा करण्यात आला आहे की चीनने या संघर्षाचा वापर आपल्या प्रगत शस्त्रास्त्रांची प्रत्यक्ष युद्धभूमीवर चाचणी घेण्यासाठी केला. केवळ चाचणीच नव्हे, तर या निकालांचा अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने प्रचार करून चीनने मुस्लिम देशांना मोठ्या प्रमाणावर शस्त्रे विकण्याचा प्रयत्न केल्याचाही खुलासा करण्यात आला आहे.

चीनचा ‘रिअल वॉर फिल्ड’ प्रयोग

अहवालानुसार, 7 ते 10 मे 2025 दरम्यान झालेल्या संघर्षात चीनने पाकिस्तानच्या सहकार्याने आपल्या अनेक आधुनिक शस्त्रांची पहिल्यांदाच प्रत्यक्ष युद्धात चाचणी घेतली.
यामध्ये प्रमुखत्वाने,

  • HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली
  • PL-15 हवेतून हवेत मारा करणारे प्रगत क्षेपणास्त्र
  • J-10C हे अत्याधुनिक लढाऊ विमान

या प्रणालींचा पाकिस्तानच्या तैनातीद्वारे प्रत्यक्ष वापर करण्यात आला.

USCC अहवालात नमूद केल्याप्रमाणे, हा संपूर्ण संघर्ष चीनसाठी ‘लॅब टेस्ट’ किंवा ‘फिल्ड एक्सपेरिमेंट’सारखा उपयोग करण्यात आला. युद्धात शस्त्रे कशी काम करतात, किती अचूकता मिळते आणि पाश्चात्य देशांच्या तंत्रज्ञानाशी तुलनात्मक प्रभाव काय आहे, याचा अभ्यास बीजिंगने युद्धस्थितीतूनच केला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Crisis : शेख हसीना नाही तर तुरुंगात असलेली ‘ही’ महिला उलथवून टाकू शकते बांगलादेशातील सत्ताकारण; वाचा कसे?

पाकिस्तानच्या दाव्यांचा चीनकडून प्रचारासाठी वापर

पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी संसदेत दावा केला होता की जे-10C विमानांनी भारतीय हवाई दलाची राफेलसह अनेक विमाने पाडली. अहवालात म्हटले आहे की हे दावे अतिशयोक्तीपूर्ण असण्याची शक्यता आहे. परंतु, चीनने या दाव्यांना जगभरात फिरवून आपली शस्त्रे पाश्चात्य तंत्रज्ञानापेक्षा अधिक प्रभावी असल्याचे चित्र उभे केले. चीनमधील दूतावासांनी विविध मुस्लिम देशांमध्ये या दाव्यांचे आक्रमकपणे मार्केटिंग केले, ज्यामुळे चीनच्या शस्त्रविक्रीला कृत्रिम बळ मिळाले.

एआय प्रतिमा, व्हिडिओ गेम ग्राफिक्स आणि चुकीच्या माहितीचे जाळे

USCC च्या आरोपांनुसार, चीनने सोशल मीडियावर बनावट अकाउंट्स तयार करून अनेक एआय-जनरेटेड प्रतिमा प्रसारित केल्या.
या प्रतिमांमध्ये

  • भारतीय विमानांचे कथित अवशेष
  • राफेल विमाने “अपयशी” ठरल्याचे दृश्य
  • जे-35 या चिनी लढाऊ विमानाचा “विजय” दाखवणारे ग्राफिक्स

यांचा समावेश होता.

अहवालानुसार, फ्रेंच गुप्तचर यंत्रणेने स्पष्ट केले की चीनच्या चुकीच्या माहिती मोहिमेनंतर इंडोनेशियाने राफेल खरेदी प्रक्रियेवर विराम दिला. हा भाग जागतिक स्तरावरील चिनी माहिती युद्ध किती सक्रिय आणि प्रभावी आहे, याचे उदाहरण मानला जातो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : White House : व्हाईट हाऊसमध्ये रोनाल्डोचा जलवा! सौदी क्राउन प्रिन्सच्या स्वागतासाठी ट्रम्पचा विनोद; एलोन मस्क-टिम कुकचीही उपस्थिती

पाकिस्तानचे चिनी शस्त्रांवर वाढते अवलंबित्व

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत पाकिस्तानच्या एकूण शस्त्रास्त्र आयातीपैकी तब्बल ८१ टक्के आयात चीनकडून झाली आहे.

जून 2025 मध्ये चीनने पाकिस्तानला,

  • ४० J-35 लढाऊ विमाने
  • KJ-500 हवाई चेतावणी प्रणाली
  • बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली

विकण्याची ऑफर दिली असल्याचेही अहवालात नमूद आहे.

Web Title: Us report china used 2025 india pakistan conflict for defense tech showcase to muslim nations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 03:19 PM

Topics:  

  • America
  • China
  • India pakistan Dispute
  • International Political news

संबंधित बातम्या

White House : व्हाईट हाऊसमध्ये रोनाल्डोचा जलवा! सौदी क्राउन प्रिन्सच्या स्वागतासाठी ट्रम्पचा विनोद; एलोन मस्क-टिम कुकचीही उपस्थिती
1

White House : व्हाईट हाऊसमध्ये रोनाल्डोचा जलवा! सौदी क्राउन प्रिन्सच्या स्वागतासाठी ट्रम्पचा विनोद; एलोन मस्क-टिम कुकचीही उपस्थिती

Sheikh Hasina च्या फाशीवर जगभरातून विविध प्रतिक्रिया; मात्र ब्रिटन अन् अमेरिका मौन
2

Sheikh Hasina च्या फाशीवर जगभरातून विविध प्रतिक्रिया; मात्र ब्रिटन अन् अमेरिका मौन

Takaichi Remarks : आशिया-पॅसिफिक प्रदेशात वादाचे ढग; ‘जर तैवानवर हल्ला झाला तर…’ जपान आणि चीनमध्ये तणाव शिगेला
3

Takaichi Remarks : आशिया-पॅसिफिक प्रदेशात वादाचे ढग; ‘जर तैवानवर हल्ला झाला तर…’ जपान आणि चीनमध्ये तणाव शिगेला

Su-57E Transfer : ‘अदृश्य विमान’ देऊन रशियाने भारताला करून दिली मैत्रीची आठवण; 100% तंत्रज्ञान हस्तांतरणाची तयारी
4

Su-57E Transfer : ‘अदृश्य विमान’ देऊन रशियाने भारताला करून दिली मैत्रीची आठवण; 100% तंत्रज्ञान हस्तांतरणाची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.