Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

VIDEO VIRAL : ब्राझीलमध्ये भीषण दुर्घटना; 21 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या हॉट एअर बलूनने घेतला पेट, ८ जणांचा मृत्यू

Brazil Hot Air Balloon Crash : ब्राझीलमध्ये एक भीषण दुर्घटना घडली. २१ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या हॉट एअर बलूनला आग लागली. यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 22, 2025 | 11:41 AM
VIDEO VIRAL Hot Air Balloon Crash In Brazil With 21 Onboard, 8 killed in accident

VIDEO VIRAL Hot Air Balloon Crash In Brazil With 21 Onboard, 8 killed in accident

Follow Us
Close
Follow Us:

ब्राझिलिया : ब्राझीलमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. एका हॉट एअर बलूनला आग लागल्याने ८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलच्या दक्षिणेकडील सांता कॅटरिना राज्यात ही दुर्घटना घडली. शनिवारी (२१ जून) कॅटरिनामध्ये २१ प्रवाशांना घेऊन हे हॉट एअर बलून निघाले होते. या बलूनने अचानक पेट घेतला आणि खाली कोसळले. यामध्ये किमान आठ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळच्या उड्डाणादरम्यान पर्यटकांच्या हॉट एअर बलुनला आग लागली. त्यानंतर हॉट एअर बलून ब्राझीलच्या प्रेया ग्रांडे शहरात कोसळले. यामध्ये २१ पर्यटक होते. यातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३ जण जखणी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेचा भयावह व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Israel Iran War : काय आहे इस्रायलची ‘Shaldag’ कंमाडर योजना? इराणच्या अणु ठिकाणांना करणार उद्ध्वस्त?

8 DEAD. And for what? A balloon ride. A selfie. A thrill. 🎈💔

A hot air balloon crashed in Brazil.
It was illegal.
No safety checks. No license. No shame.

People boarded it hoping for memories.
They got tragedy.

Adventure without responsibility is a crime — not tourism.

Stop… pic.twitter.com/SuEkxcdZRq

— World Wire (@WorldWireX) June 21, 2025

अपघातीची ही पहिलीच घटना नाही

यापूर्वी देखील अशा अनेक हॉट एअर बलूनला आग लागल्याच्या घटना घडल्या आहे. गेल्या रविवारी (१५ जून) देखील ब्राझीलच्या साओ पाऊलो राज्यात एका हॉट एअर बलूनने पेट घेतला होता. यामध्ये २७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर ११ जण जखमी झाले होते.

ब्राझीलमध्ये प्रेया ग्रांडे हे हॉट-एअर बलूनिंगसाठी स्थळ आहे. पर्यटकांना येथे हॉट एअर बलूनमध्ये उडण्याचा आनंद घेता येतो. यासाठी दूरवरुन लोक इथे येतात.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या शनिवारी (२१ जून) घडलेल्या या भयावह अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या या घटनेचा तपास सुरु आहे. आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु पर्यटकांच्या बेजबाबदार कृत्यामुळे ही घटना घडली असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या अपघातामुळे ब्राझीलच्या सांता कॅटरिना अधिकाऱ्यांचीही चौकशीही सुरु आहे. कोणत्याही सुरक्षातपासणीशिवाय हा उपक्रम राबला जात असल्याने अधिकाऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Israel Iran War : इराणचे ‘ही’ चार धोकादायक शस्त्रास्त्रे ज्यामुळे इस्रायलही दहशतीत; पाश्चात्य राष्ट्रेही सतर्क

Web Title: Video viral hot air balloon crash in brazil with 21 onboard 8 killed in accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 11:41 AM

Topics:  

  • Brazil
  • viral video
  • World news

संबंधित बातम्या

अवकाशातून येतोय मृत्यू…! ११६ दिवसांनंतर काय होणार आहे? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जग हादरले
1

अवकाशातून येतोय मृत्यू…! ११६ दिवसांनंतर काय होणार आहे? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जग हादरले

Viral Video: याला म्हणतात देसी जुगाड! चिखलाच्या पाण्यापासून वाचण्यासाठी रिक्षा चालकाने केले असे काही…; तुम्हीही व्हाल चकित
2

Viral Video: याला म्हणतात देसी जुगाड! चिखलाच्या पाण्यापासून वाचण्यासाठी रिक्षा चालकाने केले असे काही…; तुम्हीही व्हाल चकित

वाह क्या बात है! चिमुकल्या गजराजाने हरणाला सोंडेत उचलले अन्…; Viral Video ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
3

वाह क्या बात है! चिमुकल्या गजराजाने हरणाला सोंडेत उचलले अन्…; Viral Video ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

Video Viral: दुसऱ्याच मुलीसह आला बॉयफ्रेंड, पहिली अचानक आली समोर अन् मग…हाय वोल्टेज ड्रामा!
4

Video Viral: दुसऱ्याच मुलीसह आला बॉयफ्रेंड, पहिली अचानक आली समोर अन् मग…हाय वोल्टेज ड्रामा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.