US Vice President JD Vance expiln Trumps' secondary tarrif on India
US Tarrif On India : वॉशिंग्टन : अमेरिका आणि भारतामध्ये व्यापार तणाव वाढत चालला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर ५० टक्के कर लादला आहे. तसेच अतरिक्त २५ टक्के दंडही रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या कारणाने लादला आहे. ट्रम्प यांना असे करुन रशियावर दबाव निर्माण करायचा आहे. यामुळे रशिया युक्रेनविरुद्धचे युद्ध थांबवले असे ट्रम्प यांचे मत आहे. भारतावर दुय्यम करही (Tarrif) लादण्यात आला आहे.
याच वेळी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. एनबीसी न्यूजच्या मीट द प्रेस कार्यक्रमात त्यांनी मोठे विधान केले आहे. रशियाचे उत्पन्न तेलावर आधारित आहे. ट्रम्प यांना रशियाची तेल निर्यात कमी करुन त्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करायचे आहे. यामुळे व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) युक्रेन युद्ध थांबवतील असा त्यांचा विश्वास आहे. शिवाय १५ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीनंतर ट्रम्प यांचा विश्वास आणखी वाढला आहे की, अमेरिका रशिया आणि युक्रेन युद्धात (Russia Ukriane War) मध्यस्थी करु शकतो.
अमेरिकेवर ‘Tarrif Hike’ चा पहिला तडाखा; भारतासह युरोपीय देशांनी टपाल सेवा केली बंद
दरम्यान या प्रेस मिटींगमध्ये जेडी व्हान्स यांना अमेरिका रशियावर निर्बंध लादत असताना दबाव कसा निर्माण होईल? तसेच पुतिन झेलेन्स्कीसोबत शांतता चर्चा करायला येतील का? हल्ले थांबवणे कसे शक्य आहे? असे काही प्रश्न विचारण्यात आले.
यावेळी यावर उत्तर देताना व्हान्स यांनी सांगितले की, ट्रम्प रशियावर आर्थिक दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. भारताचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, चीननंतर भारत रशियाकडून सर्वाधिक कच्चे तेल आयात करत, जर भारतावर निर्बंध लादले तर यामुळे त्यांचा तेलाचा व्यापार कमी होईल. ज्याचा फटका रशियाला बसेल. याद्वारे ट्रम्प रशियाला युक्रेनवरील हल्ले थांवण्याचा संदेश देऊ इच्छित आहेत. तरच रशियाला जागतिक अर्थव्यवस्थेत स्थान मिळेल.
तसे पाहता रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करण्यामध्ये चीनचा नंबर लागतो. पण ट्रम्प यांनी चीनवर कोणताही आक्षेप घेतलेला नाही, पण भारतावर सतत टीका केली जात आहे.
भारताने केवळ राष्ट्रीय हितासाठी आणि जागतिक स्थिरतेसाठी रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचेही स्पष्ट केले आहे. तसेच रशियाशी व्यापार करणाऱ्यांमध्ये अमेरिकेचा आणि युरोपीय देशांचाही समावेश आहे. हे देशही रशियाकडून तेल खरेदी करता. पण यांच्यावर कोणताही अतरिक्त कर नाही.
स्वत: जयशंकर यांनी यावर उत्तर देत म्हटले आहे की, स्वत:ला व्यापार समर्थक म्हणणार अमेरिका इतरांना व्यापारबद्द प्रश्न विचारत आहे. हे हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी भारताशी व्यापार करण्यावर कोणालाही आक्षेप असले तर तो करु नये असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राजकुमारी डायना आणि एपस्टिन ‘Date’ वर? लंडनमधील भेटीचा दावा पुन्हा चर्चेत