खेळ अजून संपलेला नाही! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणमध्ये घडतायेत मोठ्या घडामोडी
तेहरान : मध्य पूर्वेत गेल्या १० दिवसांपासून संकटाचे सावट आहे. इराण आणि इस्रायल दोन्ही एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहेत. याच दरम्यान अमेरिकेने इराणच्या अणुकेंद्रावर हल्ला केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर इराणने तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी देखील प्रत्युत्तरात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. या हल्ल्यानंतर इराणते सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.त्यांनी अमेरिकेच्या कारवाईला इराणच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करुन मोठा गुन्हा केल्याचे म्हटले आहे. तसेच याचा बदला घेण्याची शपथ देखील घेतली आहे.
दरम्यान यानंतर इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनींनी इलेक्ट्रॉनिक संवादापासून स्वत:ला दूर ठेवले आहेत. न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, खामेनी यांनी स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस वापरणे थांबवले आहे. तसेच सध्या खामेनी इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC)च्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्या आपल्या “विश्वासार्ह दूतां”द्वारे संपर्क साधत आहेत.
सध्या परिस्थितीत पाहता खामेनींना त्यांच्या हत्येची भीती वाटत आहे. कारण यापूर्वी इस्रायलकडून कामेनींच्या हत्येची त्यांना थेट धमकी मिळाली होती. इस्रायलचे पंतप्रधान बेंजानिम नेतन्याहू यांनी खेट खामेनींना त्यांच्या घरात घुसून हत्या करण्याची धमकी दिली होती. तसेच त्यांनी मध्य पूर्वेतील संकटामागे खामेनी असल्याचे आरोप नेतन्याहूंनी केला होती.
याशिवाय अमेरिका देखील खामेनींचा शोध घेत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अणु केंद्रावरी हल्ल्यापूर्वी खामेनींची हत्या करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु त्यांनी खामेनी कुठे लपून बसले आहेत हे सांगितले होते.
सध्या खामेनी अमेरिकेच्या हल्ल्यानंतर अधिक सावध झाले आहेत. त्यांनी आपल्या आपत्कालीन युद्ध रोजना सक्रिय केल्या आहेत. इराणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल सध्या खामेनींचा शोध घेत आहे. यासाठी ते मोबाईल ट्रॅकिंग तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. यामुळे खामेनींना त्यांचा जीव धोक्यात असल्याचे वाटत आहे. यामुळे त्यांनी स्वत:ला सर्व तंत्रज्ञानाच्या गोष्टींपासून दूर ठेवले आहे.
तसेच इराणमध्येही खामेनींच्या अनुपस्थितीत सत्तासंघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे. उत्तराधिकारीच्या निवडीला विलंब झाल्याने देशाच्या अंतर्गत व परराष्ट्र धोरणांवरही परिणाम होत आहे.