Warning for India and America, This dangerous weapon will join China's navy
बिजिंग : भारत आणि अमेरिकेसाठी एक धोकादायक माहिती समोर येत आहे. चीनच्या नौदलात एक धोकादायक शस्त्र सामील होणार आहे. चीनच्या सरकारी प्रसामाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या नौदलात सर्वात अत्याधुनिक विमानवाहू युद्धनौका फुजियान सामील होणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत ही युद्धनौका चीनच्या नौदलात सामील होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन वर्षांपासून चीन या विमानवाहू जहााची चाचणी घेतेल आहे. याच्या समुद्री चाचण्या आणि शस्त्र चाचण्या घेण्यात आल्या असून सर्व यशस्वी ठरल्या आहेत. यामुळे लवकरच हे फुजियान जहाज सेवेत दाखल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चीनी वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या नौदलात हे फुजियान युद्धनोका सामील झाल्यावर यामध्ये लढाऊ विमाने तैनात केली जाणार आहेत. यामध्ये ३६ लढाऊ विमानांसाठी जागा आहे. हे फुजियान जहाज फ्लाइट डेकवरुन एकाचवेळी सर्व लढाऊ विमाने चालवू शकते. सध्या चीनकडे लियाओनिंग आणि शांदोंग ही दोन विमानवाहू जहाजे आहेत. परंतु फुजियानची ताकद अधिक आहे. यामुळे चीनच्या नौदलाच्या क्षमतेत वाढ झाली आहे.
चीनचे लष्करी तज्ज्ञ आणि माजी चीनी लष्करी प्रशिक्षक सॉन झोंगपिंग यांनी, फुजियान चीनच्या नौदलात सामील होण्यास सुसज्ज असल्याचे म्हटेल आहे. सध्या फुजियान जहाज आणि इतर विमान, शस्त्रांच्या चाचणीसाठी सेवेत उतारण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.फुजियान युद्धनौका अमेरिकेच्या एअरक्राफ्ट कॅरिअरच्या सामान आहे. ही युद्धनौका इलेक्ट्रोमॅग्नेटिक लॉंच सिस्टिमने सुसज्ज करण्यात आली आहे. यामुळे अधिक वजनाच्या आणि मोठ्या क्षमतांच्या विमानांना कमी वेळात लॉंच करता येईल. फुजियाचा भार 80 हजार टनांहून अधिक आहे. हा पारंपारिक इंजिनने चालणाऱ्या युद्धनौकांमध्ये अधिक मानला जातो.
परंतु यामुळे भारत आणि अमेरिकेमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून चीन दक्षिण चीन सागरीभागापासून हिंद महासागरापर्यंत आपली लष्करी उपस्थीती वाढवत आहे.अशा परिस्थितीत फुजियानची चीनी नौदलात भर चीनच्या लष्करी कारवायांना अधिक गती देईल.
या युद्धनौकेवरुन उड्डाण करणारी विमाने मोठ्या क्षेत्रांवर हल्ला करु शकतात. तसे. हवाई वर्चस्व देखील राखू शकतात. शिवाय यामुळे केवळ भारताच्या सागरी सुरक्षेलाच नव्हे, अमेरिका, तैवान. फिलिपीन्स आणि जपानसाठी धोकादायक मानली जात आहे.यामुळे आशिया-पॅसिफिक क्षेत्रात तणावाचे वातावरण आहे.