Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East Breaking :जगाची धडधड वाढली,तेलाच्या बाजारात खळबळ ;रियादच्या Aramco वर हुथींचा हल्ला

Middle East Breaking: येमेनमधील सत्ता संघर्ष आणि इराण-सौदीमधील प्रादेशिक स्पर्धेमुळे हुथी आणि सौदी अरेबियामधील संघर्ष वाढला. सौदीच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून हुथी सौदीतील लष्करी व ऊर्जा सुविधांना लक्ष्य करत असल्याचे सांगतात. Aramcoवरील हल्ल्याच्या दाव्यामुळे तेलपुरवठा आणि जागतिक ऊर्जा बाजाराबाबत चिंता वाढली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 04, 2026 | 05:39 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • नेमका वाद का आहे
  • तेलाच्या किमती वाढण्याचा धोका
  • जागतिक तेल बाजारात अनिश्चितता
Middle East Breaking : हमास ने इस्रायलवर हल्ला केला हे सांगून इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ले करून गाझा पट्टी बेचिराख करायला सुरवात केली . त्यानंतर काही काळात इस्रायलने इराणवर हल्ला केला आणि इराण इस्रायल युद्ध सुरु झाले . यात अमेरिकेने उडी घेतली त्यामुळे इराणने अमेरिकेला उत्तर देण्यासाठी मध्यपूर्वेतील आखाती देशांनी आपली जागा इराणवर हल्ले करण्यासाठी अमेरिकेला वापरायला दिली यामुळे आखाती देशांसोबत इराणचे पुन्हा वाकडे झाले .

यात इराण सुरवातीला एकटाच या सगळ्यांशी लढत असताना लेबनॉन वर इस्रायलने हल्ले करायला सुरवात केली . तेव्हा येमेन मधील हुथींना इराणला मदत करण्यासाठी युद्धात उतरावे लागले . त्यांनी लाल समुद्र बंद करून आखाती देशांची तेल वाहतुकीची पंचायत केली . याला पर्याय म्हणून सौदीने पाइपलाइनद्वारे मोठ्या प्रमाणात तेल विक्री सुरु केली त्यावर हुथींनी पाइपलाइनवर हल्ला करून तिला थोडी मोडकळीला आणली .

त्यानंतर सौदी आणि हुथींचा चॅप्टर सुरु झाला . तसा सौदी आणि येमेन मधील हुथीं यांचे वाद खूप जुने आहेत . पण यासगळ्या मुळे जगाला सर्वात जास्त तेल पुरवठा करणाऱ्या आखाती देशाच्या तेल कंपन्यांवर हल्ले झाल्यामुळे तेलाचे संकट हे अधिक गडध झाले . आणि याचा परिणाम युद्धात सामील नसलेल्या देशांना सुद्धा भोगायला लागायला सुरवात झाली आहे .

Flydubai Flight Incident: फ्लायदुबई विमान अपघातात विमान उतरण्यापर्यंत प्रवाशांमध्ये झटापट; कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

नेमका वाद का आहे

२०१४ मध्ये हुथींनी येमेनची राजधानी सना ताब्यात घेतली आणि आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या सरकारला सत्तेपासून दूर केले . कारण सत्तेत बसलेले सरकार हे सौदी धार्जिणे होते म्हणून . त्यानंतर २०१५ मध्ये सौदी अरेबियाने लष्करी हस्तक्षेप केला . आपल्या सीमेवर नियंत्रण नको होते . आणि इराणचा प्रभाव वाढण्याचीही त्यांना भीती होती . हुथींना इराणकडून राजकीय आणीन लष्करी पाठबळ मिळते , तर सौदीने येमेनच्या आंतराराष्ट्रीय मान्यताप्राप्त सरकारला पाठिंबा दिला .

त्यामुळे हा संघर्ष येमेनच्या अंतर्गत गृहयुद्ध अधिक सौदी इराणमधील प्रादेशिक स्पर्धा असा बनला .सौदी आणि आखातातील लोक हुथींना कनिष्ठ आदिवासी लोक मानतात . त्यामुळे हा संघर्ष अधिकच पेटत राहिला आहे . २०२२ मध्ये खूप प्रयत्नांनी UN च्या मध्यस्थीने युद्धविराम झाला होता .

पण कायमस्वरूपी राजकीय तोडगा निघाला नाही . आता २०२६ मध्ये मध्य पूर्वेत पुन्हा भडका उडाला असून तणाव वाढून कैक निष्पाप नागरिकांना आपला संसार जिथे होता तिथे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे .

US Midterms 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 90 डॉलर्सची आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर

तेलाच्या किमती वाढण्याचा धोका

आधीच युद्धाच्या प्रकरणामुळे जगभरात तेलाच्या किमती या वाढल्या आहेत . कारण होर्मूझ अजूनही बंद असल्याने जगाची २० टक्के तेलवाहतूक ठप्प आहे . त्यात लाल समुद्रातील हुथींच्या कब्ज्यामुळे तेथील सुद्धा वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे .

आणि अशातच जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर म्हणजे अरामकोवर हल्ला झाल्यावर किंवा तिच्या वितरण सुविधेला मोठे नुकसान झाल्यास जागतिक बाजारात पुरवठ्याबाबत चिंता वाढू शकते . त्यामुळे कच्या तेलाच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे .

जागतिक तेल बाजारात अनिश्चितता

सौदीच्या तेल पायाभूत सुविधांवर वारंवार हल्ल्याचा धोका निर्माण झाल्यास गुंतवणूकदार आणि तेल व्यापाऱ्यांमध्ये चिंता वाढू शकते . खासकरून Red Sea आणि Bab al Mandeb मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा ठरतो . हा मार्ग जागतिक तेल वाहतुकीसाठी महत्वाचा आहे .

Web Title: Middle east breaking global anxiety spikes oil market in turmoil houthis attack riyadhs aramcocp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • Breaking News
  • Houthi
  • marathi latest news
  • Middle East War Impact
  • World news

संबंधित बातम्या

Kautilya Conclave 2026 : न्यूझीलंडसोबतच्या FTA मुळे भारताला मोठे यश; वाचा ‘हा’ कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह मधील विशेष रिपोर्ट
1

Kautilya Conclave 2026 : न्यूझीलंडसोबतच्या FTA मुळे भारताला मोठे यश; वाचा ‘हा’ कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह मधील विशेष रिपोर्ट

Flydubai Flight Incident: फ्लायदुबई विमान अपघातात  विमान उतरण्यापर्यंत प्रवाशांमध्ये झटापट; कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
2

Flydubai Flight Incident: फ्लायदुबई विमान अपघातात विमान उतरण्यापर्यंत प्रवाशांमध्ये झटापट; कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

US Midterms 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 90 डॉलर्सची आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर
3

US Midterms 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 90 डॉलर्सची आर्थिक मदत; जाणून घ्या सविस्तर

France Student Protest : फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड धुमाकूळ! 5 हजार हून अधिक अटक; 6 ऑक्टोबरला देशव्यापी संपाची हाक
4

France Student Protest : फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड धुमाकूळ! 5 हजार हून अधिक अटक; 6 ऑक्टोबरला देशव्यापी संपाची हाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.