Us Strike On Iran : तेहरान : नुकतेच अमेरिकेने इराणच्या अणु ठिकाणांवर बॉम्ब हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दावा केला आहे की, इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या अणु केंद्राना उद्ध्वस्त करण्यात आले आहे. यामुळे इराणचे मोठे नुकसान झाले असल्याचे म्हटले जात आहे. मात्र इराणने कोणत्याही नुकसानीची पुष्टी केलेली नाही. तसेच ट्रम्प यांनी इराणने शांतता राखली नाही, तर आणखी हल्ले केले जातील असे म्हटले आहे.
या हल्ल्यानंतर इराणमध्ये संतापाचे वातावरण आहे. इराणने तीव्र संताप व्यक्त केला आहे. इराणने अमेरिकेच्या हल्ल्यांना धोकादायक आणि बेकायदेशीर म्हटले आहे. तसेच प्रत्युत्तरात्मक कारवाईचे देखील संकेत दिले आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी देखील तीव्र संताप व्यक्त केला आहे. यादरम्यान एका इराणी अधिकाऱ्याने धक्कादायक खुलासा केला आहे. अमेरिकेने एक दिवस हल्ल्याची माहिती दिली होती, असा दावा या वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे.
याच वेळी मध्य पूर्वेतील माध्यांमानी दिलेल्लाय वृत्तानुसार, एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने अमेरिकेने या हल्ल्यांचा इशारा आधीच दिले होता, असे म्हटले आहे. अद्याप या अधिकाऱ्याची ओळख स्पष्ट करण्यात आलेली नाही. परंतु २१ जून रोजी ट्रम्प यांनी इरणला संदेश पाठवला होता. त्यांनी संदेशात इराणशी युद्ध करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नसल्याचे म्हटले. परंतु फोर्डो, नतान्झ, आणि इस्फाहन अणुप्रकल्पांवर ते हल्ला करणार असल्याचे संदेशात सांगण्यात आले होते. यानंतर अमेरिकेने वेळेनुसार इराणच्या तिन्ही अणुकेंद्रांवर हल्ला केला.
इराणच्या अधिकाऱ्याने दावा केला आहे की, अमेरिकेता बॉम्ब हल्ला मध्यपूर्वेतील अमेरिकन तळावरुन करण्यात आलेला नाही. तर अमेरिकेच्या किमान तीन बी-२ बॉम्बर्सनी इराणच्या अणु केंद्रांवर बॉम्ब टाकले. यामध्ये फोर्डो हा इराणचा सर्वात महत्त्वाचा युरेनियमच्या साठ्याचा भाग होता. या केंद्राच्या दोन्ही प्रवेशद्वांरांवर बॉम्ब टाकण्यात आले. तसेच नतान्झ आणि इस्फाहन येथील अणुतळांवर पाणबुडीतून३० टोमाहॉक क्षेपणास्त्रे डागण्यात आली.
इराणच्या अधिकाऱ्याने दावा केला आहे की, अमेरिकेता बॉम्ब हल्ला मध्यपूर्वेतील अमेरिकन तळावरुन करण्यात आलेला नाही. तर अमेरिकेच्या किमान तीन बी-२ बॉम्बर्सनी इराणच्या अणु केंद्रांवर बॉम्ब टाकले. यामध्ये फोर्डो हा इराणचा सर्वात महत्त्वाचा युरेनियमच्या साठ्याचा भाग होता. या केंद्राच्या दोन्ही प्रवेशद्वांरांवर बॉम्ब टाकण्यात आले. तसेच नतान्झ आणि इस्फाहन येथील अणुतळांवर पाणबुडीतून ३० टोमाहॉक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. दरम्याम इराणच्या अणुउर्जा संस्थेने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.