Violence erupts again in America, Six people killed in shooting in Philadelphia
वॉशिंग्टन : अमेरिकेत पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना घडली आहे. अमेरिकेच्या फिलाडेल्फियात सार्वजनिक ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू तर ३१ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सोमवारी (७ जुलै) स्थानिक वेळेनुसार पहाटे ही घटना घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच या भयावह घटनेटचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्थानिक पोलिसांनी या घटनेचे वर्णन भ्याड हल्ला म्हणून केले आहे. पोलिसांनी सांगिकले की, हल्लेखोरांनी गर्दीवर अचानक गोळीबार सुरु केला. या गोळीबारात लहान मुले आणि अल्पवयीन मुलांचा सामवेश होता. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून हे सर्व वृद्ध व्यक्ती होते. सध्या गोळीबारात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपाचार सुरु आहे. यंदा २०२५ च्या सुरुवातीपासून अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थावर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
सध्या सोशल मीडियावर या भ्याड हल्ल्याचा एक सीसीटीव्ही फूटेज देखील व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हल्लेखोर बेधडकपणे गोळीबार करताना स्पष्ट दिसत आहे. तसेच लोक आपला जीव वाचवण्यासाठी आरडा-ओरडा करत आहे, सर्वत्र पळत आहे. या भयावह घटनेने फिलाडेल्फियातील लोकांमध्ये दहशतीचे वातावरणे निर्माण झाले आहे. सध्या या घटनेचा तपास सुरु करण्यात आले आहे. अद्याप गोळीबारामागचे कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. सध्या त्याची चौकशी सुरु आहे.
The Declaration was signed in Philadelphia on July 4, 1776
Here is Philadelphia on 4th of July weekend 249 years later
What happened? https://t.co/pRSDc3JNzh
— Jack Poso 🇺🇸 (@JackPosobiec) July 7, 2025
यापूर्वी शिकागोमध्ये देखील एका रेस्टॉरंटबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. ३ जुलै रोजी घडलेल्या या घटनेत चार जणांचा मृत्यू आणि १४ जण जखमी झाले होते. या घटनेमागचे कारणही अद्याप अस्पष्ट आहेत. गेल्या काही काळात अमेरिकेत हिंसाचाराचे प्रमाण वाढत आहे. यामुळे सरकारच्या नागरिकांच्या सुरक्षा आणि उपायोजनांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Multiple mass shootings erupted in Philadelphia over Fourth of July weekend, leaving a total of six people dead and 31 shot/injured. 🔫
One scene was so chaotic that a vehicle rammed into an off-duty police officer after running a red light. The windshield had a bullet hole. pic.twitter.com/THSv8Qoien
— Key To The City 🔑 (@K3yToTheCity) July 7, 2025