Who is Blaise Metreweli appointed as MI6's first female chief
UK MI6 First Female Chief : लंडन: अलीकडच्या काळात प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे येताना दिसत आहे. शिक्षण, राजकारण, विज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात महिला बाजी मारताना दिसत आहे. अशातच एका गुप्तचर संस्थेसाठी दिली पहिल्यांदाच एका महिलेची प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनच्या गुप्तचर संस्था MI6च्या प्रमुखपदी महिलेची निवड करण्यात आली आहे. ११६ वरषांच्या इतिहासात प्रथमच एका महिला अधिकाऱ्याची निवड या गुप्तचर संस्थेने केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या डाऊनिंग स्ट्रीट कार्यालयाने एक निवदेन जारी केले आहे. या निवेदनात ब्लेझ मेट्रेवेली या MI6 १८ व्या प्रमुख असतील असे जाहीर करण्यात आले आहे.
ब्रिटनच्या पंतप्रधानांनी याची घोषणा केली असून त्यांनी म्हटले की, ब्लेझ मेट्रेवेली यांची MI6च्या प्रमुख पदी निवड करण्यात येत आहेसध्या आपल्या गुप्तचर संस्थेला एक प्रभावशाली नेतृत्त्वाची गरज आणि ब्लेझ यांच्यात मला ते पाहायला मिळाले. ब्रिटनला सध्या अनेक धोक्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक गुप्तहेर आपल्या देशात जहाजे पाठवत आहे, घुसखोरी करत आहे, तसेच आपल्या सार्वजनिक सेवांमध्ये व्यत्यय आणत आहेत. यामुळे एका कर्तुत्ववान आणि प्रभावशाली व्यक्तीची सध्या आपल्याला गरज आहे.
ब्लेझ मेट्रेवेली या गुप्तचर संस्था MI6 च्या तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनच्या महासंचालक म्हणून काम पाहत होत्या. आता त्यांच्यी या संस्थेच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी ब्लेझ यांनी MI5-MI6ची संलग्न आणि देशांतर्ग सुरक्षा एजन्सीत संचालक स्तरीय पदांवर कार्य केले आहे.
त्यांनी इंटेलिजेंस अधिकारी मध्ये त्यांचे शिक्षण पूर्म केले आहे. १९९९ मध्ये त्या केस ऑफिसर म्हणून सेवेत रुजू झाल्या. त्यांनी मध्य पूर्व आणि युरोपमध्ये अमनेक ऑपरेशनल कार्य पार पाडले. त्यांनी केंब्रिजमधील पेम्ब्रोक कॉलेजमध्ये मानववंशशास्त्राचा अभ्यास केला आहे.
सध्या त्यांची MI6 च्या प्रमुखपदी निवड झाली आहे. MI6 ही ब्रिटनची गुप्तचर संस्था आहे. ही जगातीव सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. या संस्थेची सुरुवात १९०९ मध्ये करण्यात आली होती. १९२० मध्ये या संस्थेला MI6 म्हणून ओळखले जाऊ लागले. ही संस्था परदेशी गुप्तचर माहिती गोळा करण्याचे, त्यांचे विश्लेषण करण्याचे आणि त्यांना प्रसारित करण्याचे काम करते. यामध्ये विशेष करुन सुरक्षा, गंभीर गुन्हे आणि युनायडेट किंग्डमच्या आर्थिक धोरणांशी संबंधित माहितीचा आणि परदेशी धोरणाचा समावेश असतो.