Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लॉस एंजलिसमध्ये तैनात नॅशनल गार्ड म्हणजे काय? कोणाला असतो सैनिकांना आदेश देण्याचा अधिकार?

सध्या अमेरिकेच्या लॉस एंजलिससह अनेक भागांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाविरोधात हिंसक निदर्शने सुरु आहेत. याला ट्रम्प यांनी बंड म्हणून वर्णन केले आहे. यामुळे नॅशनल गार्ड तैनात केल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आह

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 09, 2025 | 09:50 PM
What is the National Guard stationed in Los Angeles Who has the authority to command the soldiers

What is the National Guard stationed in Los Angeles Who has the authority to command the soldiers

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: सध्या अमेरिकेच्या लॉस एंजलिससह अनेक भागांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाविरोधात हिंसक निदर्शने सुरु आहेत. रविवारी लॉस एंजलिसमधील निदर्शनात पोलिसांच्या वाहनांना आग लावण्यात आली, तसेच ट्रम्प विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान ट्रम्प यांनी वाढता विरोध पाहता त्याच्या नियंत्रणासाठी लॉस एंजलिसमध्ये नॅशनल गार्ड तैनात केले. यानंतर आंदोलनाने आणखी हिंसक वळण घेतले.

ट्रम्प यांच्या या निर्णयाला कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी जाणूनबुजून केलेले कृत्य म्हटले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, अमेरिकेची ही नॅशन गार्ड फोर्स नेमकी आहे तरी काय? ही फोर्स तैनात करण्याचा अधिकार कोणाला असतो?तर आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘पोलिसांवर थुंकला तर…’; लॉस एंजलिसमधील निदर्शकांवर ट्रम्प यांचा तीव्र संताप

काय आहे नॅशनल गार्ड?

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या सशस्त्र दलाच्या राखीव दलाचा एक भाग म्हणजे नॅशनल गार्ड पोर्स आहे. याच नॅशनल गार्ड फोर्सच्या दोन शाक आहेत. यामध्ये आर्मी नॅशनल गार्ड आणि दुसरी एअर नॅशनल गार्ड आहे. या फोर्सची स्थापना १९०३ मध्ये मिलिशिया कायद्यांतर्गत करण्यात आली होती. सध्या यातील आर्मी नॅशनल गार्ड लॉस एंजलिसमध्ये तैनात करण्यात आली आहे.

कधी तैनात केले जाते नॅशनल गार्ड फोर्स?

आपत्तीजनक मदत पुरवण्यासाठी या फोर्स तैनात केल्या जातात. यामध्ये आणीबीणी, पूर, भूकंप या परिस्थितींमध्येही नॅसनल गार्ड फोर्स तैनात करण्यात येते.

कोणाला अधिकार असतो नॅशनल गार्ड तैनात करण्याचा?

लॉस एंजलिसमध्ये वाढती अशांतता पाहता राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी संघीय कायद्यांतर्गत नॅशनल गार्ड तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
या कायद्यानुसार, राष्ट्रपती काही विशिष्ट परिस्थिती राष्ट्रीय रक्षक दल तैनात करण्यास परवानगी देऊ शकतात. नॅशनल गार्ड हे राज्य आणि संघराज्य दोन्ही हितसंबंधांसाठी एक युनिटम्हणून काम करते.

या परिस्थीतींमध्ये राष्ट्राध्यक्षांना मिळतो अधिकार

  • अमेरिकेवर विदेशी राष्ट्रांकडून हल्ला झाल्यास किंवा हल्ल्याचा धोका असल्यास
  • सरकारविरुद्ध बंडाचा धोका असल्यास
  • तसेच राष्ट्राध्यक्ष नियमित सैन्यासह अमेरिकेचे कायदे अमंलात आणू शकत नाही तेव्हा

या घटनांमध्ये अमेरिकेत तैनात करण्यात आले नॅशनल गार्ड

  • ६ जानेवारी २०२१ मध्ये कॅपिटलवर झालेल्या हल्ल्यावेळी अंतर्गत सुरक्षा निश्चित करण्यासाठी नॅशनल गार्ड तैनात करण्यात आले होते.
  • राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या उद्घाटन सोहळ्यावेळी देखील सुरक्षा निश्चित करण्यासाठी या फोर्सचा वापर करण्यात आला होता. २५ हजारांहून अधिक नॅशनल गार्ड सैनिक वॉशिंग्टन डीसीमध्ये तैनात करण्यात आले होते.
  • तसेच २००५ मध्येही कॅटरिना चक्रीवादळानंतर आपत्तीजनक परिस्थितीती ही फोर्स तैनात करण्यात आली होती.
  • जानेवारी २०२५ मध्ये अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील विध्वंसक वणव्यांदरम्यान नॅशन गार्ड तैनात करण्यात आले होते.
  • २०२० मध्ये जॉर्ज फ्लाइडट्या निदर्शनांदरम्यानही स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी नॅशनल गार्ड तैनात करण्यात आले होते. तसेच अनेक लष्करी कारवायांमध्येही नॅशनल गार्ड तैनात केले जातात.
  • जानेवारी २०२५ मध्ये अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील विध्वंसक वणव्यांदरम्यान नॅशन गार्ड तैनात करण्यात आले होते.

काय भूमिका असते फोर्सची?

  • या नॅशनल गार्ड सैनिकांची तैनात केलेल्या ठिकाणावरील परिस्थिती नियंत्रित करणे, म्हणजे लॉस एंजलिमध्ये सुरु असलेल्या निदर्शनांवर नियंत्रण ठेवणे.
  • तसेच इमिग्रेशन ॲंड कस्टम्स एन्फोर्समेंट आणि होमलॅंज सिक्युरिटसह फेडरल एजंट्सचे संरक्षण करणे.
  • या काळात सैनिक कोणतेही इमिग्रेशन छापे टाकत नाही, नाही नागरिकांवर कारवाई केली जाते.

अमेरिकेत का सुरु आहे आंदोलन?

सध्या अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाविरोधात आंदोलने सुरु आहेत. बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी ट्रम्प कारवाई करत आहेत. त्यांच्या या धोरणाविरोधात अमेरिकेत आंदोलन सुरु आहे. याला ट्रम्प यांनी बंड म्हणून वर्णन केले आहे. यामुळे नॅशनल गार्ड तैनात केल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- लॉस एंजलिसमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; भडकलेल्या ट्रम्प यांनी २००० नॅशनल गार्ड केले तैनात

Web Title: What is the national guard stationed in los angeles who has the authority to command the soldiers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2025 | 09:50 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी
2

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
3

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
4

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.