Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय चाललंय ? हुतींची इराण अमेरिका युद्धात पुन्हा एन्ट्री ,जगाचे टेन्शन वाढले

येमेनच्या बंडखोर हुतींची युद्धात एन्ट्री . बाब अल मंदेब बंद करण्याच्या हालचाली सूरु झाल्या आहेत . यामुळे जगाच्या १२ % सागरी वाहतुकीवर परिणाम पडून ,महागाई वाढण्याची चिन्हे दिसत आहेत .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 17, 2026 | 03:28 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:

इराण आणि अमेरिकेचे युद्ध पुन्हा सुरु झाले आहे . हल्ले प्रतिहल्ले सुरु असतानाच , अमेरिकेने पुन्हा युद्धाचा नियम मोडला . इराणच्या अहवाज शहरात असलेल्या लहानमुलांच्या कॅन्सर हॉस्पिटल वर हल्ला झाला . सुदैवाने यात कोणीही मृत्युमुखी पडले नाही . पण हॉस्पिटल मधून आलेल्या माहितीनुसार या हल्ल्यामुळे उपचार घेणाऱ्या लहान मुलांच्या उपचारात अडथळे निर्माण झाले आहेत . या झालेल्या हल्ल्यामुळे इराण ने येमेन बंडखोर हुतींना मदत करण्याचे आवाहन केले आहे .

  • हुती काय करतील ?
  • जगावर याचा काय परिणाम होईल
  • मध्य पूर्वेतील राजकारण बदलेल का ?
UNSC मध्ये भारताच्या दावेदारीवर चीनची भारताला साथ? पहिल्यांदाच स्पष्ट केली भूमिका

हुती काय करतील ?

सर्वप्रथम येमेनचे हुती बाब अल मंदेब हा लाल समुद्र आणि अरेबियन समुद्र ला जोडणारा अतिशय महत्वाचा मार्ग बंद करतील . जगातील १२ % सागरी व्यापारी वाहतूक इथूनच होत असते . या बाब अल मंदेब मधून जाणाऱ्या जहाजांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले जातील . या सागरी मार्गावर हुतींशी लढणं एवढं सोप्प नाही . कारण खोल समुद्रात किनाऱ्यावरच्या जमिनीमधून लपून निशाणा लावणं जेवढं सोप्पं आहे तेवढं सोप्प हे पाण्यातून जमिनीवर हल्ला करण नाही . आणि याच हुतींना मिळणाऱ्या नैसर्गिक फायद्यामुळे हुतींची भीती विरोधी राष्ट्रांना वाटणं स्वाभाविक आहे . या सगळ्या गोष्टीमुळे हुती हल्ले करून किती आर्थिक आणि जीवांचं नुकसान करतील हे सांगता येणं कठीण आहे . मिळालेल्या माहितीच्या आधारे अजून तरी लाल समुद्रातून हल्ला होऊन जीवित हानी झाली आहे , अशी बातमी आलेली नाही .

Kuwait Drone Attack: कुवैती सेनेचा प्रतिकार ,आकाशात इराणच्या ड्रोनांशी थेट झटापट, हादरले आखाती देश

जगावर याचा काय परिणाम होईल ?

इराण अमेरिका युद्धामुळे होर्मूझ पुन्हा बंद झाले . होर्मूझ मधून जगातील २० % वाहतूक होत असते . जवळपास होर्मूझ मधून दिवसाला १२० ते १३० जहाजे माल वाहतूक करत असतात . होर्मूझ बंद असल्याने आता , अमेरिकेला आणि इस्रायलला शह देण्यासाठी इराण ने हुतींना साद घातली आहे . कारण त्यांचा लाल समुद्रावर असलेला ताबा . जगातील १२ % तेल या मार्गातून प्रवास करत असतं . यावर बंदी आल्यानंतर अर्थात तेल किंवा इतर वस्तूंची वाहतूक करणारी जहाजं एलात बंदरा ऐवजी आफ्रिकेच्या दक्षिणे कडून म्हणजे केप ऑफ गुड होप मार्गे फिरून जाऊ लागलीत . याचा परिणाम शिपिंग खर्च आणि वेळ अधिकच होऊन वस्तूंच्या किमती वाढतील आणि महागाई वाढेल . याची झळ युद्धात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सामील नसलेल्या देशांनाही होईल .

मध्य पूर्वेतील राजकारण बदलेल का ?

मध्य पूर्वेतील राजकारण हे पूर्वीपासून धार्मिक गोष्टींवर सुरु आहे . मध्य पूर्वेत सुन्नी समुदाय जास्त असलेले देश हे नेहमीच शिया असलेल्या देशाचे वाढते महत्व कमी करण्याचे प्रयत्न करत आहेत . याचबरोबर हा फक्त धर्माचा वाद नाही . सत्तेसाठी इराण विरुद्ध सौदी अरेबिया हे प्रमुख खेळाडू धर्माचा वापर करत असतात . असे सूत्रांच्या आधारे सांगितले जाते .

 

Web Title: Whats going on houthis re enter the iran america war global tension rises

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • America news
  • Iran News
  • yemen

संबंधित बातम्या

UAE-Iran Tension : इराणी ड्रोन हल्ल्यावर UAE संतप्त; प्रत्युत्तराचा कायदेशीर अधिकार राखून ठेवला
1

UAE-Iran Tension : इराणी ड्रोन हल्ल्यावर UAE संतप्त; प्रत्युत्तराचा कायदेशीर अधिकार राखून ठेवला

Iran-Gulf Crisis : खामेनेईंचे आखाती देशांना आवाहन; अमेरिका-इस्रायलविरोधात मुस्लिम देशांनी एकत्र यावे
2

Iran-Gulf Crisis : खामेनेईंचे आखाती देशांना आवाहन; अमेरिका-इस्रायलविरोधात मुस्लिम देशांनी एकत्र यावे

Iran Navy : ‘आमचे नौदल पूर्णपणे कार्यरत’; ट्रम्प यांच्या दाव्याला इराणी नौदलप्रमुखांचे प्रत्युत्तर
3

Iran Navy : ‘आमचे नौदल पूर्णपणे कार्यरत’; ट्रम्प यांच्या दाव्याला इराणी नौदलप्रमुखांचे प्रत्युत्तर

Barron Trump बॅरन ट्रम्पला कुठे मारायचे? इराणच्या हिटलिस्टवर ट्रम्प यांचा मुलगा; 10 दशलक्ष डॉलर बक्षीस अन्  3D VIDEO
4

Barron Trump बॅरन ट्रम्पला कुठे मारायचे? इराणच्या हिटलिस्टवर ट्रम्प यांचा मुलगा; 10 दशलक्ष डॉलर बक्षीस अन् 3D VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.