US Iran Tension : युद्धाचा बिगुल वाजला! इराणी नागरिकांच्या फोनवर 'Wait and See' चा गूढ संदेश; विनाशाचा संकेत? (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
याच वेळी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराणी नागरिकांच्या फोनवर एक गूढ संदेश मिळाला आहे. यामुळे इराणी नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. मध्यपूर्वेत विनाशकारी युद्धाचे संकेत मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इराणमधील हजारो लोकांच्या त्यांच्या फोनवर फारसी भाषेत गूढ संदेश आता आहे. अज्ञात नंबरवरुन Wait and See चा मेसेज लोकांना मिळाला आहे. यामुळे इराणमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकतेच अमेरिकेकडून इराणवर हल्ल्याचे संकेत मिळाले आहे. कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो असे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे इस्रायली राजदूत माइक हक्कबी यांनी ग्रेटर इस्रायलला समर्थन करणारे खळबळजनक विधान केले आहे. हे विधान इराणवर थेट हल्ल्याचा इशारा मानला जात आहे.
हक्कबी यांनी इस्रायलला (Israel) त्यांच्या बायबलमधील हक्काुनसार त्यांच्या प्रदेशावर ताबा मिळवण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी इस्रायलचा नाईल नदीपासून ते युफ्रेटीस नदीपर्यंतचा भाग इस्रायलच्या ताब्यात लवकरत येईल असे म्हटले आहे. केवळ अरब राष्ट्रांच्या सीमा आमती रेड लाईन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेने इराणला चहुबाजूंनी घेरले आहे. अमेरिकन सैन्याने कॅरिबयन समुद्रात १५० फायटर जेट्स, १२ एअरक्राफ्ट कॅरिअर्स, ने जगातील सर्वात मोठा आणि आधुनिक युद्धनौकांचा ताफा तैनात केला आहे. यामध्ये USS Gerald R. Foard, USS Abraham Linclon इराणच्या भोवती तैनात केला आहे. अमेरिका थेट इराणच्या अणुकेंद्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सुविधा उद्ध्वस्त करण्याच्या तयारी अमेरिकेने केली आहे.
इराणने देखील अमेरिकेने हल्ला केल्यास प्रत्युत्तराची तयारी दर्शवली आहे. अमेरिकेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी इराणने आपली एअर डिफेन्स सिस्टीम अधिक मजबूत केली आहे. तसेच महत्वाची अणुकेंद्र सुरक्षित बंकरमध्ये हलवण्यात आली आहेत. खामेनेईंनी अमेरिकेच्या जहाजांना समुद्रात बुडवण्याची धमकीही दिली आहे. तसेच आपले सर्वात घातक शस्त्र सय्यद-३जी क्षेपणास्त्राची देखील यशस्वीपणे केली आहे.
दरम्यान अमेरिका (America) इराणमधील तणाव पाहता भारताने खबरदारी म्हणून मोठे पाऊल उचलले आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना तेहरान तातडीने सोडण्याची आदेश दिले आहेत. कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडू शकतो, या भीतीने भारतीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Ans: अमेरिकेचे राष्ट्राध्यत्र डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी कारवाईचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे दोन्ही देशांतील तणाव लक्षणीरित्या वाढला आहे.
Ans: इराणच्या नागरिकांना फारसी भाषेत Wait and See असा गूढ संदेश मिळाला आहे.
Ans: अमेरिकेने हल्ला केल्यास इराणने प्रतिहल्ला करेल आणि अमेरिकेच्या युद्धनौकांना समुद्रात बुडवून टाकेल असा इशारा इराणकडून मिळाला आहे.






