
Marco Rubio India Iran warning Modi Pezeshkian meeting Bishkek SCO summit
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेच्या निमित्ताने बिश्केक येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्यात झालेली हाय-प्रोफाईल भेट सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि जागतिक समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांच्या भेटीवर अमेरिकेची अत्यंत तीक्ष्ण नजर होती. या भेटीनंतर लगेचच अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो (Marco Rubio) यांनी एका मुलाखतीत जागतिक समुदायाला कडक शब्दांत इशारा दिला आहे की, ट्रम्प प्रशासनाचे निर्बंध झुगारून इराणला आर्थिक मदत करणाऱ्या किंवा त्याच्याशी व्यापार करणाऱ्या कोणत्याही देशावर अमेरिका थेट कारवाई करेल.
अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इराणविरोधात अत्यंत कठोर आर्थिक धोरण स्वीकारले आहे. याच संदर्भात एका प्रसिद्ध मुलाखतीदरम्यान मार्को रुबियो यांना बिश्केक येथील पंतप्रधान मोदी आणि इराणी राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियन यांच्यातील बैठकीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना रुबियो यांनी स्पष्ट केले की, जगातील अनेक देश आपापले स्वतंत्र परराष्ट्र धोरण आखतात आणि इराणच्या राजवटीशी संपर्क ठेवतात. अमेरिका स्वतःदेखील काही मुद्द्यांवर इराणी अधिकाऱ्यांशी चर्चा करत आली आहे. मात्र, राजनैतिक चर्चा आणि इराणला आर्थिक फायदा मिळवून देणे या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China : ड्रॅगनने दडवले तिबेटच्या शोकांतिकेचे सत्य; सेन्सॉरशिप ठरली आपत्ती, ‘RSF’ कडून चिनी डिजिटल नाकेबंदीचा पर्दाफाश
मार्को रुबियो यांनी ट्रम्प प्रशासनाची भूमिका विशद करताना सांगितले की, “अध्यक्ष ट्रम्प यांनी अगदी स्पष्ट शब्दांत संदेश दिला आहे. कोणत्याही देशाने इराणला अमेरिकन निर्बंधांतून पळवाट शोधण्यास मदत करू नये. इराणला असा कोणताही आर्थिक मार्ग किंवा यंत्रणा उभारू दिली जाणार नाही, ज्याद्वारे ते पैसा उभा करू शकतील आणि त्या पैशाचा वापर दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी किंवा अण्वस्त्रे विकसित करण्यासाठी करू शकतील. जर एखाद्या देशाने इराणला अशा प्रकारे मदत करण्याचा निर्णय घेतला, तर अमेरिकेला त्या देशावरही निर्बंध लादावे लागतील.”
Breaking: “I don’t think there’s a trade deal between India and Iran,” says U.S. Secretary of State Marco Rubio shutting down journalist’s speculation after Modi-Pezeshkian meeting at SCO pic.twitter.com/EQ9L4jMvbE — Shashank Mattoo (@MattooShashank) September 2, 2026
credit – social media and Twitter
तथापि, भारत आणि इराण यांच्यात कोणत्याही मोठ्या व्यापारी करारावर स्वाक्षरी झाली आहे असे आपल्याला वाटत नाही, असे सांगत रुबियो यांनी भारत-इराण संबंधांवरील तणाव निवळण्याचा प्रयत्नही केला. भारताचे जागतिक स्थान आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण विचारात घेता, अमेरिका परिस्थितीचे अत्यंत बारकाईने विश्लेषण करत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : America Minneapolis Shooting: अमेरिकेत अपार्टमेंटमध्ये अंधाधुंध गोळीबार; संशयित हल्लेखोरासह 3 ठार, तीन पोलिसांसह 7 जण जखमी
किर्गिझस्तानच्या बिश्केक येथे पार पडलेल्या SCO शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणी राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्यात झालेली भेट ही मुख्यत्वे राजनैतिक आणि प्रादेशिक शांततेवर केंद्रित होती. पश्चिम आशियात (मध्य पूर्व) सध्या पेटलेला लष्करी संघर्ष, व्यापारी जहाजांची सुरक्षा आणि प्रादेशिक स्थिरता या विषयांवर दोन्ही नेत्यांनी सखोल चर्चा केली. भारताने सुरुवातीपासूनच आपली भूमिका स्पष्ट ठेवली असून, कोणत्याही समस्येवर युद्धाच्या मैदानात नव्हे तर संवाद आणि राजनैतिक (Dialogue and Diplomacy) मार्गानेच तोडगा निघू शकतो, यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला.
दुसरीकडे, इराणी राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियन यांनी या कठीण काळात भारताने घेतलेल्या संयमी भूमिकेचे आणि सहकार्याचे कौतुक केले. या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताने आपल्या जागतिक प्रभावाचा आणि राजनैतिक क्षमतेचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी नवी दिल्लीला केले. भारत आणि इराण यांच्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध मजबूत असल्याचे सांगतानाच, चाबहार बंदरासारख्या धोरणात्मक प्रकल्पांवर आणि बहुपक्षीय मंचांवर एकत्र काम करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.