Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Oil Sanctions : जागतिक तेल बाजारात भूकंप? इराणच्या तेल खरेदीवरून अमेरिका आणि चीनमध्ये जुंपली, वाचा सविस्तर अपडेट

Iran Oil Blockade: इराणवर दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेने चीनला इराणी तेल खरेदी न करण्याचा उघड इशारा दिला आहे. अमेरिका आता दुय्यम निर्बंध लादणार आहे, ज्यामुळे जागतिक तणावात लक्षणीय वाढ होईल.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 16, 2026 | 01:51 PM
us warns china iranian oil trade trump secondary sanctions global energy impact 2026

us warns china iranian oil trade trump secondary sanctions global energy impact 2026

Follow Us
Follow Us:
  • चीनला अमेरिकेचा सज्जड दम
  • कमाल दबाव धोरण (Maximum Pressure)
  • भारतावरही परिणाम

Trump administration secondary sanctions China : जागतिक राजकारणात सध्या एका मोठ्या आर्थिक युद्धाची ठिणगी पडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या कंगाल करण्यासाठी आपले सर्वात शक्तिशाली अस्त्र बाहेर काढले आहे. अमेरिकेने आता थेट चीनला लक्ष्य करत, इराणकडून तेल खरेदी न करण्याचा कडक इशारा दिला आहे. चीन हा इराणच्या तेलाचा सर्वात मोठा ग्राहक असल्याने, या निर्णयाचा परिणाम केवळ या दोन देशांवरच नाही, तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे.

चीनची कोंडी आणि अमेरिकेचे ‘दुय्यम निर्बंध’

ट्रम्प प्रशासनाचे नवीन धोरण अत्यंत आक्रमक आहे. अमेरिकेने स्पष्ट केले आहे की, जे देश किंवा कंपन्या इराणसोबत व्यापार करतील, त्यांच्यावर ‘दुय्यम निर्बंध’ लादले जातील. याचा अर्थ असा की, जर चीनने इराणकडून तेल खरेदी सुरूच ठेवली, तर अमेरिकन बँकिंग प्रणाली आणि बाजारपेठ चीनसाठी बंद केली जाऊ शकते. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट यांनी ही भूमिका मांडताना सांगितले की, “कोणत्याही देशाच्या बँकेत इराणचा पैसा दिसला, तर त्या देशाला अमेरिकेच्या रोषाला सामोरे जावे लागेल.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘एक सैनिक = 1 अब्ज डॉलर्स’, मोजतबा खामेनीचे लष्करी सल्लागार मोहसेन रझाई गर्जले; दिले थेट ट्रम्पना चॅलेंज

तेल पुरवठा साखळीवर मोठा आघात

अमेरिकेने केवळ कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात केली आहे. इराणच्या तेल वाहतुकीत गुंतलेली जहाजे आणि संबंधित कंपन्यांवर कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. यापूर्वी दिलेली ३० दिवसांची सवलत, ज्यामध्ये १४० दशलक्ष बॅरल तेल बाजारात पोहोचले होते, ती आता वाढवण्यास अमेरिकेने स्पष्ट नकार दिला आहे. इतकेच नाही तर रशियन तेलावरील सवलतीही काढून घेतल्या गेल्या आहेत. यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा कमी होऊन किमती गगनाला भिडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

🇺🇸🇨🇳 Sec Bessent just warned 2 Chinese banks straight up: “If Iranian money is flowing through your accounts, secondary sanctions are coming.” China was officially put on notice https://t.co/MTak64Y0pJ pic.twitter.com/XIebdQ8wY7 — Mario Nawfal (@MarioNawfal) April 15, 2026

credit – social media and Twitter

भारतासमोर मोठे पेचप्रसंग

अमेरिकेच्या या ‘कमाल दबाव धोरणा’चा फटका भारतालाही बसताना दिसत आहे. भारताने दीर्घ काळानंतर इराणकडून ऊर्जा खरेदी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता अमेरिकेच्या कडक भूमिकेमुळे भारताला आपल्या ऊर्जा धोरणात बदल करावा लागू शकतो. स्वस्त तेल मिळवण्याचे मार्ग बंद झाल्यामुळे देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर याचा थेट परिणाम होऊ शकतो. रशिया आणि इराण या दोन्ही देशांकडून मिळणाऱ्या सवलतीच्या तेलावर आता अमेरिकेची वक्रदृष्टी पडली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Amir Hamza : ‘यमदूत आला अन् गेम करून गेला’, हाफिज सईदचा ‘उजवा हात’ लाहोरमध्ये रक्ताच्या थारोळ्यात, भारताच्या शत्रूचा गेम ओव्हर

दोन महासत्तांमधील भविष्यातील संघर्ष

तज्ज्ञांच्या मते, चीन सहजासहजी अमेरिकेच्या या दबावापुढे झुकणार नाही. इराणचे तेल चीनच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत स्वस्त आणि महत्त्वाचे आहे. त्यामुळे बीजिंग आणि वॉशिंग्टन यांच्यातील हा संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. इराणने जरी निर्बंध टाळण्यासाठी गुप्त मार्ग शोधले असले तरी, अमेरिका यावेळी तंत्रज्ञान आणि सागरी नाकेबंदीच्या जोरावर हे सर्व मार्ग बंद करण्यासाठी सज्ज झाली आहे. हा संघर्ष येणाऱ्या काळात जागतिक राजकारणाला कोणत्या दिशेला नेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने चीनला कोणता इशारा दिला आहे?

    Ans: अमेरिकेने चीनला इराणकडून तेल खरेदी करणे थांबवण्यास सांगितले आहे, अन्यथा चीनच्या बँकिंग आणि व्यावसायिक क्षेत्रावर कडक दुय्यम निर्बंध लादले जातील.

  • Que: 'कमाल दबाव धोरण' (Maximum Pressure Policy) काय आहे?

    Ans: इराणचा महसूल पूर्णपणे थांबवून त्याला अण्वस्त्र निर्मिती आणि दहशतवादाला खतपाणी घालण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेने राबवलेले हे अत्यंत कडक आर्थिक निर्बंधांचे धोरण आहे.

  • Que: या निर्णयाचा भारतावर काय परिणाम होईल?

    Ans: रशिया आणि इराणकडून मिळणारे स्वस्त तेल बंद झाल्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय बाजारातून महागड्या दराने तेल खरेदी करावे लागू शकते, ज्याचा परिणाम इंधन दरवाढीवर होईल.

Web Title: Us warns china iranian oil trade trump secondary sanctions global energy impact 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • America
  • iran
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

India Seychelles: PM Modi रचणार इतिहास, सेशेल्सला पोहचले; 3 दिवसांचा दौरा ठरणार खास
1

India Seychelles: PM Modi रचणार इतिहास, सेशेल्सला पोहचले; 3 दिवसांचा दौरा ठरणार खास

Ukraine चा क्रिमियावर हिंसक हल्ला, रशियाने केली आणीबाणी जाहीर; बेलारूसचा झेलेन्स्कीना इशारा
2

Ukraine चा क्रिमियावर हिंसक हल्ला, रशियाने केली आणीबाणी जाहीर; बेलारूसचा झेलेन्स्कीना इशारा

Donald Trump: अमेरिकन परदेशी मंत्री मार्को रुबियोची मोठी घोषणा, भारतात येणार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प
3

Donald Trump: अमेरिकन परदेशी मंत्री मार्को रुबियोची मोठी घोषणा, भारतात येणार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार
4

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.