
iran threat us soldiers ransom blockade gulf of oman conflict 2026
Mohsen Rezaei warning to America 1 billion dollars : जागतिक राजकारणात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धक्कादायक ठिणगी पडली आहे. अमेरिका आणि इराणमधील तणाव (US-Israel Iran War) आता केवळ शब्दांपुरता मर्यादित न राहता थेट ‘खंडणी’ आणि ‘ओलीस’ ठेवण्याच्या धमकीपर्यंत पोहोचला आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचे लष्करी सल्लागार मोहसेन रझाई यांनी अमेरिकेला थेट आव्हान दिले आहे की, जर अमेरिकेने जमिनीवरून हल्ला केला, तर इराण हजारो अमेरिकन सैनिकांना पकडून त्यांच्या बदल्यात अब्जावधी डॉलर्सची खंडणी वसूल करेल.
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये झालेली शांतता चर्चा कोणत्याही निष्कर्षाविना संपल्यानंतर ट्रम्प प्रशासनाने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. अमेरिकन नौदलाने अरबी समुद्र आणि ओमानच्या आखातात इराणी जहाजांवर कडक नाकेबंदी (Blockade) लादली आहे. अमेरिकेच्या युद्धनौका या भागात सतत गस्त घालत असून इराणी बंदरांकडे जाणारा व्यापार रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेच्या या हालचालीमुळे आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग गडद झाले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sicily Base : ‘धैर्यहीन नेत्या!’ ट्रम्प आणि मेलोनींची ‘केमिस्ट्री’ बिघडली; इटलीच्या ‘या’ एका निर्णयाने अमेरिका संतापली
इराणच्या प्रत्युत्तराने मात्र सर्वांनाच धक्का दिला आहे. मोहसेन रझाई यांनी अमेरिकेला डिवचताना म्हटले की, “तुम्ही सैन्य पाठवाच… आम्ही त्यांना पकडून तुमच्याकडून कोट्यवधी रुपये उकळू. प्रत्येक अमेरिकन सैनिकासाठी आम्ही १ अब्ज डॉलर्सची खंडणी घेऊ.” इराणने केवळ पैशांचीच मागणी केली नाही, तर या सैनिकांना ते ‘सौदेबाजीचे साधन’ म्हणून वापरतील असा दावाही केला आहे. रझाई यांच्या मते, इराणची क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या महाकाय युद्धनौकांना समुद्रात गाडण्यास पूर्णपणे सक्षम आहेत.
This war will cost $1 TRILLION dollars for America, America’s soil is poisoned with aluminum https://t.co/bSvGscWfqW — Redacted (@RedactedNews) April 15, 2026
credit – social media and Twitter
रझाई यांनी थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टीका करताना विचारले की, अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीचा ‘पोलीस’ बनायचे आहे का? त्यांनी स्पष्ट केले की इराण कोणत्याही शस्त्रसंधीच्या बाजूने नसून आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. इराणच्या या आक्रमक भूमिकेमुळे ओमानचे आखात आणि होर्मुझची सामुद्रधुनी हे भाग आता ‘हाय अलर्ट’वर आले आहेत, कारण जगाचा मोठा तेल व्यापार याच मार्गावरून होतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Peace Talks : 34 वर्षांचे हाडवैर संपणार? ट्रम्प यांचा तो एक ‘मेसेज’ अन् इस्रायल-लेबनॉनमध्ये शांततेची नांदी; उद्या होणार मोठा फैसला
या भीषण परिस्थितीत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला आहे. “जग सध्या एका मानवतावादी संकटाच्या उंबरठ्यावर आहे. संघर्ष हा मार्ग असू शकत नाही, तर आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करून संवाद साधणे गरजेचे आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. व्हॅटिकनमधून पोप लिओ यांनीही “जग युद्धाला कंटाळले आहे” असे म्हणत हिंसाचार थांबवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, दोन्ही देशांमधील वाढता अहंकार जागतिक शांततेला सुरुंग लावतो की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
Ans: इराणचे लष्करी सल्लागार मोहसेन रझाई यांनी म्हटले आहे की, जर अमेरिकेने जमिनीवरून हल्ला केला तर इराण त्यांच्या सैनिकांना ओलीस ठेवून प्रत्येकी १ अब्ज डॉलर्सची खंडणी मागेल.
Ans: इस्लामाबादमधील शांतता चर्चा अपयशी ठरल्यानंतर अमेरिकेने इराणी बंदरांवर नौदल नाकेबंदी केल्यामुळे या भागात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Ans: सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दोन्ही देशांना युद्धाऐवजी संवाद साधण्याचे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.