फोटो सौजन्य AI
US-Iran Conflict:मिडल ईस्ट , इराण आणि अमेरिकेचे युद्ध पेटले आहे . यामधे आता हळूहळू करत एक एक देश भाग घेत आहे . आधीच चीन आणि रशिया इराणला युद्धात अप्रत्यक्षपणे मदत करत आहे . असे बोलले जात असतानाच परवा रशियाने इराणला एक बॉम्बर विमान उघडपणे पाठवून दिले . आणि आता कुवैत उघडपणे या युद्धात सामील झाला आहे . कुवैतच्या सेनेने सांगितले कि गुरुवारी इराण ने त्यांच्यावर ड्रोन हल्ला केला , कुवैती सेना याचा तीव्र प्रतिकार करत असून . आमचे ड्रोन्स आता थेट इराणच्या ड्रोन सोबत टक्कर घेतील .
ट्रम्पने दिली होती हल्ल्याची धमकी
ट्रम्पने दिलेल्या धमकीवर इराणने प्रतिउत्तर दिले . यावर ट्रम्पने सांगितले कि इराण ने लवकर करारावर सही करावी , त्याचे काटेकोरपणाने पालन करावे अन्यथा त्यांच्या पॉवर प्लांट आणि पुलावर हल्ले करून ते नष्ट करू . याच्या उत्तरावर इराणने सांगितले कि जर अमेरिकेने असे काही केले तर त्यांच्या मध्य पूर्वेतील महत्वाचे बेस आम्ही करू . इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने (IRCG) सांगितले की त्यांनी जॉर्डनमधील अमेरिकन एअर बेसवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. IRCG नुसार हा हल्ला अमेरिकेने मुलांच्या कॅन्सर रुग्णालयावर बॉम्ब टाकल्याच्या प्रत्युत्तरात केला आहे.
हॉस्पिटलवर हल्ला , अमेरिकेची भ्याड कृती
इराणच्या सरकारी माध्यमांच्या रिपोर्टनुसार, नैऋत्य भागातील अहवाज येथील मुलांच्या कॅन्सर रुग्णालयाजवळ अमेरिकेने हल्ला केला. हल्ल्यानंतर रुग्णालय रिकामे करण्यात आले आहे आणि रुग्णांना इतर वैद्यकीय केंद्रांमध्ये हलवण्यात आले आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी अमेरिकेच्या या हल्ल्याला बर्बर आणि भ्याडपणाची कृती म्हटले आहे.
हल्ल्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया
तसेच, दुसऱ्या बाजूने अमेरिकेनेही या हल्ल्यांबाबत निवेदन जारी केले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांड (CENTCOM) ने सांगितले की, स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये खलाशांना धमकावण्याची क्षमता कमी करण्यासाठी अमेरिकन सैन्याने तटीय शहर बंदर अब्बाससह अनेक ठिकाणी इराणी लष्करी तळांवर हल्ले केले.CENTCOM ने पुढे सांगितले की, या हल्ल्यात इराणच्या क्रूझ क्षेपणास्त्र स्थळांना लक्ष्य करण्यात आले होते.






