Yemen war plans US war plan against Houthi rebels leaked accidentally information given to journalists
वॉशिंग्टन: सध्या अमेरिका येमेनमधील हुथी बंडखोरांविरोधात कारवाई करत आहे. अमेरिकेने हुथींवर हल्ले केले असून त्यांच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. याच दरम्यान अमेरिकेचा हुथींविरोधातील युद्धाचा प्लॅन लिक झाला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. सोमवारी (24 मार्च) एका इंग्रजी वृत्तसंस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात ट्रम्प प्रशासनाचा हुथींविरोधीतील युद्धाचा प्लॅन उघड करण्यात आला. यामध्ये ट्रम्प प्रशासनाच्या सिग्नल ग्रुप चॅटमध्ये एका पत्राकाराला चुकून ॲड करण्यात आले. या चॅटमध्ये अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी येमेधील हुथींवरील हल्ल्याबद्दल चर्चा सुरु होती.
या चर्चांमध्ये संरक्षण सचिव पीट हेगसेथ, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल वॉल्ट्झ उपाध्यक्ष जेडी वेन्स आणि आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या ग्रुपमधील चॅट्स लीक झाले असून चयामध्ये येमेनवरील हल्ल्याच्या वेळ, ठिकाण आणि शस्त्रास्त्रांच्या पॅकेजबद्दल चर्चा करण्यात आली आहे. ही महत्वाची माहिती सहसा विशिष्ट सरकारी यंत्रणांपुरतीच मर्यादित असते. मात्र, हे चॅट्स लीक झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. ही घटना सुरक्षेसाठी एक मोठी चूक मानली जात आहे.
इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या संपादकांना नियोजित हल्ल्याबद्दल दोन तास आधी याची माहिती मिळाली. 15 मार्च 2025 रोजी सकाळी 11:44 वाजता हेगेसेथ यांच्याकडून हल्ल्याची अचूक माहिती असलेला मेसेज मिळाला. त्यानंतर दुपारी 2 वाजता येमेनवर हल्ल सुरु झाले. ठरलेल्या वेळेनुसार येमेनमधील ठरलेल्या ठिकाणांवर हल्ले केले. अमेरिकन मासिक द अटलांटिकच्या काही पत्रकारांना या ग्रुपचॅटमध्ये ॲड करण्यात आले होते. मात्र, हल्ल्यापूर्वी आणि हल्ल्यानंतर अद्याप काढून टाकण्यात आले नाही.
याच दरम्यान दुसरीकडे इस्त्रायलचे सीरियात, लेबनॉन, गाझा या मध्यपूर्वेतील देशांमध्ये हल्ले सुरुच आहेत. इस्त्रायलने पालमीरा शहराजवळ दोन सीरियन तळांवर हवाई हल्ले केले आहेत. तर दुसरीकडे अमेरिका येमेनच्या हुथींवर हल्ले करत आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून कहर माजवला आहे. पॅलेस्टाईनस, येमेन लेबनॉन, सीरिया या देशांमध्ये मोट्या प्रमाणावर विध्वंस सुरु आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आदेशानुसार अमेरिकन सैन्याने हुथी बंडखोरांविरुद्ध हल्ले सुरु केले आहेत. लाल समुद्रात हुथी बंडखोरांनकडून व्यापारी जहाजांना सतत लक्ष्य केले जात होता. यामुळे अमेरिकेन शनिवारी येमेनच्या हुथी बंडखोरांवर हल्ले केले आहेत. अमेरिकेने हुथी बंडखोरांना इशारा दिला आहे. अमेरिकेने म्हटले आहे की, “हुथी बंडखोरांनी त्यांचे हल्ले थांबवले नाही तर याचे त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील.” राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हुथी बंडखोरांना समर्थन करणाऱ्या इराणला इशारा दिला आहे की, विद्रोहींना पाठिंबा देणे थांबवावे.