Biden Is A Clone Trump's sensational claim
वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डो बायडेन यांची प्रकृती सध्या गंभीर आहे.आक्रमक प्रकारच्या प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाले आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर जोरदरा टिका केली आहे. ट्रम्प यांनी दावा केला आहे ती, जो बायडेन यांची २०२० मध्ये हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या जागी रोबोटिक क्लोन आणला आहे. दरम्यान ट्रम्प यांच्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे.
यापूर्वीही ट्रम्प यांनी अनेक वेळा जो बायडेन अध्यक्षपदासाठी अयोग्य असल्याचे वारंवार म्हटले होते.परंतु ट्रम्प यांच्या या दव्याला बायडेन प्रशासनाने नाकारले होते. निवडणूक जिकंल्यानंतरही ट्रम्प यांचा हा खेळ सुरुच होता.दरम्यान रिपब्लिकन पक्षाने या आरोपांची चौकशी सुरु केली आहे. राष्ट्राध्यक्षांच्या स्वाक्षरीवरही काही लोकांनी महत्त्वाचे निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ट्रम्प यांनी या घटनेला अमेरिकेन इतिहासातील धोकादायक आणि चिंताजनक घोटाळा म्हणून वर्णन केले आहे. ट्रम्प यांनी जो बायडेन यांच्या प्रकृतीच्या चर्चा सुरु असाताना क्लोनची कॉन्परसी थेअरी मांडली आहे. त्यांनी म्हटले की, जो बायडेन यांची २०२०मध्ये हत्या करण्यात आली होती. अध्यक्षपदी बायडेन म्हणून एक रोबोट आहे, ज्याला काहीही समजत नाही. जो बायडेनच्या नावाखाली दुसऱ्या लोकांना याचा फायदा घेतला आहे. तसेच डेमोक्रॅट्सच्या लोकांना खऱ्या आणि खोट्यातला फरक कळत नाही असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
रिपब्लिकन आणि अनेक ट्रम्प समर्थकांनी बायडेन यांना बदनाम करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला आहे. जो बायडेन पदावर असताना देखील अनेकवेळा असे गंभीर आरोप करण्यात आले आहे. तसेच ट्रम्प समर्थकांनी बायडेच्या प्रशानाने त्यांची शारिरीक आणि मानसिक स्थिती लपवल्याचाही आरोप केला आहे. बायडेन यांच्या नावाखाली त्यांच्या मित्रपक्षांनी देशाचा कारभार चालवला असल्याचे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे.
दरम्यान राष्ट्रपतींचे वकील ॲटर्नी जनरल आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यकारी विभाग आणि प्रमुखांशी या प्रकरणारवर चर्चा केली आहे. याचर्चेदरम्यान ट्रम्प यांच्या आरोपांवर चौकशी करण्यात येणार आहे. राष्ट्रपंतींचे अधिकार आणि जबाबदाऱ्या असंवैधानिकरित्या वापरले गेलेत का हे निश्चित करण्यासाठी तपास सुरु करण्यात येणार आहे. आता तपासात काय समोर येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.