रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई लोव्हरोव (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
प्योंगयांग : एक मोठी बातमी समोर आली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह सध्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाची धाकधुक वाढली आहे. सर्गेईंनी या तिन्ही देशांना उत्तर कोरियाच्या विरोधात लष्करी कारवाईचे प्रयत्न थांबवण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, उत्तर कोरियाला लक्ष्य करणाऱ्या कोणत्याही लष्करी आघाडीला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यांच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या काही वर्षात रशि्या आणि उत्तर कोरियामधील संबंध अधिक मजबूत होत चालले आहेत. विशेष करुन दोन्ही देशांमध्ये संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढत आहे. उत्तर कोरियाला रशियाकडून लष्करी तंत्रज्ञान मिळवत आहे, तर युक्रेनविरुद्धच्या युद्धात उत्तर कोरिया रशियाला मदत करत आहे. या दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमदीवल वाढती मैत्री पश्चिम राष्ट्रांना म्हणजेच अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाला चिंतेत टाकत आहे.
यामुळे अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया एकत्रित लष्करी कारवाया करत आहे. सैनिकांना एकत्रित प्रशिक्षण दिले जात असून लष्करी सरावात वाढ केली जात आहे. तसेच यामध्ये अमेरिकेच्या बी-2 बॉम्बर्सचाही समावेश आहे. या सर्व घडामोडी लक्षात घेऊन रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेच्या नेतृत्त्वाखालील लष्करी हालचाली आम्हाला ज्ञात आहे, या हालचाली केवळ उत्तर कोरियाला उकसवण्यासाठी केल्या जात आहे. या हालचाली लवकरात लवकर थांबवाव्यात असे त्यांनी म्हटले. त्यांनी सांगितले की, उत्तर कोरियाचा हा रशियाचा मित्र देश आहे. यामुळे आमच्या मित्राला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. उत्तर कोरियाने अण्वस्त्रांची निवड ही राष्ट्राच्या सुरक्षेसाठी केली आहे.
दुसरीकडे रशिया आणि उत्तर कोरियातील वाढती भागीदारी अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाच्या चिंतेत भर घालत आहे. उत्तर कोरियाला रशियाकडून संवेदनशील तंत्रज्ञान मिळत असल्याची शक्यता या देशांनी व्यक्त केली आहे. यामुळेच उत्तर कोरियाच्या किम जोंग उनच्या अणु आणि क्षेपणास्त्राला गती मिळण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. परंतु या सर्व घडामोडींमुळे जगातिक स्तरावर संघर्षाची लाट उसळत आहे. हे जगाच्या स्थैर्याच्या दृष्टीने धोकादाक मानले जात आहे.