US Vice President on four-day India visit, will visit Akshardham temple in Delhi
वॉशिंग्टन: अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस 21 एप्रिलपासून भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. हा दौरा विशेष महत्त्वपूर्ण मानला जात आहे. उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांचा हा गेल्या 13 वर्षांनंतरचा पहिलाच दौैरा आहे. या दौऱ्यादरम्यान जेडी वेंस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी भारतीय वंशाच्या उषा वेंस आणि त्यांची तीन मुले, इवान, विवेक, मीराबेल देखील येणार आहेत. जेडी वेंस सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत. हा दौरा पूर्ण होताच ते भारताकडे रवाना होतील.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (21 एप्रिल) सकाळी 10 वाजता ते दिल्लीच्या पालम विमानतळावर लॅंड करतील. त्यानंतर जेडी वेंस दिल्लीतील अक्षरधाम मंदिराला भेट देणार आहेत. तसेच पारंपारिक भारतीय हस्तकला पाहण्यासाठीही ते एका कॉम्पलेक्स मॉलला भेट देणार आहेत.
या भारत दौऱ्यादरम्यान जेडी वेंस पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभास, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत विन मोहन क्वात्रा यांच्या भेट घेणार आहे. यांच्याशी चर्चा करणार आहेत. पंतप्रधान मोदी त्यांच्या सन्मानार्थ एक खास डिनर देखील आयोजित करणार आहेत.
त्यानंतर जेडी वेंस सोमवारी (21 एप्रिल) रात्री जयपूरकडे रवाना होणार आहेत. मंगळवारी (22 एप्रिल) वेंस कुटुंबीय जयपूरमध्ये राहतील. बुधवारी ( 23 एप्रिल) जेडी वेंस आग्र्याला भेट देणार आहेत. जयपूरमध्ये जेडी वेंस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष स्वागताची तयारी करण्यात आली आहे. आमेर किल्ला, सिटी पॅलेस दाखनण्यासाठी जेडी वेंस कुटुंबीयांसाठी तयारी करण्यात आली आहे. तसेच राजस्थानच्या परंपरांचा अनुभव देखील जेडी वेंस यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये कठपुतलीचे नृत्य, लोकनृत्य, पारंपारिक पोशाख आणि राजस्थानी जेवणाचे आयोजन आहे.
या भेटीचा मुख्य उद्देश भारत-अमेरिका व्यापार संबंध दृढ करणे हा आहे. सध्या व्यापार आणि टॅरिफ धोरणांवरून दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. ट्रम्प प्रशासनाने भारतावर 26% टॅरिफ लावले होते, जे 90 दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. वेंस आणि मोदी यांच्यात व्यापार, आयात शुल्क, गैर-टॅरिफ अडथळे कमी करण्याबाबत चर्चा होणार आहे. दोन्ही देशांनी 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 500 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचा उद्दिष्ट ठेवले आहे.
हा दौरा वेंस यांच्यासाठी तसेच त्यांच्या पत्नी उषा वेंससाठी विशेष आहे, कारण हा उषा यांचा पहिलाच भारत दौरा आहे. त्यांचे मूळ आंध्र प्रदेशातील असून, त्या अमेरिकेत जन्मलेल्या आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Elon Musk लवकरच भारत दौऱ्यावर येणार; म्हणाले, “भारत भेटीसाठी…”