Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

FreeDC Protest : अमेरिकेच्या लोकशाहीला धोका? व्हाईट हाऊसकडे वळला संतप्त मोर्चा, ट्रम्पविरोधी गगनभेदी घोषणा

Free DC protest : वॉशिंग्टन डीसीमध्ये नॅशनल गार्ड्स तैनात करण्याच्या विरोधात हजारो लोकांनी निदर्शने केली. ट्रम्प यांच्या गुन्हेगारी आणीबाणीच्या आदेशाला विरोध करण्यात आला. निदर्शकांनी व्हाईट हाऊसकडे मोर्चा काढला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 17, 2025 | 12:39 PM
Washington protests slam Trump National Guard march to White House

Washington protests slam Trump National Guard march to White House

Follow Us
Close
Follow Us:

Free DC protest : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात राजधानी वॉशिंग्टनमध्ये जनतेचा संताप उसळला आहे. राजधानीत ८०० नॅशनल गार्ड्स तैनात करण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाला विरोध म्हणून हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. “गुन्हेगारी आणीबाणी” जाहीर केल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी व्हाईट हाऊसकडे मोर्चा काढत ट्रम्पविरोधी घोषणा दिल्या.

ड्युपॉन्ट सर्कलपासून सुरू झालेल्या या रॅलीने पाहता पाहता हजारोंचा लोंढा घेतला. “ट्रम्प, आता निघून जा” अशा घोषणा देणाऱ्या निदर्शकांच्या हातात संताप व्यक्त करणारे फलक होते. अमेरिकेतील लोकशाही धोक्यात आणणाऱ्या या आदेशाला तातडीने रद्द करण्याची मागणी जमावाने केली. राजधानीतील कायदा व सुव्यवस्था बिघडत असल्याचे कारण देत ट्रम्प यांनी १२ ऑगस्ट रोजी नॅशनल गार्ड्स तैनात करण्याचे आदेश दिले होते.

पोलिसांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न हाणून पाडला

या पार्श्वभूमीवर ॲटर्नी जनरल पाम बोंडी यांनी डीसी पोलिसांचे पूर्ण नियंत्रण घेण्यासाठी टेरी कोल यांची “आपत्कालीन पोलीस आयुक्त” म्हणून नियुक्ती करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, याविरोधात ॲटर्नी जनरल ब्रायन श्वाल्ब यांनी फेडरल कोर्टात धाव घेतली आणि प्रशासनाला माघार घ्यावी लागली. “आमचे पोलिस दल ताब्यात घेऊ देणार नाही,” असे ठाम विधान श्वाल्ब यांनी केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘जोपर्यंत मी राष्ट्राध्यक्ष आहे तोपर्यंत…’ शी जिनपिंग यांचे नाव घेऊन ट्रम्प यांचे धाडसी विधान

नागरिकांमध्ये वाढती चिंता

“मला वाटते ट्रम्प यांना स्वतःला काय म्हणायचे आहे हेही माहित नाही,” असे स्थानिक नागरिक जॉन स्मिथ यांनी सांगितले. पांढऱ्या वर्णाचा वृद्ध असूनही ते नेहमीच सुरक्षित असल्याचे सांगतात. तरीसुद्धा नॅशनल गार्ड्सच्या तैनातीमुळे लोकशाही मूल्यांना धोका पोहोचतो, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. येत्या आठवड्यात आणखी मोठ्या निदर्शनांची योजना आखण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

ट्रम्पना मिळाले काही राज्यांचे समर्थन

दरम्यान, ट्रम्प यांच्या निर्णयाला काही राज्यांचा पाठिंबा मिळत आहे. वेस्ट व्हर्जिनियाचे गव्हर्नर पॅट्रिक मॉरीसी यांनी ३०० ते ४०० नॅशनल गार्ड वॉशिंग्टनला पाठवण्याची घोषणा केली आहे. त्याशिवाय २०० नॅशनल गार्ड साउथ कॅरोलिनामधून आणि १५० ओहायोमधून पाठवले जाणार आहेत. यामुळे वॉशिंग्टनमध्ये आधीपासूनच तैनात असलेल्या ८०० गार्ड्सची ताकद आणखी वाढणार आहे.

१९७० चा होम रुल कायदा पुन्हा चर्चेत

या संपूर्ण घडामोडींत ट्रम्प यांनी वापरलेला १९७० चा “होम रुल कायदा” चर्चेत आला आहे. या कायद्यानुसार राष्ट्रपतींना आपत्कालीन परिस्थितीत वॉशिंग्टन डीसी पोलिसांवर ४८ तासांचे थेट नियंत्रण मिळते. संसदीय समितीला माहिती दिल्यास हे नियंत्रण आणखी दीर्घकाळ टिकवता येते. त्यामुळे ट्रम्प यांच्या निर्णयाने राजधानीत नवा राजकीय वाद सुरू झाला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : म्यानमार गृहयुद्ध भीषण वळणावर; लढाऊ विमानांच्या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी

लोकशाही विरुद्ध हुकूमशाही?

नॅशनल गार्ड्सची तैनाती ही केवळ कायदा-सुव्यवस्थेसाठी आहे की लोकशाही प्रक्रियेवर अंकुश ठेवण्याचा डाव आहे, हा खरा प्रश्न आता समोर आला आहे. लोकशाहीची राजधानी असलेल्या वॉशिंग्टनमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले, हेच या आदेशाबाबतचा अविश्वास स्पष्ट दाखवते. पुढील काही दिवसांत या आंदोलनाचे स्वरूप किती तीव्र होते, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Washington protests slam trump national guard march to white house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 12:39 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • washington news

संबंधित बातम्या

‘जोपर्यंत मी राष्ट्राध्यक्ष आहे तोपर्यंत…’ शी जिनपिंग यांचे नाव घेऊन ट्रम्प यांचे धाडसी विधान
1

‘जोपर्यंत मी राष्ट्राध्यक्ष आहे तोपर्यंत…’ शी जिनपिंग यांचे नाव घेऊन ट्रम्प यांचे धाडसी विधान

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…
2

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास
3

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चवताळले इराण सरकार; हेरगिरीच्या आरोपाखाली तब्बल २१ हजार नागरिकांना तुरुंगवास

Trump-Putin Meeting: ट्रम्प-पुतिन यांच्या अ‍लास्कातील भेटीवर भारताची प्रतिक्रिया; ‘शांततेच्या प्रयत्नांचे कौतुक’
4

Trump-Putin Meeting: ट्रम्प-पुतिन यांच्या अ‍लास्कातील भेटीवर भारताची प्रतिक्रिया; ‘शांततेच्या प्रयत्नांचे कौतुक’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.