Elon Musk लवकरच भारत दौऱ्यावर येणार; म्हणाले, "भारत भेटीसाठी..." (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: प्रसिद्ध उद्योजक आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींश फोनवरुन संवाद साधला. या संवादनंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, भारत दौऱ्यावर येण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केल्यानंचर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, ” मी भारतात येण्याची आतुरतेने वाट असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, ” पंतप्रधान मोदींशी बोलणे हा एक सन्मान आहे. या वर्षाच्या अखेरीस भारत भेटीसाठी मी उत्सुक आहे!”
एलॉन मस्क यांनी ही पंतप्रधान मोदींच्या पोस्टला उत्तर देत भारत दौऱ्यावर येणार असल्याची माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी एलॉन मस्क यांच्याशी संवाद साधल्यानंतर ही पोस्ट शेअर केली होती. पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, मी एलॉन मस्क यांच्याशी संवाद साधला या संवादात वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या बैठकीतील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. याशिवाय अनेक विविध मुद्दयांवर चर्चा करण्यात आली. तसेच तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवीन संभाव्य उपक्रमांबद्दलही चर्चा करण्यात आली. या क्षेत्रांमध्ये अमेरिकेसोबत भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी बारत बचनबद्ध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.
It was an honor to speak with PM Modi.
I am looking forward to visiting India later this year! https://t.co/TYUp6w5Gys
— Elon Musk (@elonmusk) April 19, 2025
फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या अमेरिकी दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी एलॉन मस्क यांची भेट घेतली. या भेटीनंतर एलॉन मस्क आणि पंतप्रधान मोदींच्या या भेटीची खास चर्चा झाली. कारण डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलॉन मस्क यांची भेट घेतली होती. यामुळे चर्चांना उधाण आले. पंतप्रधान मोदींनी मस्क यांच्या मुलांशीही संवाद साधला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एलॉन मस्क यांच्या हा संवाद अशा वेळी झाला जेव्हा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 60 हून अधिर देशांवर परस्पर टॅरिफ लागू केले. यामुळे जागतिक स्तरावर व्यापार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. तसेच अमेरिकेचे चीनसोबत देखील मोठ्या प्रमाणात टॅरिफ युद्ध सुरुच होते. हा वाद जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरला. या दरम्यान भारताने व्यापर करारांच्या माध्यामातून टॅरिफवर तोडगा काढण्यासाठी आणि अमेरिकेशी असलेले संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करत होता.
एलॉन मस्क यांनी ट्रम्प प्रशासनातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाते. तसेच ट्रम्प आणि मस्क यांची मैत्रीही अनेक वेळा चर्चेचा विषय ठरली आहे. मस्क यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी ट्रम्प प्रशासनाला मोठी आर्थिक देणगी जाहीर केली होती.