Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washington Hilton : अमेरिकेचा ‘ब्लॅक सॅटर्डे’! ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणारा जेरबंद; घटनेनंतरचे मोदींचे ‘हे’ ट्विट होतंय VIRAL

Washington Hilton fire: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉशिंग्टनमधील गोळीबाराबद्दल चिंता व्यक्त केली आणि डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित असल्याचा दिलासा व्यक्त केला. मोदी म्हणाले, "लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही."

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 26, 2026 | 11:15 AM
washington hilton shooting trump safe pm modi reaction 2026 news

washington hilton shooting trump safe pm modi reaction 2026 news

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न
  • मोदींचा तीव्र निषेध
  • सुरक्षेचा मोठा बिघाड

Washington Hilton shooting April 2026 : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये शनिवारी रात्री एक असा थरार घडला ज्याने जगाचा काळजाचा ठोका चुकवला. प्रगत सुरक्षेचे दावे केले जाणाऱ्या अमेरिकेत, खुद्द राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत गोळीबार होणे ही साधी गोष्ट नाही. ‘व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनर’ या अत्यंत प्रतिष्ठित कार्यक्रमात जेव्हा डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump), फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स उपस्थित होते, तेव्हाच गोळीबाराच्या आवाजाने हॉटेलचा परिसर हादरून गेला.

हिल्टन हॉटेलमधील तो भयानक क्षण

मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रम ऐन रंगात असताना अचानक गोळ्यांचे आवाज ऐकू आले. युएस सिक्रेट सर्व्हिसने क्षणार्धात पाहुण्यांना टेबलांखाली वाकण्याची सूचना दिली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सुरक्षा रक्षक मानवी साखळी करून मंचावरून सुरक्षित स्थळी घेऊन गेले. हिल्टन हॉटेलच्या बॉलरूममध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता. सुदैवाने, सुरक्षा दलांनी चपळाई दाखवत गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला घटनास्थळीच बेड्या ठोकल्या. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, हॉटेलच्या लॉबी आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अपुरी होती, ज्याचा फायदा हल्लेखोराने घेतला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Safe : ‘मृत्यू समोर होता, पण सिक्रेट सर्व्हिसने वाचवलं!’ WCDच्या बडतर्फीवर ट्रम्प यांची पहिलीच प्रतिक्रिया; पाहा VIDEO

पंतप्रधान मोदींचा ‘एक्स’वरून मोठा संदेश

या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर आपली प्रतिक्रिया दिली. मोदी म्हणाले, “वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मी काळजीत होतो, मात्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स सुखरूप असल्याचे कळल्याने मला मोठा दिलासा मिळाला आहे.” त्यांनी पुढे स्पष्ट शब्दांत सुनावले की, “लोकशाहीच्या रचनेत कोणत्याही प्रकारच्या हिंसेला थारा दिला जाऊ शकत नाही. अशा कृत्यांचा आपण सर्वांनी एकमताने निषेध केला पाहिजे.” मोदींनी या सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थनाही केली.

Relieved to learn that President Trump, the First Lady and Vice President are safe and unharmed following the recent security incident at a Washington DC hotel. I extend my best wishes for their continued safety and well-being. Violence has no place in a democracy and must be… — Narendra Modi (@narendramodi) April 26, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIRAL VIDEO : ‘आज रात्री गोळीबार होणार आहे’ घटना घडण्यापूर्वीच ट्रम्प यांच्या प्रेस सेक्रेटरीने कसे केले होते याचे ‘भाकीत’?

अमेरिकन राजकारणात खळबळ: सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सिक्रेट सर्व्हिससाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. बॉलरूम आणि व्हीआयपी झोनमध्ये कडेकोट बंदोबस्त असताना, हॉटेलच्या इतर भागात सुरक्षा का कमकुवत होती? हा प्रश्न आता विचारला जात आहे. या हल्ल्याचा उद्देश काय होता आणि हल्लेखोराचे कोणाशी संबंध आहेत, याचा तपास सध्या एफबीआय (FBI) करत आहे. या घटनेमुळे अमेरिकेतील आगामी राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता असून, जागतिक नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबार कधी झाला?

    Ans: शनिवारी रात्री आयोजित 'व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनर' दरम्यान हा गोळीबार झाला.

  • Que: या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित आहेत का?

    Ans: होय, डोनाल्ड ट्रम्प, मेलानिया ट्रम्प आणि जेडी व्हान्स यांना सुरक्षा रक्षकांनी सुरक्षितपणे बाहेर काढले असून त्यांना कोणतीही इजा झालेली नाही.

  • Que: पंतप्रधान मोदींनी यावर काय म्हटले?

    Ans: पंतप्रधान मोदींनी या घटनेचा निषेध केला असून लोकशाहीत हिंसेला स्थान नसल्याचे सांगत ट्रम्प यांच्या सुरक्षेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Washington hilton shooting trump safe pm modi reaction 2026 news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • America news
  • Donald Trump
  • Firing in White House
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

पेंटागॉनमध्ये हाय-ड्रामा! ‘Hazmat Alert’मुळे लष्करी मुख्यालयात लॉकडाऊन, पोलीस गॅस मास्कमध्ये; नेमके काय घडले वॉशिंग्टनमध्ये?
1

पेंटागॉनमध्ये हाय-ड्रामा! ‘Hazmat Alert’मुळे लष्करी मुख्यालयात लॉकडाऊन, पोलीस गॅस मास्कमध्ये; नेमके काय घडले वॉशिंग्टनमध्ये?

एनडीए बैठकीत एकनाथ शिंदे यांचे वाढते महत्त्व अधोरेखित; मोदींच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्याची मिळाली संधी
2

एनडीए बैठकीत एकनाथ शिंदे यांचे वाढते महत्त्व अधोरेखित; मोदींच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्याची मिळाली संधी

Donald Trump : वॉशिंग्टनमधील नॅशनल मॉलच्या गवतावर 8647 हा कोड; ट्रम्प यांच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी ‘ही’ कसली धमकी?
3

Donald Trump : वॉशिंग्टनमधील नॅशनल मॉलच्या गवतावर 8647 हा कोड; ट्रम्प यांच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी ‘ही’ कसली धमकी?

US Iran Peace Deal : ट्रम्प यांचा पुन्हा शांततेचा दावा; अमेरिका-इराण युद्ध थांबणार? होर्मुझबाबतही मोठे संकेत
4

US Iran Peace Deal : ट्रम्प यांचा पुन्हा शांततेचा दावा; अमेरिका-इराण युद्ध थांबणार? होर्मुझबाबतही मोठे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.